Knowledge GrowKnowledge Grow
  • Biographies
  • Book Summaries
    • Motivational Summaries
    • Self Help Summaries
    • Financial Summaries
    • Spiritual Summaries
  • Motivational Stories
  • Motivational Quotes
  • Self Help Articles
  • About Us & More
    • Content Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Terms and Conditions
    • DMCA
Knowledge GrowKnowledge Grow
  • Biographies
  • Book Summaries
    • Motivational Summaries
    • Self Help Summaries
    • Financial Summaries
    • Spiritual Summaries
  • Motivational Stories
  • Motivational Quotes
  • Self Help Articles
  • About Us & More
    • Content Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Terms and Conditions
    • DMCA
Follow US
Knowledge Grow > Motivational Speech In Marathi > Top 3 Best Motivational Speech In Marathi For Students

Top 3 Best Motivational Speech In Marathi For Students

Last updated: 20/09/23
By Shridas Kadam
Share
30 Min Read
SHARE

Top 3 Best Motivational Speech In Marathi For Students, Marathi Speech For Students

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मराठी मोटीवेशनल ब्लॉग वरती स्वागत आहे. मित्रांनो आज चे हे आर्टिकल तुम्हा सर्वांच्या साठी खूप प्रेरणादायी आणि लाईफ बदलून टाकणारे साबित होणार आहे, म्हणून मित्रांनो ह्या आर्टिकल ला शेवट पर्यंत अवश्य वाचा.

मित्रांनो जर तुम्ही ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत वाचले तर तुम्हाला ह्या आर्टिकल मधून खूप काही शिकायला मिळणार आहे. म्हणून मित्रानो ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.

Contents
Top 3 Motivational Speech In Marathi For Students | विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषणLife Changing Marathi Speech For StudentsMotivational Speech on Shivaji Maharaj in MarathiMotivational Speech For Students in MarathiMotivational Speech in Marathi For Success – ठामपणाConclusion of Motivational Speech in Marathi Article:Motivational Speech in Marathi Pdf Free Download
Motivational Speech In Marathi For Students | विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण
Motivational Speech In Marathi For Students | विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण

Top 3 Motivational Speech In Marathi For Students | विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण

मित्रांनो मी आज तुमच्या सोबत जे पाहिले प्रेरणादायी मराठी भाषण शेयर करणार आहे, त्या भाषणाला जर तुम्ही शेवटी पर्यंत वाचले तर तुमचे आयुष्य बदलणे निश्चित आहे. तर चला तर मग त्या प्रेरणादायी मराठी भाषणाची सुरुवात करुया.

वाचकांसाठी सूचना:

मित्रानो हे आर्टिकल एक प्रेरणादायी आणि ह्या आर्टिकल मधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. आर्टिकल अर्धवट सोडून जाऊ नका, नाहीतर तुम्हाला ह्या आर्टिकल चा पुरेपूर फायदा नाही मिळणार. म्हणून ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.

Life Changing Marathi Speech For Students

मित्रानो या जगात कोण्ही ही वीणा कामाचा जन्माला येत नाही, आणि या जगात ज्याचा उपयोग नाही असं काही निर्माणच होत नाही. या जगातील प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक, प्रत्येक झाडा झुडपाला आणि प्रत्येक प्राण्याला स्वतःचे अस वेगळं मोल आहे.

त्याच्या मध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे, आणि तो अलौकिक गुण काय आहे? हे ज्याला कळत त्यालाच मोठं होता येतं. ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही, त्याला कधीच मोठ होता येत नाही, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे.

त्यामूळे खर तर पहिली जर कुठली गोष्ट असेल तर पहले आपण कोण आहोत? आणि आपल्यात काय आहे? याचा पहिल्यांदा शोध आपण घ्यायला शिकल पाहिजे. मित्रानो रस्त्याने चालता चालता आपण सहज म्हणतो की “मी त्याला पुरता ओळखून आहे” अरे तू त्याला ओळखून आहे, पण तु स्वतःला ओळखलं आहेस का?

मित्रानो सर्वात मोठी अडचण आमची हीचं आहे. मित्रांनो 12 वर्षे गुरुकुल मध्ये अभ्यास केल्या नंतर एका शिष्यावर्ती त्याचे गुरू प्रसन्न झाले. आणि त्या गुरू नी त्याला जाताना एक आरसा भेट म्हणून दिला, तो आरसा मोठा विलक्षण होता. शिष्याला वाटलं की “आरसा ही काही भेट म्हणून द्यायची वस्तु आहे का”

  • जरुर वाचा: Top 10 Best Motivational Stories in Marathi

पण त्या गुरू नी त्याला सांगितले की “हा काही साधा आरसा नाही ये, ह्या आरश्या द्वारे तुला लोकांच्या मनात काय चालले आहे हे सुध्दा कळेल. आणि माणसांच्या मनात काय भाव आहेत हे ही तुला दिसेल.” हे सर्व ऐकून शिष्याला फार मोठा आनंद झाला.

आणि त्या शिष्याने पहिल्यांदा आरश्याचे तोंड सरळ आपल्या गुरू कडे केले. आणि आपल्या गुरूच्या मनात काय चालले आहे आणि गुरूच्या मनात काय भाव आहेत, हे त्या शिष्याने पाहिले. आणि त्या शिष्याच्या लक्ष्यात आलं की आपल्या गुरूंच्या मनातही क्रोध, अहंकार आणि स्वार्थ आहे.

आणि तो शिष्य मनातल्या मनात म्हणाला की मी तर यांना सर्वगुण संपन्न मानत होतो, पण गुरू पण असे आणि त्या शिष्याला काही कळेना आणि तो शिष्य शांतपणे स्वतःच्या घरी चालतं निघाला. घरी येताना त्या शिष्याने वाटेत दिसणाऱ्या सर्व परिचित माणसांच्या पुढे तो आरसा धरायचा आणि त्याच्या मनात काय आहे, ते डोकावून पाहायचा आणि म्हणायचा की 👇👇👇

“अरेरे, हेच्या मनात सुद्धा वाईटच आहे… शेवटी घरी आल्यावर त्याने आपल्या आई वडीलांच्या समोर सुद्धा आरसा धरला. आता आई वडील हे तर आपल्या साठी चैतंन्याचे मूर्ती मंत आणि सर्वगुण संपन्न तेच उदाहरण आहे, पण दु्दैवानं आरशा मध्ये त्याच्या लक्षात आले की 👇👇👇

“आपल्या आईच्या मनात सुद्धा स्वार्थ आहे आणि माझ्या वडिलांच्या मनात सुद्धा स्वार्थ आहे. आणि त्याला काही कळेना! या जगामध्ये सर्वगुण संपन्न आणि ज्यांच्यामध्ये वाईट असे काहीच नाही असा कुणी एखादा तरी आहे का? तो शिष्य निराश आणि हताश होऊन आपल्या गुरू कडे परत आला आणि आपल्या गुरूंना म्हणाला की 👇

“तुम्ही मला आरसा दिला खरा पण मी या आरश्यामध्ये ज्यांना ज्यांना पाहिले, त्या सर्वांच्या मनात वाईट भाव आहेत.” कुणात अहंकार आहे तर कुणात स्वार्थ आहे, कसलं जग हे! या जगात मी जगू तर जगू तरी कसा? एवढं सगळं एकल्या नंतर त्याचे गुरू त्याला म्हणाले की 👇👇👇

“वेड्या मी तुला हा आरसा दिला तो काही मी तुला इतरांचे चेहरे पाहिण्यासाठी नाही, त्या ऐवजी तो आरसा मी तुला तुझा स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी दिला आहे.

जेणे करून तू स्वतःला ओळखू शकशील आणि स्वतःमध्ये काय आहे ते पारखु शकशील. स्वतः मध्ये जे काही वाईट आहे ते निरखु शकशील, आणि जे काही वाईट आहे त्याला बाजूला कसं करता येईल आणि ते दुरुस्त कसं करता येईल त्याचा विचार तू करू शकशील.

मी तुला घडण्यासाठी हा आरसा दिला होता, इतर कसे आहेत ते पहिण्यासाठी दिला नाही. मित्रांनो ज्याला आपल्या आयुष्यामध्ये खरच काही तरी करायचे आहे, त्याने इतरांना ओळखत, निरखत आणि पारखत बसण्या पेक्षा स्वतःला पारखल, निरखल म्हणजेच 👇👇👇

“आपण काय आहोत, आपल्यात काय आहे याचा मूलतः विचार केला तर निश्चतपणे इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे” ही गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येईल. मित्रानो छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळालं होतं आणि वयाच्या 16 व्या वर्षी समजलं होत, आणि मग स्वराज्याची स्थापना झाली.

  • हे पण वाचा: Top 10 Best Motivational Stories in Marathi

पण याचा अर्थ असा आहे का, अनेक लोकांना असा गैरसमज निर्माण करून गेलाय की “परमेश्वर काही लोकांना बुद्धी जास्त देतो आणि काही लोकांना मर्यादितच देतो” त्यामुळे हल्ली पालक सुद्धा बोलता बोलता विद्यार्थांनबद्दल मत प्रदर्शन करताना असं म्हणतात की 👇👇👇

“नाही तो तसा अभ्यासात हुषारच आहे, आणि धाकटा नाही त्याला जरा बुद्धी कमीच आहे” हे सर्व ठरविणारे तुम्ही कोण? त्याच काय मूल्यमापन काय परिमाण आहे का ?? की याला कमी आहे आणि याला जास्त आहे… मित्रांनो असला काही प्रकारच अस्तित्वात नाही ये! परमेश्वराने सगळ्यांना समानच दिले आहे.

आणि ही गोष्ट प्रामुख्याने आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि हा विचार पहिल्यांदा आपल्या मनात ठसवला पाहिजे की “आम्ही काय करतो, आणि स्वतः च स्वतःबद्दलचे न्यूनगंड तयार करत जातो. आपल्यातल्या कमतरता आपण शोधत राहतो, बलस्थानाकडे पहिण्या ऐवजी आपल्यात कमतरता किती आहेत, त्या ओळखत राहतो,

आणि मग त्या कमतरता आहेत म्हणून निव्वळ झुरत राहतो आणि ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. स्वतःला ओळखन म्हणजे काय? – “तर स्वतः मधली बलस्थान नेमकी कुठली आणि स्वतःच्या नेमक्या कमतरता कुठल्या? याच नेमकं गणित आपल्याला मांडता आल पहिजे.”

पण कमतरता असणे म्हणजे आपण काहीच करण्यासाठी लायक नसणे अजिबात नव्हे ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे. मित्रांनो आइन्स्टाईन चा मेंदू आज ही प्रयोगशाळेत ठेवला आहे, त्यांनी आपल्या जीवनात प्रचंड मोठे शोध लावले आहेत, मग त्यांच्या मेंदूत नेमकं अस काय आहे? जेणे करून त्यांनी एवढी सृजनशीलता, निर्मिती क्षमता दाखवली आणि त्यांच्या मध्ये संशोधन शिलता आली. 👇👇👇

मित्रानो आइन्स्टाईनच्या मेंदूचा गेली कित्तेक वर्षे अभ्यास चाललाय, मग अभ्यासांती असे लक्ष्यात आले की “त्यांनी आपल्या मेंदूचा वापर 100% पैकी फक्त 0.01% केला आहे, म्हणजे त्यांनी 99.99% मेंदूचा वापर त्यांनी केलाच नाही ये. मग आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की👇👇👇

आइन्स्टाईन सारखा महान संशोधक आपल्या मेंदूचा फक्त 0.01% वापर करतो आणि एवढे शोध लावतो, तर आपण आपल्या मेंदूचा किती वापर करतो? मित्रांनो 0.01% मेंदूचा वापर करून जर एवढे शोध लागत असतील, तर फक्त 1% जर आपण आपल्या मेंदूचा वापर केला तर आपण केवढी मोठी क्रांती करू शकतो.

  • जरुर वाचा : 165 Swami Vivekanand Quotes in Marathi
  • जरूर वाचा : आयुष्य बदलणारे प्रेरणादायी मराठी सुविचार

मित्रांनो कोण म्हणत आपल्यात क्षमता नाहीत!!! हे आपल्याकडे आहे. मित्रांनो मानववंश शास्त्रज्ञ असे म्हणतात की “नुकतंच जन्माला आलेलं मुलं तुम्ही आम्हाला द्या आणि त्याला काय बनवायचं आहे, ते आम्हाला सांगा. आणि आम्ही ते 100% बनवून दाखवतो.

मित्रानो बनवता येत! जे हवं ते आणि जसे हवे तसे बनवता येते. म्हणजेच याचाच अर्थ कुणाला कमी आणि कुणाला जास्त असा काही ही नाही. तुम्ही घडविता कसे आणि घडता कसे? याचावर हे सगळे अवलंबून आहे. मित्रांनो मी तुमच्या सोबत एक सत्य उदाहरणं प्रस्तुत करून समजाविण्याचा प्रयत्न करतो.

Motivational Speech on Shivaji Maharaj in Marathi

मित्रांनो शिवाजी महाराजांचे फक्त 50 वर्षाचे आयुष्य होते, पण या 50 वर्षांच्या आयुष्यात एक ही प्रसंग किंवा घटना नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. मित्रानो ते जावू द्या, आईच्या गर्भात असतानाच जर कुणाच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोण्ही महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुणाचं नाव नाही.

मित्रानो आणि ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. महाराजांच्या आयुष्यात बिना नियोजन करता घडलेली अशी एक ही घटना नाही वो. मित्रानो फक्त महाराजांच्या आयुष्यात घडलेली एक आणि एकमेव घटना अशी आहे ज्याचं महाराजांनी नियोजन केले नव्हते, ते म्हणजे महाराजांचा मृत्यू…

मित्रांनो बाकी 50 वर्षांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचे महाराजांनी नियोजन केले होते. जन्माला यायच्या आधीच ठरले होते की “जन्माला आल्यानंतर काय करायचं आहे” हे पूर्ण नियोजन पूर्वक आणि नियाजन बद्घ महाराजांचे आयुष्य आहे.

मित्रांनो शास्त्रज्ञ जे सांगतात ते महाराजांच्या आयुष्यात खर झाल. आपल्याला जसे पाहिजे तसे घडवतात येते, त्यामुळे मुळामध्ये पहीली गोष्ट एक करा की, स्वतः मध्ये काही कमी आहे का आणि काही कमतरता आहेत का? हा भाव पहिल्यांदा आपल्या मनातून काढून टाका…

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की जीव शास्त्रज्ञ असे म्हणतात की 👇👇👇

“फुल पाखरू आकाशात उडू शकत नाही” आणि त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की “फुल पाखरू आकाशात उडूच शकत नाही” पण तरी ही फुल पाखरू आकाशात उडते. का??? कारण त्या फुल पाखराला जीव शास्त्राचा नियमच माहित नाही ये!

  • जरुर वाचा: Top 5 Best Motivational Speech in Hindi For Success

मित्रानो आपण काय करतो, चांगल्या पेक्षा वाइटाकडे जास्त लक्ष्य देतो. म्हणजेच आपण बलस्थाना पेक्षा कमतरता कडे जास्त लक्ष्य देतो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, जर एखाद्याला विचारले की “का रे बाबा का??? तर तो व्यक्ती उत्तर देतो की “आमची परिस्थिती नव्हती ओ”

मित्रानो मला भयानक असल्या माणसांचा राग येतो. जे असे म्हणतात की

“आमची परिस्थिती नव्हती ओ~~”

कारण मित्रानो “परिस्थिती माणसाला बिघडवत पण नाही आणि परिस्थिती माणसाला घडवत पण नाही” त्या ऐवजी “माणूसच परिस्थिती घडवितो आणि माणूसच परिस्थिती बिघडवितो” ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे…

बाकी कुठल्या कमतरता नाही सांगता आल्या की असे लोक म्हणतात की “परिस्थिती आहे” जर परिस्थितीच जर कारण असते तर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातील सर्वोत्तम विद्यार्थी ठरले नसते, आणि आपल्या देशाचे घटना तज्ञ झाले नसते.”

आपण आपल्या चुका लपवण्याची परिस्थितीवर दोष देत राहतो. पहले हे डोक्यातून काढून टाका की “अजिबात नाही परिस्थिती घडवत” तुमच्या कडे प्रत्येक गोष्ट आहे आणि भरपूर आहे. फक्त एकच की आपण त्याचा वापर करत नाही ये, आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

आणि ज्या गोष्टीचा वापर करत नाही ती गोष्ट गंजून जाते, मित्रांनो “गंजून गेल्या पेक्षा शिजून गेल्याल कधी पण चांगलं”. गंजून जाणाऱ्याला आपण लोखंड म्हणतो आणि झिजून जानाऱ्याला आपण चंदन म्हणतो. म्हणून मित्रांनो लोखंड व्यायचं की चंदन व्हायचं हे फक्त आपल्यावर अवलंबून आहे, परिस्थितीवर नाही.

मित्रानो काही गोष्टी अश्या आसतात जसे की “एखाद्याला नैर्गिकरित्या उंचीच कमी मिळते, मग त्यान काय करायचं? उंची कमी आहे म्हणून रडत 😭 राहायचे? नाही ना! सचिन तेंडुलकर ची उंची पण कमीच आहे ना! तो रडत नाही बसला, त्या ऐवजी त्याने आपल्या कमी उंचीला स्वतःचे बलस्थान बनविले आणि जागतिक पातळीवर मोठा क्रिकेटर बनला.

मित्रांनो काय कमतरता आहेत तुमच्या?

गरीब आहे! मग तर अती उत्तम कारण श्रीमंत होण्यासाठी तुमच्या कडे संधी आहे.

नाही जरा मला बुद्धी कमीच आहे?

मग चांगलं आहे ना! कारण स्मरण शक्ति वाढवण्यासाठी तुमच्याकडे केवढी मोठी संधी आहे.

नाही मी दिसायला जरा कसातरीच दिसतो?

मग उत्तम आहे ना मग कारण व्यक्तिमत्व घडवायला तुमच्याकडे केवढी मोठी संधी आहे. अडचणी कष्यात व्यक्त करीत राहता? कसल्या कमतरता आणि काय? मित्रांनो कधी तरी आपण शांतपने विचार केला पाहिजे की 👇👇👇

“स्वतःला ओळखा की मी काय आहे?” मित्रानो कुणात कमी जास्त असे काही नसते, पण एखादा अलौकिक गुण जरुर असतो.

मिञांनो हे Marathi Motivational Speech तुम्हा सर्वांना कसे वाटले? आणि यातून तुम्ही काय शिकला? खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा. त्या सोबतच ह्या आर्टिकल ला इतरांसोबत शेयर करायला विसरु नका.

  • जरुर वाचा: भगवत गीतेतील हे 5 उपदेश तुमचे आयुष्य बदलून टाकतील 

Motivational Speech For Students in Marathi

मित्रांनो एक छोटंसं गाव होत, त्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती, त्या टेकडीवर आता पर्यंत कोणीच गेलं नव्हते, आणि कोण्ही तिकडे फिरकत ही नव्हते. गावातल्या लोकांच्या मनात पक्क बसलं होतं की “त्या टेकडीवर कोण्ही जात नाही आणि आतापर्यंत कोण्हीच गेले नाही आणि जो गेला तो परत दिसला नाही”

कारण कोण्हीच फिरकत नव्हते ओ तिकडे, गावातल्या लोकांच्या मनात त्या टेकडी ची इतकी भीती होती की ती काय जायलाच तैयार नाही. पण मित्रानो तुमच्या सारखी नव्या रक्ताची पोरं एकत्र आली आणि काही तरी वेगळं करू अस म्हणाली म्हणजेच आपण अशी स्पर्धा आयोजित करूया की 👇👇👇

आपल्या गावा बाहेरच्या टेकडीवर पहिल्यांदा कोण पोहचेल त्याची आणि जिंकणाऱ्या साठी मोठ बक्षीस ठेऊ. आणि हा त्यांचा क्रांतीकारी निर्णयच होता. आणि त्या सर्व पोरांनी स्पर्धेचे नियोजन ठरविले. आणि गावात पुकारले की “जो कोण्ही गावा बाहेरील टेकडीवर पहिल्यांदा पोहचेल त्याला एवढे एवढे बक्षीस देण्यात येईल.”

जशी गावामध्ये ही वार्ता पसरली तशी गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र आलीत आणि म्हणालीत की “हे काय पोरांनी काढलय नवीनच आणि कश्यासाठी बिनकामाचा विषाशी खेळ, तिकडं आता पर्यंत कोण गेलय का? आणि गेलेलं आता पर्यंत कोण परत आलंय का? पोरांना थांबवायला पाहिजे”

सगळं गाव त्या पोरांच्या माग, उगा काही तरी कधी नका आणि आसला काहीं तरी उद्योग करू नका. क्रिकेट च्या सामने घ्या, आम्ही नाय म्हंटलय का? वाटलस तर वर्गणी आम्ही देतो, पण त्या टेकडीवरती जायचं असलं काय काढू नका. पण ही पोरं हट्टाला पेटलेली होती.

आम्हाला काय कळत नाही, एकदा बघू द्या तरी टेकडी वरती नेमकं हाय तरी काय ते? मग स्पर्धा आयोजित केली आणि स्पर्धेचा दिवस ही उजाडला आणि वेळ ही झाली. सगळ्या गावातली माणसं गोळा झाली आणि आख्या गावातून कशी बशी 8 पोरं टेकडी वरती जाण्यासाठी तयार झाली.

स्पर्धेला भरघोस प्रतिसाद आणि 8 पोरान वर स्पर्धा चालू झाली. तरी ही गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतच होते की “कश्याला नाही ते धाडस करताय, दुसरी काय काम नाहीत का? आणि या जगात कर्तुत्व गाजवण्यासाठी दुसऱ्या काही संधी नाहीत का? टेकडी वर गेलच पाहिजे का?

नाही गेलं तर काय बिघडणार आहे का? टेकडी वर काय सोन्याची खाण आहे का? कोणी सांगितलंय आणि आई बाबाला आणखी चार पाच आहेत का? कश्या साठी इतकी धडपड करताय? नका जाऊ टेकडी वर आमचं म्हणणं ऐका.. हे एकूण त्या 8 मधील 2 बाजूला झालीत. 👇👇👇

आणि ती 2 पोरं म्हणालित की “मोठी माणसं खोटं नाहीत सांगणार रावं आणि अनुभव असल्या शिवाय बोलणार नाहीत राव, मग काय करूया? जायचं राहूदे उगीच कशाला डोक्याला ताप” झाली ना त्यातील 2 कॅन्सल. आता उरली फक्त 6 आणि फक्त 6 जनाच्या वर स्पर्धा सुरू झाली.

आणि या ६ पोरांनी टेकडी चढ़ायला सुरूवात केली, आनी बगता बगता पोर पुढ़ पुढ आणि खालून गावातील माणसांच्या आरोळ्या सुरू झाल्या. आरे नका जाऊ ऐका आमचं, कश्याला वेड धाडस करताय, या माघारी. कुनी सांगितलंय तुम्हाला, तरी पण पोरं ऐकायला तयार नव्हते.

पोरं सर सर टेकडी वरती चढली आणि तेवढ्यात एक पोरगं ठेचकाळल आणि धाड दिशान खाली पडलं. दुसरा पोरगा त्या मुलाला उचलायला धावला. आणि त्या मुलाला विचारलं की “काय झाल?” आणि तो खाली पडलेला मुलगा त्या दुसऱ्या मुलाला म्हंटला की 👇👇👇

“आसं कधी होत नाय र! एवढे गड किल्ले चढलो पण असा कधी पडलो नव्हतो र! कुनी तरी मागणं खेचल्या सारखं वाटलं र, मी जातो लेका... दुसरा मुलगा पण म्हणाला की “तू जातोयस तर मी इथ थांबून काय करू? तुला सोडायला मी पण येतो, चल जाऊया परत…

आली दोघे खाली आता राहिली चौघे, आता ही रहलेली चार पोरं टेकडी चढत होते, खालून गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतच होते की “उगाच मोठे धाडस करू नका, आता गेलाय ना आर्ध्यात बस झाल, या आता माघारी. माणसानं आहे त्यात समाधान मानावं. उगाच नाहीं ते धाडस करू नये, अतिरेक वाईट असतो. या खाली !

परंतु ती चौघ पोरं पुढचं जायला लागली, तेवढ्यात त्यातील एक जण पोरगा चालता चालता दमच्याक झाल्या सारखा खाली बसला. दुसऱ्या पोरान त्या मुलाला विचारलं की काय झाल र? गड्या आज काही तरी वेगळच वाटतंय! मगं? नाय लेका नाय जमायचं मला, निम्मा आलोय तरी आजुन एवढं हाय!

जातो मी , मग दुसरा पोरगा पण म्हणाला की मग मी पण तुझ्या सोबत येतो. आली दोघं खाली आणि आता राहिली फक्तं दोघेजण, आता फक्त दोघेजण टेकडी वरती सर सर निघत होते, त्यातला एक जण तर तरा तरा पुढे निघालाय आणि तेझ्यात आणि दुसऱ्याच्यात खुप अंतर राहिले।

आणि आता दोन नंबरच्या मुलाने पुढे जाता जाता अचानक मागे वळून पाहिले, तर मागे कोणीच नव्हते. ते पाहून तो दुसरा मुलगा म्हणाला की “हे जाईल वर पण जर माझं काय तरी झाल तर खाली धरायला पण कोण नाय! आणि त्या दुसऱ्या पोराने सरळ जे युटूर्न मारला, त्यो थेट तळालाच…

तो एकटा मात्र चालत राहिला, चालतं राहिला आणि खालून गावातील माणसे आरोळ्या ठोकतायत, पण याचं त्या सर्वाच्याकडे लक्ष्य नाही आणि कुणाचं ऐकायला ही तयार नाही. फक्त सातत्याने, जिद्दीने आणि चिकाटीने पाऊले पुढे उचलत राहिला आणि आखेर त्या टेकडी वरती पोहचला.

तो पोरगा टेकडी वरती पोहचल्या बरोबर खाली गावातील लोकांनी जय घोष करायला सुरुवात केली की “जिंकला जिंकला!! बस आणि खालून माणसे त्याचाकडे आर्ध्या पर्यंत पळत गेली आणि त्या मुलाला खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली.

मिरवणूक काढल्या नंतर त्या गावातील लोकांनी त्याला एका बाजूला घेऊन विचारत राहिली की सांग ना तुला जमल कसं? आता पर्यंत कुणीच केलं नव्हतं आणि आता पर्यंत कुन्हाला शक्यच झाल नव्हतं तर तुला जमलं कसं? तू हे यश मिळवलं कसं सांग ना? तो पोरगा काय बोलेनाच. तेवढ्यात तेथील एक म्हातारा माणूस त्या लोकांना म्हणाला की

“त्याला काय विचारताय ते ‘भयर’ आहे”

मित्रानो जर तुम्ही एक स्टूडेंट असाल आणि जर शाळेतील किंवा कॉलेज मधील परीक्षा देत असाल तर निकाल लागे पर्यंत भहेरे व्हा. आजिबात कुणाचं काही ऐकायचं नाही. राज हंसासारख राहायचं, “दूध फक्त प्यायच, पाणी ले जाओ.” पण माणसं याचं उलट करतात वो. दूध टाकून देतात आणि पाणी पितात.

सकारात्मकता पेरणारी माणसं किती आणि नकारात्मकतेन आपल्याला माग ओढणारी माणसं किती याचा आपल्याला विचार करता यायला हवा. मित्रानो सगळ्यांच्या आसपास माणसं असतातच, परंतु यशस्वी कोण होत? ज्याच्या भोवतीच वातावरण positive आसते.

मित्रानो तुम्हाला मी एक सांगू “या जगात तुम्हाला पराभूत करणार दुसरं कोण्ही नाहीये, या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता.” आणि “या जगात तुम्हाला कोणीच जिंकून देऊ शकत नाही. फक्त तुम्हीचं तुम्हाला जिंकून देऊ शकता”.

एकदा धेर्य ठरलंय ना आणि जायचंय ना मग काय व्हायचंय ते होऊ दे, बहिरे होऊन जा पूर्ण आणि आपल्या धेर्याकडे सतत पाऊले उचलत जा, बाकी काय नाही, यश तुम्हाला जरुर मिळेल. मित्रानो तुम्हाला हे Marathi Motivational Speech कसे वाटले? खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा.

Motivational Speech in Marathi For Success – ठामपणा

मित्रानो तुम्ही किती ठाम आहात याच्यावर्ती तुमचे आयुष्य अवलंबून आहे. काय काय माणसे आपण चुकल म्हणून निर्णयच घेत नाहीत, चुकलो तर काय होईल! मित्रानो एका एमपीएससी च्या विद्यार्थ्याला इंग्रजी बद्दल एवढा भयगंड होता की 👇👇👇

“आपण आधिकारी झाल्यानंतर आपल्याला इंग्रजी मधून बोलायला लागेल, म्हणून तो मुलाखतीला गेलाच नाही.” आणि ही खरी वस्तुस्थिती आहे. मित्रांनो तुमचा कोणचं दुश्मन नाहीं, फक्त तुमचा न्यूनगंडचं तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे.

मित्रानो तुमच्या सारखं दुसरं कोणीच नाही आणि तुम्ही ग्रेटेस्ट आहात ही भावना पहिल्यांदा स्वतःच्या मनात आणा. ठाम रहायला शिका, चुकुद्या निर्णय चुकला तर अडचण काय आहे. यशस्वी कोण होतात “जे योग्य निंर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता, हे जे सिध्द करतात ते”

मित्रानो मी आता तुमच्या सोबत ज्या माणसाची खरी कहानी शेयर करणार आहे, ती कहानी तुम्हाला खुप मोठी शिकवण देईल की 👇👇👇

ठाम निर्णय कसा घ्यायचा आणि घेतलेला निर्णयावरती कसं ठामपने रहायचे. आणि आपली स्वप्न कशी पूर्ण करायची. मित्रानो या  Real Life Inspiration Story ला शेवट पर्यंत अवश्य वाचा. चला तर मग स्टोरी ला सुरुवात करुया.

मित्रानो माँटी रॉबर्ट नावाचा घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या एका मजुराचा मुलगा होता. त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला परीक्षेत माझे स्वप्न या विषयावर एक निबंध लिहायला सांगितला. घोड्याच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरान आपल स्वप्न लीहल की,

एक दिवस माझ्या मालकीचा एक रेस्कोर्स असेल आणि माझ्याकडं 200 ते 300 जातिवंत अरेबियन घोडे असतील. गाडया, बंगला आणि जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून मला ओळखलं जाईल. निबंध ही लिहला आणि परीक्षेचा निकाल ही लागला. त्याच्या वर्गातील सर्व मुलं पास झाली पण नापास झाला तो फक्त हा माँटी रॉबर्ट…

तो त्यांच्या टीचर कडे गेला आणि त्यांना म्हणाला की “हे बघा मॅडम तुम्ही मला चुकून नापास केलंय, म्हणून तुम्ही मला पास करा.” मग त्या मॅडम म्हणाल्या की मी तुला चुकून नाय नापास केलं, जाणीव पूर्वकच नापास केले आहे. माँटी रॉबर्ट म्हणाला की “पण का मॅडम?”

मॅडम म्हणाल्या की “अरे तू तुझी स्वप्न काय लिहली आहेस ते बघ, तु रेसकोर्स चा मालक असणार आणि 200 ते 300 अरेबियन घोडे असतील तुझ्याकडे आणि गाडया, बंगला… अरे वेड्या आपल्याला शक्य होईल ते स्वप्न बघावं. अशक्य कोटीतील नाही.” कधी कळणार तुला.. आणि तुझे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही…

आस कधी नसतंच स्वप्न आणि तू हे विसरू नकोस की तू एक रस्कोर्स वर काम करणाऱ्या एका गरीब मजुराचा मुलगा आहेस. आणि मी तुला पास नाही करूच शकत.. मग माँटी रॉबर्ट म्हणाला की “नाही मॅडम तुम्ही मला पास करा”

मॅडम म्हणाल्या की “तू तुझे स्वप्न बदल मी तुला पास करते.” माँटी रॉबर्ट म्हणाला की “नाही मॅडम मी माझे स्वप्न नाही बदलू शकत आणि की माझ्या स्वप्नांवर ठाम आहे.” मग मॅडम म्हणाल्या की मग मी तुला नाही पास करणार. तू आता ठरव की “परीक्षेत पास होऊन पुढच्या वर्गात जायचं आहे का हे स्वप्न घेऊन घरी बसायचं आहे.”

माँटी रॉबर्ट म्हणाला की “मॅडम मी माझे स्वप्न नाही बदलणार, आणि द्या तो माझा निकाल माझ्याकडे, पण लक्ष्यात ठेवा टीचर की “एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच!” आणि माँटी रॉबर्ट तो तिथून निघून गेला.

20 वर्षानंतर तीच टीचर आपल्या शाळेसोबत एका रेसकोर्स ला भेट देण्यासाठी गेली, तेव्हा त्या रेसकोर्सच्या मालकाने त्यांचे सहर्ष स्वागत केले, आणि त्यांना आपला सर्व रेसकोर्स फिरून दाखवला. आणि रेसकोर्स बघायचे पैसे ही नाही घेतले.

शेवटी त्या टीचरला त्या रेसकोर्स मालकाने अशी विनंती केली की आपण दुपारचे जेवण माझ्या सोबत घ्याल का? आणि त्या सगळ्या मुलांना घेऊन तो आपल्या डिनर रूम मध्ये आला. त्या रूम मध्ये त्या मॅडम नी हे पहिले की त्या भिंती वरती एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवले आहे.

ते पाहून त्या मॅडम जरा चाहुलीने जवळ गेल्या आणि म्हणाल्या की “अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे आणि या निकालाच्या खाली माझीच सही आहे, नेमका आहे कुणाचा हा निकाल?” अरे कोण माँटी रॉबर्ट, अरे त्या नापास झालेल्या माँटी रॉबर्ट चा निकाल तुम्ही इथे फ्रेम करून लावलेला आहे.

त्या वेड्याला स्वप्न बदल मग मी तुला पास करते अस सांगितल होत पण त्यान माझं एकल नाही, कुठाय तो? तुमच्या इथे कामाला आहे का? कुठे आहे तो बोलवा त्याला? तसा तो तरुण मालक म्हणाला की “मॅडम मीच तो माँटी रॉबर्ट आहे आणि मॅडम मी माझे स्वप्न पूर्ण केले आहे”

मॅडम जर मी तुमच्या सांगण्या प्रमाणे माझे जर स्वप्न बदलल असत तर मी शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो, पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास झालो असतो. म्हणून मित्रानो कोण्ही काही ही सांगू द्या आणि कोण्ही काही ही सल्ले देऊ द्या, जे लक्ष्य ठरवलंय ना त्याच्यावर ठामपणे रहा.

इतके ठामपने रहा की ते मिळवल्या शिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच असणार नाही. तुमची कृती ठाम हवी, तुमचा निर्णय ठाम हवा. तुमचा विचार आणि अभ्यास ठामच हवा. बास बाकी काय नको. ठामपणा मिळवता येतो, मित्रानो ठामपणा म्हणजे भावनेचं नियंत्रण…

तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही, तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही, तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो, तो ठामपणा तुम्हाला धडका मरायला शिकवतो. तो ठामपणा तुम्हाला यश मिळवल्या शिवाय माघारी फिरायच नाही, हे सातत्याने तुमच्या मना वरती बिंबवतो.

तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठ यश ठरतं. पण आलिकडच्या पीडित याचीच सर्वात जास्त वानवा दिसते, कारण मिञांनो आपण ठामच नाही आहोत कश्या बाबतींत ही आणि ही आमची सर्वात मोठी अडचण आहे.

मिञांनो तो ठामपणा कमवा, आणि तो ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो, आणि स्पष्टता अभ्यासातून येते, अभ्यास व्यासंगातूनच कमावता येतो, आणि व्यासंग कष्टाच्या फळावरच मिळवता येतो. म्हणून मित्रांनो कष्ट आणि संघर्ष ही सर्वात मोठी गोष्ट आहे. या जगात अशक्य अस काहीच नाही!!!

Releted Articles:

  • Top 10 Best Motivational Stories in Marathi
  • 101+ Life Changing Swami Vivekanand Quotes in Marathi
  • Top 135 Best Positive Thoughts in Marathi

Conclusion of Motivational Speech in Marathi Article:

मित्रांनो जर तुम्हाला ही Top 3 Motivational Speech In Marathi आर्टिकल आवडले असेल आणि तुमच्या साठी उपयोगी ठरले असेल तर तुम्ही ह्या आर्टिकल ला तुमच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत अवश्य शेयर करा. त्या सोबतच तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले हे सुध्दा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा.

Motivational Speech in Marathi Pdf Free Download

मित्रांनो जर तुम्ही Motivational Speech in Marathi Pdf Free Download करणार असाल तर खाली दिलेला लिंक वर क्लिक करून तुम्ही Motivational Speech in marathi pdf Free Download करू शकता.

Motivational Speech in marathi pdf Free Download

मित्रांनो आजच्या ह्या Top 3 Motivational Speech In Marathi आर्टिकल मध्ये फक्तं एवढेच, मित्रानो परत भेटूया अशाच एका Life Changing Self Help Article सोबत, तो पर्यंत तुम्हीं जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा…

धन्यवाद 🙏🙏🙏

Share This Article
Facebook Pinterest Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article Geeta Updesh in Hindi | गीता उपदेश इन हिंदी में भगवद गीता के इन 10 उपदेशों ने आपकी जिंदगी नहीं बदली तो कहना ! | Geeta Updesh in Hindi
Next Article Best Marathi Books to Read Before You Die Top 10 Best Marathi Books to Read Before You Die
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Letest Posts

Moral Stories in Hindi
अगर आप खुश रहना चाहते हैं तो यह कहानी आपके लिए है : Moral Stories in Hindi
Motivational Stories In Hindi Hindi Blog Self Help Articles
geeta gyan - geeta updesh
Geeta Gyan: भगवान श्री कृष्ण ने अर्जुन को बताया अपने मन पर विजय पाने का रहस्य
Geeta Gyan - गीता ज्ञान हिंदी में Geeta Saar Hindi Blog Self Help Articles Spiritual Articles
geeta gyan in hindi
Geeta Gyan: भगवान श्री कृष्ण ने अर्जुन को बताएँ सफलता प्राप्त करने के 3 रहस्य
Geeta Gyan - गीता ज्ञान हिंदी में Geeta Saar Hindi Blog Self Help Articles Spiritual Articles
मैं कौन हूँ | Who Am I
गीता से जाने मैं कौन हूँ और कहां से आया हूं और कहां जाऊंगा | Who Am I ?
Spiritual Articles Geeta Saar Hindi Blog Self Help Articles

Fatured Posts

Book Summaries

बदले अपनी सोच तो बदलेगा जीवन बुक समरी इन हिंदी में

Rich Dad Poor Dad Book Summary in Hindi

The Psychology Of Money Hindi Summary – With Pdf Download

Read More Book Summaries : Click Hare

Biographies

संत मीराबाई का जीवन परिचय हिंदी में 

Top 5 Powerful Real Life Inspirational Stories in Hindi

गौतम बुद्ध का जीवन परिचय और उनकी शिक्षाएं

Read More Biographies: Click hare

Motivational Stories

खुशी का मंत्र – Best Motivational Kahani In Hindi

जीवन की यात्रा – Hindi Motivational Story

चार रानियों वाला राजा – Short Motivational Kahani

Read More Stories: Click Hare

Motivational Quotes

Top 100 Bhagavad Gita Quotes in Hindi For Success

100 Inspirational Life Lessons In Hindi For Success

100+ प्रेरणादायक मोटिवेशनल कोट्स इन हिंदी में

Read More Motivational Quotes: Click Hare

Self Help Articles

जाने सफलता दिलाने वाले भगवान श्री कृष्ण के 10 उपदेश, आज से ही कर दे जीवन में अपनाना शुरू

Top 15 Best Hindi Youtube Channels Can Change Your Life

जानिए आलस क्यों आता है और आलस को कैसे दूर करें?

Read More Self Help Articles: Click Hare

Spiritual Articles

सफलता दिलाने वालें महात्मा बुद्ध के 10 उपदेश, आज से ही कर दें जीवन में अपनाना शुरू

गीता के ये 10 उपदेश आपकी जिंदगी बदल देंगे

Top 5 Shrimad Bhagwat Katha in Hindi | श्रीमद् भागवत कथा हिंदी में

Read More Spiritual Articles: Click hare

Pages

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Terms and Conditions
  • DMCA
Follow US
Copyright © 2020 - 2023 Knowledge Grow, All Rights Reserved.
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?