Rich Dad Poor Dad Book Summary In Marathi, Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download , Rich Dad Poor Dad Book in Marathi Pdf Free Download
नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मिञांनो आज चे हे आर्टिकल तुम्हा सर्वांच्यासाठी खूप प्रेरणादायक आणि स्पेशल ठरणार आहे. कारण मी आज तुमच्या सोबत पैशा वरती लिहले गेलेल खूप छान पुस्तक Rich dad Poor Dad Summary in Marathi मध्ये शेअर करणार आहे.
मिञांनो या पुस्तकाने माझा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदललाच शिवाय मी पैशाच्या बाबतीत कुठे कुठे चुकत होतो याची सुद्धा मला जाणीव करून दिली. आणि या पुस्तकाचे नाव आहे Rich dad Poor Dad. हे पुस्तक अमेरिकन लेखक रॉबर्ट कीयोसाकी यांनी लीहले आहे. रॉबर्ट हे अमेरिकेतील प्रसिद्ध व्यापारी आणि एक लेखक आहेत.
मिञांनो त्यांचा या पुस्तकाची आता पर्यंत 32 million copies जगभरात विकल्या गेल्या आहेत. त्यांनी सांगितल्या सूत्रांचा वापर करून लाखो लोक श्रीमंत झाले आहेत. मित्रानो तुम्हाला पण ही लाईफ बदलवुन टाकणारी सूत्र समजून घ्यायची असतील तर तुम्ही ह्या Rich Dad Poor Dad Book Summary in Marathi आर्टिकल ला शेवटी पर्यंत जरूर वाचा.
मित्रानो जर तुम्हाला Rich Dad Poor Dad Book Summary in Hindi मध्ये वाचायची असेल तर हिंदी मध्ये या पुस्तकाची समरी उपलब्ध आहे.
Rich Dad Poor Dad Summary in Marathi | Rich Dad Poor Dad Marathi Pdf
मिञांनो रॉबर्ट कीयोसाकी याचे 2 वडील असतात, एक श्रीमत वडील आणि एक गरीब वडील. एक त्यांचे खरे वडील असतात आणि एक त्यांच्या जिवलग मित्र माईक याचे वडील असतात. पहिले वडील खूप हुशार आणि सुशिक्षित असतात, आणि त्यांनी खूप उच्च शिक्षण घेतले आसते, आणि ते चांगली नोकरी सुधा करत असतात. पण ते श्रीमत नसतात.
रॉबर्ट च्या दुसऱ्या वडिलाचे शिक्षण खूप कमी म्हणजेच 8 वी पास आसतात, पण तरीही ते तेच्या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतात. दोघे पण रॉबर्ट ला वेळोवेळी सल्ले देत असतात. पण दोघांचे सल्ले एकमेकांच्या एकदम विरोधात असतात. जसे की…
गरीब वडील कायम सांगायचे की पैसा हा सर्व दुःखाचे मुळ आहे. तर श्रीमंत वडील सांगायचे की पैशाची कमतरता सर्व दुःखाचे मुळ कारण आहे. गरीब वडीलांना असे बोलायची सवय होती की आपल्याला हे परवडणार नाही. आणि श्रीमंत वडिलांना अशी बोल्याची सवय होती की मला कशी ही गोष्ट परवडू शकते.
त्याचे असे म्हणणे होते की जेव्हा तुम्हीं स्वतःला म्हणता की मला ही गोष्ट परवडणार नाही तेव्हा तुमचा मेंदू काम करायचा बंद करतों. पण जेव्हा तुम्ही सवतःला असा प्रश्न विचारता की मला हे कसे परवडेल? तेव्हा तुमचा मेंदू काम करायला सुरुवात करतो. परंतू मित्रानो याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वच गोष्टी विकत ह्या.
रॉबर्ट यांचे गरीब वडील कायम सांगायचे की खूप अभ्यास कर म्हणजे तुला चांगल्या कंपनी मध्ये नोकरी भेटेल. तर श्रीमंत वडील सांगायचे की खूप अभ्यास कर म्हणजे तु एकाधी कंपनी विकत घेऊ शकतो. गरीब वडील सांगायचे की पैशाच्या बाबतीत जास्त रिस्क घ्यायची नाही, आणि नेहमी सुरक्षित राहायचे. तर दुसरे वडील असे सांगायचे की रिस्क चे व्यवस्थीत व्यवस्थापण करायचे.
गरीब वडील कायम म्हणायचे मला पैशा मध्ये आजिबात इंटरेस्ट नाही ये, आणि माझ्या साठी पैसे महत्वाचे नाही ये. तर दुसरे वडील म्हणायचे की पैशांमध्ये खूप सामर्थ्य आहे. हे दोघे ही वडील रॉबर्ट ला जेव्हा धडे देत होते तेव्हा रॉबर्ट यांचे वय 9 वर्षे होते. तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला की ते त्यांचा श्रीमंत वडिलाचे सल्ले ऐकणार आणि आमलात आणणार.
मिञांनो ह्या पुस्तकामध्ये असे काहीं सांगितले आहे की श्रीमंत लोक असे काय करतात की ते अजूनच जास्त श्रीमंत होत जात आहेत आणि गरीब लोक असे काय करत आहेत की ज्यामुळे ते अजून गरीबच राहीले आहेत. मिञांनो आज पासूनच तुमचा पैसा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईन आणि तुम्ही नवीन दृश्टीकोनातूनच विचार करायला सुरवात कराल.
मिञांनो ह्या पुस्तकातून तुम्ही शिकाल की आपण पैशासाठी काम नाही करायला पाहिजे उलट पैशाकडून आपण काम करवून घ्यायला पाहिजे. या पुस्तकात श्रीमंत वडिलांनी रॉबर्ट ला 6 धडे दिले आहेत, आणि त्या धड्यांमधील महत्वाची सूत्रे जी त्यांनी सांगितली ती आज मी ह्या आर्टिकल क्या माध्यमातून तुमच्या सोबत शेअर करणार आहे.
Rich Dad Poor Dad Book Review in Marathi
मिञांनो ह्या पुस्तकाला अकाऊंटिंग शी संबंधित सर्वात प्रसिद्ध पुस्तक मानले जाते. आणि ह्या पुस्तकाने जगभरातील लोकांची विचारसरणी बदलली आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात, परंतु अनेक वर्षे शाळेत घालवूनही मुलांना आर्थिक शिक्षण दिले जात नाही. मुलांना फक्त शाळे मध्ये नोकरीच्या सुरक्षेचे धडे दिले जातात आणि स्वतःसाठी पैसे कसे कमवायचे हे शिकवले जात नाही.
मित्रानो चला तर मग जाणून घेऊया रॉबर्ट कियोसाकी यांच्या द्वारे या पुस्तकात सांगितलेल्या या 6 महत्त्वाच्या धड्यांबद्दल जाणून घेऊया.
श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत.
मित्रानो श्रीमंत वडिलाचे हे एक वाक्य खूप महत्वाचे आहे. गरीब आणि मध्यम वर्गीय लोक पैशासाठी काम करतात आणि श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात! लेखकांनी ह्यात आजुन एक मुद्दा सांगितला आहे, आणि तो म्हणजे श्रीमंत वडील कायम म्हणायचे की जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हीं पहिले ते आधी द्यायला शिका.
श्रीमंत वडील नेहमी आपल्या जवळील चर्च ला पैसे दान करायचे, आणि त्या सोबत ते असे ही सांगायचे की आपण जे दुसऱ्याला देतो, त्याच्या 10 पटीने आपल्या कडे परत येते. गरीब वडील कायम म्हणायचे की माझ्याकडे जेव्हा जास्त पैसे येतील तेव्हा मी दान करेन, आणि त्यांच्याकडे कधी जास्त पैसे आलेच नाहीत.
मिञांनो लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे श्रीमंत वडील असे सांगतात की जगातील बहुतेक लोक अनेक दशकांपासून एका विशिष्ट वर्तुळात अडकले आहेत. आणि रॉबर्टचे श्रीमंत वडील याला उंदीरांची शर्यत असे म्हणतात. खरं तर, जगातील बहुतेक लोकांचे आयुष्य फक्त चांगल्या कॉलेजमध्ये शिकणे, चांगली नोकरी शोधणे आणि लग्न करणे आणि नंतर आयुष्यभर आपल्या पगारातून घर आणि गाडी यासारख्या गोष्टींसाठी घेतलेले कर्ज ते फेडत राहणे एवढेच त्यांचा आयुष्यात राहिले आहे.
मित्रांनो लोकांच्या हे लक्ष्यात येत नाही की अश्या प्रकारे ते जीवनात कठोर परिश्रम तर करत आहेत परंतु त्यांच्या कष्टाचा फायदा फक्त दुसर्यालाच मिळत आहे. खर तर लोकांना या उंदीरांच्या शर्यतीमध्ये भाग घ्यायचा नसतोय, परंतू त्यांच्या मनातील भीती, लोभ आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते बळजबरीने 🐀 उंदीरांच्या शर्यतीचा हिस्सा बनून राहतात.
मिञांनो रिच डॅड म्हणतात की आपण आधी आपली भीती दूर करुन या रॅट रेस मधून बाहेर पडायला पाहिजे. ज्यामध्ये तुम्ही पैशासाठी काम करू नये, उलट पैशाने तुमच्या साठी काम करायला पाहिजे. मित्रांनो, एक जुनी म्हण अशी आहे की पैसाच पैशाला आकर्षित करतो. त्याच प्रकारे तुम्हाला असे काहीतरी करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमचा पैसा तुम्हाला पैसे कमवून देऊ शकेल.
पैशाची समज का शिकवली गेली पाहिजे?
मित्रानो रॉबर्ट च्या श्रीमंत वडीलांनी असेट्स आणि लायब्लीटिज या दोन्ही ची एकदम सोपी वाख्या केली आहे, जे आपल्या पुस्तकी ज्ञाना पेक्षा वेगळी आहे. मित्रांनो एसेट्स हे तुम्हाला पैसे बनवून देतात आणि लायब्लीटिज हे तुमच्या खशातून पैसे काढून घेतात. श्रीमंत लोक नेहमी आपले एसेट्स वाढवायचा प्रयत्न करतात. गरीब आणि मध्यम वर्गीय लोक नेहमी लायब्लीटिज ना वाढवतात, जी त्यांना आपले एसेट्स वाटतात.
गरीब आणि मध्यम वर्गीय लोक नेहमी महागडे मोबाइल, महागडे कपडे आणि महागड्या गाड्या या वर आपले सर्व पैसे खर्च करत असतात. जे त्यांना एक रुपया ही कमवून देत नाहीत, उलट ह्या सर्व गोष्टी विकत घेण्यासाठी जे काही कर्ज घेतलेले आसते, ते सर्व कर्ज फेडण्यात या सर्व मध्यम वर्गीय लोकांचे पैसे जातात
नंतर जेव्हा ह्या गोष्टी विकायच्या झाल्या तर त्याची किंमत पण खूप कमी झालेली आसते. आणि ह्या सर्व गोष्टी लायब्लीटिज मध्ये मोडल्या जातात, जे तुमच्या खिशातून पैसे काढून घेतात. श्रीमंत लोक आपले पैसे आश्या ठिकाणी इंवेस्ट करतात की जिथे त्यांना भविष्य काळात चांगला रिटर्न्स भेटेल. जसे की स्टोक्स मार्केट, म्युचुअल फंड, रीयल एस्टेट इत्यादी…
लेखक रॉबर्ट कियोसाकी जी म्हणतात की जर तुम्हाला श्रीमंत व्यक्ती व्यायचे असेल तर तुम्ही तुमचे एसेट्स वाढवा आणि जर तुम्हाला गरीब व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या लायब्लीटिज ना वाढवा. जेव्हा तुमचे एसेट्स पैसे कमवायला सुरुवात करतील तेव्हा तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही बे झिजक विकत घेऊ शकता.
लेखकांनी जेव्हा त्यांचे एसेट्स मजबूत केलेत आणि ते त्यांना पैसे कमवून द्यायला लागले, तेव्हा त्यांनी आपली ड्रीम कार बिना एक रुपयाचे कर्ज न घेता विकत घेतली. या जगामध्ये अनेक खेळाडू, सेलिब्रिटी आणि अनेक लोक तुम्हाला बघायला मिळतील जे एके काळी खूप श्रीमंत होते, पण आज त्यांच्याकडे काहीच नाही ये.
मित्रानो खरं तर लोक श्रीमंतीतून गरीब ह्यामुळे होतात, कारण त्यांचा मध्ये आर्थिक शिक्षणाचा अभाव आसतो. म्हणजेच मित्रानो त्यांच्यामध्ये पैशाला Maintain and Grow करण्याचा हूनर नसतो. मित्रांनो जर तुम्हाला तुमचे Financial Education ग्रो करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या financial Book Summaries ना ह्या नंतर वाचू शकता.
मित्रांनो रिच डैड फक्त त्या गोष्टींना संपत्ती मानतात, जे तुम्हाला घरी बसून पैसे कमवून देतात. आणि ह्या सोबत ते असे ही म्हणतात की श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी फक्त पैसे कमविणे महत्वाचे नाहीये, त्यापेक्षा पैसे कमवून त्या पैशाला कसे Grow करायचे आणि Grow केलेल्या पैशाला मेंटेंट करुन ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
- जरूर वाचा : The Psychology of Money Marathi Summary
आपल्या कामाशी काम ठेवणें.
मित्रांनो, या जगात जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याची आवडती नोकरी मिळते, तेव्हा तो व्यक्ती त्या नोकरीला आयुष्यभर करण्याचा निर्णय घेतो. आणि बिना काहीं विचार करता त्या जॉब मध्ये आयुष्य घालवितो. मिञांनो रॉबर्टचे रिच डैड म्हणतात की, जगातील कोणतीही व्यक्ती त्याच्या नोकरीसोबत इतर कोणतेही काम करू शकते. आणि बिना आपल्या नोकरी ला सोडता नवीन व्यवसायाचा राजा बनू शकतो.
मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी जगातील सर्वात मोठी फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्डचे संस्थापक रेक रॉक यांचे उदाहरण घेऊ. जर आपल्यापैकी कोणालाही हा प्रश्न विचारला गेला की, Rac Rock कोणत्या व्यवसायातून पैसे कमवतात? तर सर्वजन म्हणतील की ते त्यांच्या फास्ट-फूड व्यवसायातून पैसे कमवतात.
मित्रांनो, खरं तर Rac Rock यांचा मुख्य व्यवसाय मॅकडोनाल्डचा नसून रिअल इस्टेटचा आहे. आणि ते Real Estate मधूनच जास्त पैसे कमवतात. कारण की मॅकडोनाल्डच्या व्यवसायाचा विस्तार करत करत, ते आज जगा मध्ये सर्वात मोठे Real Estate ओनर बनले आहेत.
म्हणजेच मित्रांनो, फास्ट फूडचा व्यवसाय करत करत, त्यांनी त्यांचा Real Estate चे असे एक मोठे साम्राज्य निर्माण केले आहे, जे आज त्यांना खरोखर श्रीमंत बनविते. मित्रांनो, त्याच प्रकारे सामान्य माणूस देखील अशी मालमत्ता आणि उत्पन्नाचे स्रोत तयार करू शकतो, जे त्याला पैसे कमवून देईल.
मित्रांनो यासाठी लेखकांनी या पुस्तकात काही उदाहरण दिले आहेत जे तुम्हाला पैसे कमवून देतील. जसे की स्वतःचा व्यवसाय सुरु करणे, म्यूचुअल फंड किंवा स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणे किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणे इत्यादी…
मित्रांनो या पैकी कोणत्याही एका मार्गाने तुम्ही पैसे कमवू शकता. अगदी रिच डैड प्रत्येकाला हे करण्याचा सल्ला देतात. कारण असे केल्यानेच कोणताही माणूस श्रीमंत आणि यशस्वी होऊ शकतो.
टैक्स चा इतिहास और कॉर्पोरेशनची ताकद
मित्रानो ह्या लेसन मध्ये रिच डैड टैक्स चा इतिहास और कॉर्पोरेशन ची ताकद या विषयी सांगत असे म्हणतात की खर तर टॅक्स हा श्रीमंत आणि गरीब यांच्यातील जो फरक आहे ना तो कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेली एक system होती. म्हणजेच सुरवातीला फक्त श्रीमंत व्यक्ती कडूनच टॅक्स घेतला जात होता आणि त्या टॅक्स चे पैसे गरिबांच्या सुविधांसाठी खर्च केले जात होते.
पण कालांतराने हळूहळू मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांवरही टॅक्स आकारला जाऊ लागला. आणि आजच्या काळात तर, हे प्रकरण पूर्णपणे उलटले आहे. कारण श्रीमंत लोक त्यांच्या बुद्धीचा आणि चालकीचा वापर करून टॅक्स देण्यापासून स्वतःला वाचवतात. आणि जो टॅक्स सरकारच्या खात्यात जमा होतो, तो केवळ मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीयां कडूनच जमा केला जातो.
मोठे व्यापारी आणि उद्योगपती आधी पैसे कमवतात आणि त्यानंतर त्या पैशाने त्यांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करतात आणि नंतर जो थोडासा भाग उरतो, त्या पैशातून टॅक्स pay करतात. मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक पैसे कमवतात तसेच ते टॅक्स भरतात आणि शेवटी जे काही पैसे उरतात, त्या पैशातून आपल्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करतात.
श्रीमंत लोक पैशाचा आविष्कार करतात.
मित्रानो जेफ बेजोस, बिल गेट्स, मार्क जुकरबर्ग, एलोन मस्क आणि भारतातील धीरूभाई अंबानी, शिव नडार और मुकेश अंबानी ही सर्व काही अशी लोक आहेत, ज्यांनी जगा मध्ये एक असा बिजनेस घेऊन आलेत किंवा असे म्हणा की त्यांनी या जगामध्ये अशी कल्पना आणली. ज्याबद्दल तेंच्या आधी कोणीही विचार केला नव्हता.
मित्रांनो ह्याच आयडियाज मुळे ह्या सर्व लोकांनी पैशाचा आविष्कार केला आहे. मार्केट मध्ये उपलब्ध असलेली कोणतीही संधी इतर कोणी शोधण्यापूर्वी, या लोकांनी त्या संधीचा शोध घेतला, आणि त्या वरती लगेच अँक्शन घेतली. मित्रांनो म्हणूनच असे म्हंटले जाते की या सर्व लोकांनी पैसा कमवला नाही तर पैशाचा आविष्कार केला.
कारण मित्रांनो, त्यांनी त्या गोष्टी जगात आणल्या, जे हेच्या आधी मार्केट मध्ये उपलब्ध नव्हत्या. त्याचप्रमाणे, तुम्हीं पण केवळ पैसे कमविण्याचा विचार करू नये तर पैशाचा आविष्कार करण्याचा देखील विचार केला पाहिजे.
शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी नाही.
मित्रांनो माहित नाही अमेरिकेत असे किती लोक असतील जे मॅकडोनाल्डच्याच किमतीत जास्त चांगले मॅकडोनाल्ड बनवत आहेत आणि विकत ही आहेत. पण आपल्या कोणत्याही आयडिया ला मोठ्या प्रमाणावर कसे विकायचे याची समज प्रत्येकाला नसते. म्हणूनच तर खूप लोक मॅकडोनाल्ड पेक्षा चांगला बर्गर बनवूनही तो मर्यादित क्षेत्रात आणि मर्यादित प्रमाणातच विकतात. परंतू मॅकडोनाल्ड कंपनी आपले बर्गर जगभर कोणत्याही मर्यादे शिवाय विकते.
मित्रांनो, या शेवटच्या धड्यात, लेखक आपल्याला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की श्रीमंत लोक नेहमी नवीन गोष्टी आणि नवीन स्किल्स शिकणे कधी ही थांबवत नाहीत. आणि या चांगल्या सवयीमुळे त्यांना हे नेहमीच माहित असते की आपल्या आयडियाला किंवा आपल्या प्रॉडक्ट्स ना जगा मध्ये मोठ्या प्रमाणावर कसे विकायचे.
मित्रानो जर तुम्ही नोकरदार असाल किंवा व्यावसायिक असाल किंवा एक विद्यार्थी असाल आणि जर तुम्हाला पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक तुमच्या साठी योग्य आहे. हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर रिच डैड पूअर डैड पुस्तक खरेदी करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
मित्रांनो आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकाची मराठी प्रत सुधा अमेझॉन वरती उपलब्ध आहे. मी खाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेतील पुस्तकांची लिंक खाली दिली आहे.
- Marathi Book : खरेदी करा
- Hindi Book : खरेदी करा
- English Book : खरेदी करा
मित्रांनो ही होती Rich Dad Poor Dad Book Summary in Marathi मध्ये, तुम्हा सर्वांना कशी वाटली खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आणि जर तुम्हाला Rich Dad Poor Dad Summary in Marathi आर्टिकल तुमच्यासाठी उपयुक्त ठरले असेल तर तुमच्या मित्र मैत्रीण सोबत शोशल मीडिया वरती शेअर जरूर करा.
- जरूर वाचा : The Psychology of Money Marathi Summary
Rich Dad Poor Dad Marathi PDF Free Download
मित्रानो जर तुम्ही Rich Dad Poor Dad Marathi PDF Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही Rich Dad Poor Dad Marathi pdf free download करू शकता.
- Rich Dad Poor Dad Marathi Pdf : क्लिक करा
- Rich Dad Poor Dad Hindi PDF : क्लिक कीजिए
Rich Dad Poor Dad Book in Marathi Audiobook Free Download
मित्रानो जर तुम्ही Rich Dad Poor Dad Marathi AudioBook ऐकणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही kuku FM App ला install करा आणि Rich Dad Poor Dad Marathi AudioBook फ्री मध्ये डाऊनलोड करा.
- Kuku FM Audiobook App : क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल:
- The Secret Book In Marathi pdf Free Download
- Top 3 Motivational Speech In Marathi For Students
- The Compound Effect Book Summary in Hindi
- The Psychology of Money Book Summary in Hindi
- Richest Man in Babylon Book Summary in Hindi
- Financial Freedom Book Summary in Hindi
- Time Management Book Summary in Hindi
- The Alchemist Book Summary in Hindi
मित्रानो जर तुम्ही नॉलेज ग्रो मराठी ब्लॉग वर पहिल्यांदाच भेट दिली असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी या ब्लॉग वरती मराठी आणि हिंदी मध्ये प्रेरणादायी पुस्तकांचा सारांश, यशस्वी लोकांच्या प्रेरणादायी कथा, आणि तसेच मोटिवेशनल कोट्स हिंदी आणि मराठी मध्ये Publish करीत असतो.
म्हणून मित्रानो आमच्या नॉलेज ग्रो मराठी ब्लॉग ला वेब पुष नोटिफिकेशन ने जरूर सबस्क्राईब करा. मित्रानो परत भेटूया अशाच एका प्रेरणादायी आणि लाईफ बदलवुन टाकणाऱ्या आर्टिकल सोबत, तो पर्यंत तुम्ही जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.
तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद…