Top 15 Best Motivational Stories In Marathi For Success, Best Motivational Story In Marathi For Success, marathi motivational stories for students
नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मराठी मोटिवेशनल ब्लॉग वरती सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो जर तुम्ही प्रेरणादायी कथा मराठी मध्ये वाचणार असाल तर तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आला आहात. मिञांनो येथे तुम्हाला Top 15 Best Life Changing Motivational Stories In Marathi मध्ये वाचायला मिळतील, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील.
Top 15 Best Motivational Stories In Marathi For Success | प्रेरणादायी मराठी कथा
मित्रानो मी आज तुमच्या सोबत ज्या 15 प्रेरणादायी कथा मराठी मध्ये शेअर करणार आहे, त्या सर्व कथांना जर तुम्ही ध्यान पूर्वक वाचलात तर तुमचे आयुष्य बदलने निश्चित आहे. मित्रानो या सर्व कथांना एकत्रित करून एका आर्टिकलच्या रूपात मांडण्यासाठी खूप मेहनत लागते, म्हणून मित्रानो ह्या आर्टिकल ला शेवट पर्यंत अवश्य वाचा.
Best Motivational Story In Marathi For Success in Life
मित्रानो मी आज जी पहली स्टोरी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, ती स्टोरी वाचल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की “मला आजच काही तरी ऍक्शन घेतली पाहिजे आणि माझ्या ह्या मौल्यवान वेळेची एवढी Value आहे आणि मला आता पासूनच माझ्या मौल्यवान वेळेला वाचवायचे आहे आणि काही तरी मोठे करून दाखवायचे आहे.”
मित्रानो तुम्हाला ही स्टोरी तुमच्या आयुषभर लक्ष्यात राहणार आहे, कारण मिञांनो स्टोरी आपल्याला आयुषभर लक्ष्यात राहते परंतु जर आपण कोणता तरी लेसन शिकत असतो, तेंव्हा तो आपण काही दिवसांनंतर विसरून जातो पण कहानी आपल्याला कायमची लक्षात राहते. तर बिना टाइम वेस्ट करता चला तर मग आर्टिकल ची सुरुवात करूया.
मित्रानो ही स्टोरी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये वाचकांसाठी वाचण्यासाठी उपलब्ध आहे. जर कोण्ही हिंदी मध्ये वाचणार असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हिंदी मध्ये पण वाचू शकता.
- जरूर वाचा: Top 7 Best Motivational Story in Hindi For Success
- जरुर वाचा: आयुष्य बदलून टाकणाऱ्या 21 लघु कथा, वाचा जरूर
Motivational Story For Students in Marathi
मिञांनो ही कहाणी आहे एक अश्या राज्या ची जिथे दर 5 वर्षानंतर एका राजा ला चेंज करत असतात. मित्रानो जेव्हा कोणत्याही राजा चे 5 वर्ष पूर्ण होत असत, तेंव्हा त्यानंतर त्या राजाला चेंज करत असतात आणि त्या राजाला एक अश्या भयानक जंगलामध्ये पाठवत असतात.
जिथे खाण्या पिण्याची अजिबात सोय नसते आणि तिथे खूप जंगली प्राणी असतात, जे त्यांना खाऊन टाकत असतात. मित्रानो त्यानंतर एका राजा चे 5 वर्ष कंप्लीट होतात आणि मग त्या राजाला नवीन कपडे घातले जातात आणि त्या राजाला एका हत्तीवर बसवून त्या राजाला गूड बाय करण्यासाठी त्याला एका बोट मध्ये बसवले जाते.
आणि त्यानंतर त्या राजाला पाठवले जाते अश्या जंगलामध्ये जिथे खाण्या पिण्यासाठी काहीच सोय नसते आणि तिथे जंगली प्राणी खूप असतात जे त्यांना खाऊन टाकत असतात. मित्रानो जसे त्या राजाला त्या जंगलामध्ये पाठवले जाते, त्यानंतर त्या राज्याचे लोक विचार करतात की आता आमच्या राज्याचा नविन राजा कोण बनणार?
त्यानंतर त्या राज्यातील लोकांना कळते की आपल्या राज्यामध्ये एक असा व्यक्ती आहे, जो खूप हुशार आहे आणि त्याला आपल्या राज्याचा राजा बनवला पाहिजे. त्या नंतर त्या राज्याची सर्व लोक त्या हुशार व्यक्तीला भेटण्यासाठी जातात आणि त्या हुशार व्यक्तिला रिक्वेस्ट करतात की तुम्ही आमच्या राज्याचे नवीन राजा बनणार काय?
तर तो हुशार व्यक्ती त्यांना नाही म्हणतो, कारण त्याला आधीच सांगितले जाते की आम्ही आमच्या राज्यामध्ये दर 5 वर्षाला राजा चेंज केला जातो आणि त्या राजाला एका अश्या जंगला मध्ये पाठवले जाते, जिथे त्याला खाण्या पिण्यासाठी काहीच नसते आणि त्या जंगला मध्ये खूप जंगली प्राणी असतात जे त्यांना खाऊन टाकतात.
त्यानंतर त्या राज्याची सर्व लोक त्या हुशार व्यक्ति ला खूप रिक्वेस्ट करतात की तुम्ही खूप हुशार आणि चालाक आहात आणि तुम्ही आमच्या राज्याला खूप चांगल्या प्रकारे चालवाल. त्या सर्व लोकांच्या request नंतर तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा राजा बनण्यासाठी तयार होतो.
आणि त्या राज्याच्या लोकांच्या सर्व अटी ना पण स्वीकारतो, की मला माझे 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मला अशा जागेवरती पाठवले जाईल जिथे अजिबात जीवन नाही ये. त्या नंतर तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा नवीन राजा बनतो, तेझ्या 3 दिवसानंतर तो नवीन राजा आपल्या लोकांना विचारतो की “कोणते आहे ते ठिकाण जिथे सर्व राज्यांना 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाठवले जाते.”
त्या जागेची माहिती घेतल्यानंतर तो राजा आपल्या लोकांसोबत त्या ठिकाणी भेट देतो आणि तिथे जाऊन पाहतो की तिथे खूप राजांची मृतदेह पडलेले आहेत, आणी ते जंगल इतके घनदाट आसते की तिथे वेगवेगळ्या प्रकारची जंगली प्राणी राहत असतात.
हे सर्व पाहिल्यानंतर तो राजा आपली बुध्दी चालवतो आणि एक जबरदस्त प्लानिंग करतो. मित्रानो तो नवीन राजा त्या 5 वर्षामध्ये एक जबरदस्त प्लानिंग करतो आणि त्या प्लानिंग वर लगेच काम करायचा सुरुवात करतो.
जेव्हा तो राजा हे पाहतो की हे खूप घनदाट जंगल आहे आणि येथे खूप जंगली प्राणी आहेत आणि माझे 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला येथे पाठवले जाणार आहे, तेव्हा राजा असा विचार करतो की “5 वर्षानंतर मला तर येथे अजिबात यायचे नाही ये आणि यासाठी मला काही तरी केले पाहिजे.”
त्यानंतर तो नवीन राजा पहिल्या वर्षी त्या जंगला मधील सर्व झाडे कापून काढतो आणि त्या जागेवरच्या अश्या सर्व वस्तूंना काढून टाकतो, ज्यामुळे ते जंगल एवढे घनदाट दिसत होते. आणि तेथील साऱ्या जंगली प्राण्यांनाही तेथून काढून टाकतो.
दुसऱ्या वर्षी तो राजा त्या जागे वरती अजून काम करतों आणी त्या जागेला असे बनवतो की ते जंगल वाटले नाही पाहिजे. तिसऱ्या वर्षी त्या राजा ने त्या जागी एग्रीकल्चर चे काम सुरू केले गेले आणि चौथ्या वर्षी त्या ठिकाणी बिल्डिंग, कॉम्प्लेक्स आणि रस्ते बनवण्यास सुरू केली.
मिञांनो पाचव्या आणि शेवटच्या वर्षी त्या राजाने त्या ठिकाणावरती घरे बांधण्यासाठी आणि तिथे लोकांना राहण्यासाठी पण व्यवस्था करुन दिली गेली. आणि राजा हे सर्व काम करण्यासोबत तो बचत पन खूप करत होता आणि खर्च ही खूप कमी करत होता
कारण ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी सोडल्यावर ते सर्व पैसे तो खर्च करू शकेल “ज्याला तो गेल्या 5 वर्षा पासून तयार करत होता. मित्रानो त्या नंतर जसे त्या राजाचे 5 वर्षे कंप्लीट होतच असतात, तेव्हा तो राजा आपल्या राज्यातिल माणसांना असे म्हणतो की 👇👇👇
माझे 5 वर्षे आता कंप्लीट होणारच आहेत तर तूम्ही मला आता त्या जागेवर पाठवून द्या, ज्या जागेवर तुम्ही मला पाठवणार होता. तेव्हा त्या राज्याचे सर्व लोक त्याला असे म्हणतात की आजुन तुमची 5 वर्ष पूर्ण झाली नाही येत आणि 5 वर्ष कंप्लीट होण्यासाठी आजुन 10 दिवस बाकी आहेत.
मित्रानो त्या राजाला खूप Excitement होत असते, कारण राजाला त्या ठिकाणी पाठवणार होते, जिथे गेल्या पाच वर्षांपासून त्याने त्याच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची तयारी आधीच करून ठेवली होती.
जसे त्या राजाची ५ वर्षे पूर्ण होताच त्या राजाला ही नवीन वस्त्रे परिधान करण्यात येतात. आणि त्या राजाला गूड बाय करण्यासाठी त्याला हत्तीवर्ती बसवून त्याला त्या ठिकाणी पाठवले जाते. परंतु त्या राज्यातील लोकांनी असे पाहिले की , राजाला त्या ठिकाणी पाठवले जात आहे तरी ही तो राजा खुश आणि हसत जात आहे.
मित्रानो हेच्या आधी दर 5 वर्षानंतर असे होत होते की जेव्हा पण त्या राज्यातील राजाचे 5 वर्ष कंप्लीट होत होते, तेव्हा ते सर्व राजे रडत रडत जात होते, परंतु हा हुशार राजा हसत हसत जात आहे. मित्रानो जेव्हा लोकांनी त्या हुशार राजाला विचारले की तुम्ही हसत का आहात? म्हणजे तुम्ही इतके खुश का आहात?
तेव्हा तो हुशार राजा सर्वांना सांगतो की जेव्हा “तुम्ही ह्या जगा मध्ये येता म्हणजेच जेव्हा तुमचा जन्म होतो, तेव्हा सर्व जग खुश आसते आणि तुम्ही रडत असता, परंतु जाता जाता असे काही तरी करून जायचे की संपूर्ण जग रडेल आणि तुम्ही हसत हसत जाल.”
मित्रानो ही लाईन तुम्ही खूप वेळा लोकांच्या तोंडून एकली असेल. ठीक त्याच प्रमाणेच त्या राजाने तसे केले, त्यान आपली जिंदगी अशी बनवली होती की तो हसत हसत त्या ठिकाणी जात होता.
मित्रानो त्यानंतर तो राजा म्हणतो की हे च्या आधी जितके राजा आले होते, ते त्या 5 वर्षा मध्ये राज्य चालवण्यात, ऐश आणि मज्या करण्यामध्ये एवढे हरवून जात होते की, ते हे विसरून जात होते की 5 वर्षानंतर त्यांना एका अश्या ठिकाणी पाठवले जाणार आहे की जिथे त्यांना मरावे लागणार आहे.
परंतु मी या 5 वर्षामध्ये त्या जागेला व्यवस्थित केले, कारण मला माहित होते की 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला तिथे पाठवले जाणार आहे. एक अश्या ठिकाणी जिथे जीवन नाहीये. म्हणून मी त्या वरती काम केले आणि माझ्याकडे काम करण्यासाठी हाच टाईम होता.
मी राज्याचा राजा जरूर होतो पण मी हे विसरलो नाही की माझा येणारा टाइम कसा असणार आहे, म्हणून मी माझ्या भविष्याची प्लानिंग केली आणि त्या वरती काम करणे सुरू केले. मित्रानो तो हुशार राजा जेव्हा राज्य सोडून जातो तेव्हा तो खुशी मध्ये जातो.
जाताना तो आपली सेविंग्स पण आपल्या सोबत घेऊन जातो, जी त्याने गेल्या 5 वर्षामध्ये केली गेली होती. राजा बनल्यानंतर त्याने जास्त खर्च पण केला नव्हता आणि त्या राजाने आपले भविष्य संभाळले आणि त्यावर त्याने काम केले.
Moral of Marathi Motivational Stories For Students
मित्रांनो ह्या स्टोरी मधून आपल्याला हे शिकायला मिळते की “आपणाला आपल्या आयुष्यामध्ये थोडीच टायमिंग मिळते आपल्या आयुष्याला चांगल्या प्रकारचे बनवण्यासाठी.” मित्रानो जर तुम्ही पण माझ्या वयाचे असाल म्हणजेच तुमची Age 18 ते 25 वर्षाच्या मध्ये आहे तर ही Age तुमची Golden Age आहे.
मित्रानो ह्या गोल्डन Age मध्ये तुम्हाला जेवढा पण जोश मिळत आहे आणि तुमच्यामध्ये जेवढी पण Excitement आहे ती तुमच्या दुसऱ्या Age मध्ये नसते. म्हणून ह्या वयामध्ये मध्ये तुम्हाला एवढी मेहनत करायची आहे की तुमचे पुढचे भविष्य चांगले झाले पाहिजे.
कारण मित्रानो जर तुम्ही ह्या वयामध्ये फक्त एंजॉय आणि टाइम वेस्ट करत असाल तर, पुढे भविष्यात असे होऊ शकते की तुम्हाला पण बाकी राजानं प्रमाणे एक अश्या जंगलामध्ये जावे लागेल म्हणजेच अश्या गरिबी मध्ये जगावे लागेल जिथे तुम्हाला तुमची गरिबीच खाऊन टाकेल.
मित्रानो जर तुम्ही त्या हुशार आणि genius राजा प्रमाणे आपल्या आयुष्याची प्लानिंग केली आणि त्यावर काम करणे आता पासूनच सुरू केले तर तुमच्या येणाऱ्या टायमिंग मध्ये तुमची लाईफ तुम्ही चांगल्या प्रकारे जगू शकाल.
मिञांनो बिलकुल त्या हुशार आणि चतुर राजा प्रमाणे, ज्याने आपल्यासाठी त्या घनदाट जंगलाचे रूपांतर एका kingdom मध्ये केले होते, एक संपूर्ण असे एक वेगळे राज्य बनवले होते. मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनातील राज्य बनवत आहात की फक्तं तुमच्या जीवनातील राज्याला फक्त जंगलच जंगल बनवत आहात?
मित्रानो ही स्टोरी तुम्हाला तुमच्या आयुषभर लक्षात राहणार आहे, 10 वर्षानंतर जर कोणत्या व्यक्तीने तुम्हाला ही स्टोरी ऐकवली तर तुम्ही म्हणाल की हि स्टोरी मी आधी कुठे तरी ऐकली होती. कारण मित्रानो स्टोरी आपल्या लक्ष्यात राहते पण कोण्ही बोलल्याले आपण काही दिवसानंतर विसरून जातो.
- हे पण वाचा: Top 3 Life Changing Hari Katha In Marathi With Moral
- जरुर वाचा: आयुष्य बदलून टाकणाऱ्या 21 लघु कथा, वाचा जरूर
Best Motivational Bodh Katha in Marathi
मित्रांनो एक मिडास नावाचा एक राजा होता. त्याच्याजवळ सोनं दागिने खूप होते आणि जितकं त्याला अधिक सोनं मिळे तितकी त्याला अधिक हाव सुटे. त्याने सगळं सोनं आपल्या खजिन्यात ठेवलं होतं आणि त्या सोन्याच्या साठ्याकडे बघण्यात तो दिवस घालवत असे.
एक दिवस एक अपरिचित व्यक्ती तेथे आली आणि त्याला म्हणाली तुला काय पाहिजे ते माग. राजा आनंदानं म्हणाला, मी ज्याला स्पर्श करीन त्याचं सोनं होऊ दे. त्या व्यक्तीनं विचारलं “नक्की तुला हेच हवं ना ?” राजाने उत्तर दिलं “होय.” ती व्यक्ती म्हणाली “उद्या सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर तुला ही सिद्धी प्राप्त होईल.”
तू ज्याला हात लावशील ती वस्तू सोन्याची होईल. राजाला वाटलं हे काही खरं नसावं , आपण बहुधा स्वप्न पाहत असणार. दुसऱ्या दिवशी त्याने उठल्याबरोबर पलंगाला आणि आपल्या कपड्यांना स्पर्श केला आणि त्या सगळ्याचं सोन्यात रूपांतर झालं . त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं, त्याची मुलगी बागेत खेळत होती.
त्याने तिला हा चमत्कार दाखवून आश्चर्यचकित करायचं ठरवलं. त्यामुळे तिला आनंद होईल असं त्याला वाटलं. परंतु बागेत जाण्यापूर्वी त्याने एक पुस्तक वाचायचं ठरवलं त्याने पुस्तकाला स्पर्श केला , तर ते पुस्तक सोन्याचं झालं, नंतर तो नाश्ता करण्यासाठी गेला.
त्याने ज्या फळांना, भांड्यांना स्पर्श केला त्या सर्व वस्तू सोन्याच्या बनल्या. त्याला भूक लागली होती. तो स्वतःशीच म्हणाला, मी काही सोनं खाऊ – पिऊ शकत नाही. त्याच वेळी त्याची मुलगी धावत आली आणि त्याने तिला जवळ घेतले तर तिचंही सोन्याच्या पुतळ्यात रूपांतर झालं.
राजाच्या चेहऱ्यावरचा आनंद आता मावळला आणि आता राजाने मान खाली घातली आणि तो रडू लागला. राजाला वर देणारी ती व्यक्ती पुन्हा तेथे आली आणि मिळालेल्या वरदानामुळे राजा आनंदात आहे ना, असं तिने विचारलं. राजा म्हणाला , “मी तर सर्वात दुःखी माणूस आहे.
त्या अपरिचित व्यक्तीने विचारलं , तुला काय हवंय ? अन्न आणि तुझी लाडकी मुलगी का सोन्याचे गोळे आणि तुझ्या मुलीचा सोन्याचा पुतळा ? राजा क्षमा मागून म्हणाला, मी माझं सगळं सोनं देऊन टाकतो. कृपा करून मला माझी मुलगी परत दे . कारण या सगळ्या सोन्या पेक्षा ही माझी मुलगी मला मोलाची आहे.
तिच्यापुढे या सगळ्या सोन्याची किंमत शून्य आहे. ती व्यक्ती म्हणाली, आता तू शहाणा झाला आहेस. त्या व्यक्तीने दिलेला वर परत घेतला. राजाला त्याची लाडकी मुलगी परत मिळाली आणि त्याला असा धडा मिळाला , जो पुढच्या आयुष्यात तो कधीही विसरला नाही.
मित्रांनो या कहानीतून आपल्याला शिकायला मिळाले की 👇👇👇
1. वाईट किंवा विकृत जीवन मूल्यांमुळे दुःखच वाट्याला येतं.
2. काही वेळा तुम्हाला पाहिजे ते मिळणं , हे पाहिजे ते न मिळण्यापेक्षाही अधिक दुःखद असतं.
3. मैदानावरचा खेळ खेळताना गडी बदलता येतात. परंतु आयुष्याच्या खेळात खेळाडूही बदलता येत नाहीत किंवा अजून एक संधी म्हणून पुन्हा चालही मिळत नाही. तसंच गोष्टीतल्या मिडास राजा प्रमाणे आपली चूक दुरुस्त करून आपले भविष्य सुधारण्याची संधी मिळेलच असं नाही.
- जरुर वाचा: आयुष्य बदलून टाकणाऱ्या 21 लघु कथा, वाचा जरूर
Heart Touching Story in Marathi – एक पिल्लू
एक मुलगा पाळीव प्राण्यांच्या दुकानात एक कुत्र्याचं पिल्लू खरेदी करायला गेला . तिथे चार पिल्लं एकत्र बसली होती. त्यांची किंमत प्रत्येकी ५० डॉलर्स होती. तिथंच कोपऱ्यात एकटंच बसलेलं एक पिल्लू ही होतं. त्या मुलाने ते पिल्लू त्या बाकीच्या पिल्लां पैकीच आहे का, आणि तेही विकायला आहे का , ते असं एकटंच का बसलंय, असं विचारलं.
त्या दुकानदाराने सांगितलं की ते पिल्लू त्या बाकीच्या पिल्लांपैकीच आहे, परंतु ते अपंग आहे आणि विकायला ठेवलेलं नाही. त्या मुलाने त्या पिल्लात कोणता दोष आहे, असं विचारलं . दुकानदाराने सांगितलं , या पिल्लाला जन्मापासून एक पाय नाही.
त्यानंतर त्या मुलाने विचारलं की या पिल्लाचं तुम्ही काय करणार ? याचं उत्तर होतं की त्याला कायमचं झोपवून टाकलं जाईल . त्या मुलाने त्या पिल्लाशी खेळू का म्हणून विचारलं. दुकानदार म्हणाला , खेळ की. मुलाने कुत्र्याला उचललं आणि कुत्र्याने त्याचे कान चाटले.
त्याचक्षणी मुलाने ठरवलं की हेच पिल्लू आपण विकत घ्यायचं. दुकानदार म्हणाला, पण ते विकायचं नाहीये. पण त्या मुलाने आग्रहच धरला. शेवटी दुकानदार ते पिल्लू विकायला तयार झाला. मुलाने खिशातून पैसे काढले आणि त्या दुकानदाराला दिले. नंतर दुकानदार त्या मुलाला म्हणाला की 👇👇
मला कळत नाही , या पिल्लासाठी तू एवढे पैसे का खर्च करतोयस . याच पैशात तू दुसरं चांगलं पिल्लू घेऊ शकशील. तो काही न बोलता त्या मुलाने फक्त डाव्या पायावरची पँट वर केली. मुलाचा अधू पायासाठीचा धातूचा आधार असणारा त्या पायातील बूट दुकानदाराने पाहिला.
दुकानदार म्हणाला की आलं माझ्या लक्षात ठीक आहे, तू घे हे पिल्लू . मिञांनो यातून दिसते ती समानुभूती. म्हणुन मिञांनो सहानुभूती असू दया . दुःख वाटल्यानं कमी होतं आणि आनंद वाटल्यानं वाढतो.
Heart Touching Friendship Story in Marathi – दोन मित्रांची कहाणी
मिञांनो ही गोष्ट आहे दोन मित्रांची. हॅरी आणि बिल लहानपणा पासूनचे मित्र होते. ते शाळेत व कॉलेजमध्ये बरोबर होते आणि लष्करातही एकत्र भरती झाले. युद्ध सुरू झाले आणि ते एकाच तुकडीतून लढाई करत होते. एका रात्री ते दबा धरून बसले होते.
चहूबाजूंनी बंदुकीच्या गोळ्यांचा मारा होत होता. तशातच अंधारातून आवाज आला , हॅरी , कृपा करून ये आणि मला मदत कर. मग हॅरी ने बिलच्या मदतीला जाण्यासाठी कॅप्टन कडून परवानगी मागितली. कॅप्टन म्हणाला, मी तुला परवानगी देऊ शकत नाही. कारन माझ्याकडे आधीच कमी माणसं आहेत आणि मी माझा आणखी एक माणूस गमावणं मला परवडणार नाही.
शिवाय बिलच्या आवाजावरून तो जगेल असं वाटत नाही. हॅरी गप्प बसला. परत आवाज आला , हॅरी कृपा करून ये आणि मला मदत कर. कॅप्टनने आधीच परवानगी नाकारल्यामुळे हॅरी गप्प बसला . पुन्हा पुन्हा आवाज येऊ लागला. हॅरीला अधिक थांबवेना आणि तो कॅप्टनला म्हणाला कॅप्टन, हा माझा लहानपणचा दोस्त आहे आणि मला त्याच्या मदतीला गेलंच पाहिजे.
कॅप्टनने नाखुषीनेच त्याला जाण्याची परवानगी दिली. हॅरी अंधारात रांगत गेला आणि त्याने बिलला खंदकात ओढून आणलं. कॅप्टननं पाहिलं की बिल मेला होता. ते पाहून कॅप्टनला राग आला आणि तो ओरडला आणि हॅरी ला म्हणाला की 👇👇👇
मी तुला सांगितलं होतं ना की तो जगणार नाही म्हणून. तो मेलाय आणि त्याच्या सोबत तू सुद्धा मेला असतास आणि माझा आनी एक माणूस कमी झाला असता. तुझं हे वागणं चुकीचं होतं. हॅरीने उत्तर दिलं की कॅप्टन , मी योग्य तेच केलं . मी बिलजवळ पोचलो तेव्हा तो जिवंत होता आणि त्याचे शेवटचे शब्द होते की 👇👇👇
“हॅरी , मला खात्री होती तू येशील.”
मित्रानो चांगले संबंध जुळून यायला वेळ लागतो पण एकदा ते जुळले की ते जोपासावे लागतात.
- जरूर वाचा: Top 5 Heart Touching Story on Friendship in Hindi
Real Life Inspirational Story in Marathi – विल्मा रुडॉल्फ ची कहाणी
विल्मा रुडॉल्फ हिचा जन्म अमेरिकेतील टेनेसी येथील एका गरीब कुटुंबात झाला होता. वयाच्या चवथ्या वर्षी एकाच वेळी न्युमोनिया आणि लोहितांग ज्वर ने तिच्या दोन्ही फुफ्फुसांवर हल्ला चढवला. हे दोन्ही आजार एकाच वेळी होणं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच.
यामुळे तिला पोलिओ होऊन ती पांगळी झाली. आधारासाठी सळई असलेले बूट चालायला ती वापरू लागली. तुला कधीही जमिनीवर पाय ठेवता येणार नाही, असं डॉक्टरांनी तिला सांगितलं. परंतु तिची आई तिला प्रोत्साहन देत राहिली. ती विल्माला म्हणाली की 👇👇👇
“देवाने दिलेली क्षमता, चिकाटी आणि विश्वास याच्या आधाराने तू तुला पाहिजे ते हस्तगत करू शकशील. विल्मा म्हणाली की मला जगातील वेगवान धावपटू व्हायचं आहे . वयाच्या नवव्या वर्षी डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावून तिने आधाराचे बूट काढून टाकले.
ती जमिनीवर कधीही पाय टाकू शकणार नाही असे डॉक्टर म्हणाले होते. पण तिने पहिले पाऊल टाकलं आणि वयाच्या तेराव्या वर्षी तिने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. अगदी मागे मागे राहत ती शेवटी आली. पण ती दुसऱ्या तिसऱ्या चवथ्या स्पर्धेत भाग घेतच राहिली.
असं करता करता शेवटी एक दिवस ती पहिली आली. वयाच्या पंधराव्या वर्षी ती टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीत गेली आणि तेथे तिला एड टेंपल नावाचा प्रशिक्षक भेटला . ती त्याला म्हणाली की मला जगातील सर्वात वेगवान धावपटू व्हायचे आहे. टेंपल म्हणाले की 👇👇👇
“तुझी जर तशीच जिद्द असेल तर तुला कोणी थांबवू शकणार नाही.”
मी तुला मदत करीन. आणि एके दिवशी ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली. ऑलिम्पिकमध्ये तर उत्तमातील उत्तमाशी तुमची स्पर्धा असते. ज्युटा हेन नावाच्या धावपटूबरोबर विल्माची स्पर्धा होती.
ज्युटा हेन तोपर्यंत एकदाही पराभूत झाली नव्हती. सर्वात प्रथम १०० मीटरची शर्यत होती आणि विल्माने ज्युटा हेनला हरवलं आणि पहिलं सुवर्णपदक मिळवलं . दुसरी शर्यत २०० मीटरची होती. विल्माने ज्युटाला दुसऱ्यांदा हरवलं आणि दुसरं सुवर्णपदक जिंकलं . तिसरी ४०० मीटर रीलेची शर्यत होती आणि पुन्हा एकदा विल्माची ज्युटाशी गाठ होती.
रीलेमध्ये सर्वात वेगवान धावपटू शेवटच्या टप्प्यात धावतो. त्या दोघीही आपापल्या संघाच्या आधारस्तंभ होत्या. पहिल्या तीन धावपटू व्यवस्थित धावल्या आणि त्यांनी बॅटन व्यवस्थित हाताळलं. विल्माच्या वेळी मात्र तिच्या हातून बॅटन खाली पडलं.
परंतु दुसऱ्या टोकाला ज्युटाला वेग घेताना पाहिलं आणि तिनं बॅटन उचललं , अचाट वेगाने यंत्रवत धावून तिसऱ्यांदा तिनं ज्युटाला हरवलं आणि तिसरं सुवर्णपदक पटकावलं आणि इतिहास घडवला. पोलिओने अपंग झालेली महिला 1960 च्या ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली.
मिञांनो विल्माची कहाणी आपल्याला केवढा मोठा धडा शिकवते ! समस्येविना नाही तर समस्या असूनही यश मिळवता येते याचे विल्मा हे अलौकिक प्रतीक आहे.
मित्रानो प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रूपांतर करणाऱ्या लोकांच्या कहाण्या आपण ऐकतो किंवा वाचतो, तेव्हा आपल्यालाही प्रेरणा मिळते. आपण जर अशा लोकांची चरित्रं किंवा आत्मचरित्रं नेहमी वाचली तर ध्येयपूर्तीसाठी, उत्कर्षासाठी सदैव चालना मिळत राहील , नाही का ?
- जरुर वाचा: आयुष्य बदलून टाकणाऱ्या 21 लघु कथा, वाचा जरूर
- हे पण वाचा: Top 3 Life Changing Hari Katha In Marathi With Moral
Short Motivational Story in Marathi For Success – लक्ष्य
मिञांनो तुम्हाला अर्जुनाची ती गोष्ट माहीतच असेल, जर नसेल माहीत तर मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रानो गुरू द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विदया शिकवत होते. आणि त्यांनी लक्ष्य म्हणून एक लाकडी पक्षी झाडावर ठेवला आणि शिष्यांना पक्ष्याला बाण मारायला सांगितलं.
त्यांनी पहिल्या शिष्याला विचारलं , तुला काय काय दिसत आहे ? तो म्हणाला मला झाड , फांदया , पानं , आकाश , पक्षी दिसतोय . द्रोणाचार्यांनी त्या शिष्याला थांबायला सांगितलं. नंतर त्यांनी अर्जुनाला तोच प्रश्न विचारला . अर्जुन उत्तर असे उत्तरं दिले की 👇👇👇
मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतोय. द्रोणाचार्य म्हणाले , फार छान , मार बाण. बाण सरळ गेला आणि पक्ष्याच्या डोळ्यात घुसला. मित्रानो या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की 👇👇👇
ध्येयावर लक्ष केंद्रित केल्या शिवाय आपल्याला आपलं ध्येय गाठता येणार नाही. ध्येयावर लक्ष केंद्रित करणं आणि त्या ठिकाणी सर्व बळ एकवटणं हे अवघड आहे, परंतु ही कला शिकणं शक्य आहे. म्हणुन मित्रानो आयुष्याच्या महामार्गावरून प्रवास करताना तुमची नजर ध्येयावर असू दया.
- जरूर वाचा: 15 सफल लोगों की असफलता की कहानियां
Inspiring Story in Marathi – तुमचं आयुष्य वाचवण्या लायक आहे का ?
एक मुलगा नदीत बुडत होता, आणि मदतीसाठी तो ओरडत होता. तिकडून जाणाऱ्या एका माणसाने नदीत उडी मारली आणि त्या मुलाला वाचवलं. त्या मुलाने त्या माणसाचे आभार मानले . त्या माणसानं विचारलं, कशाबद्दल ?
त्या मुलाने उत्तर दिले , मला वाचवल्याबद्दल. त्या माणसाने मुलाकडे एकवार निरखून पाहिलं आणि म्हणाला की “मुला तू मोठा होशील तेव्हा आपलं आयुष्य वाचवण्या लायक होतं हे सार्थ कर.”
मिञांनो विचार करण्याची हीच वेळ आहे. अंतर्मनाची अशी साद म्हणजे जागं होण्यासाठीचा आपल्याला मिळालेला इशाराच होय. समाधाना शिवाय यशाला काही अर्थ नाही.
माणसाजवळ कितीही प्रतिष्ठा, पैसा आणि पदव्या असल्या तरी निश्चित उद्दिष्ट आणि जीवनदृष्टी नसेल तर आयुष्य रितं, भकास असतं.
Motivational Short Story in Marathi – Moral Stories in Marathi
जीवशास्त्राचे एक शिक्षक सुरवंटाचं फुलपाखरू कसं होतं ते समोर सुरवंटाचा कोश ठेवून विदयार्थ्यांना समजावून सांगत होते. त्यांनी सांगितलं की पुढच्या दोन तासांत फुलपाखरू कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल; परंतु तुम्ही कोणीही फुलपाखराला मदत करू नका. एवढं सांगून ते शिक्षक निघून गेले.
विदयार्थी वाट पाहत होते ती घटना अखेर सुरू झाली. फुलपाखरू कोशातून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागलं. ते पाहून एका विद्यार्थ्यानं फुलपाखराला कोशातून बाहेर येण्यास मदत करण्याचं ठरवलं. शिक्षकांनी दिलेल्या सूचनेकडे त्याने साफ दुर्लक्ष केलं.
फुलपाखराला अधिक धडपड करावी लागू नये म्हणून त्याने कोश फोडला. परंतु थोड्याच वेळात फुलपाखरू मेलं. शिक्षक परत आल्यावर त्यांना सर्व समजलं. मग तेव्हा त्यांनी असं का घडलं ते सांगितलं. खरं म्हणजे त्या मुलानं फुलपाखराला कोशातून बाहेर येण्यास मदत केली म्हणूनच त्या फुलपाखराचा जीव गेला.
कोशातून बाहेर पडण्यासाठी फुलपाखराला जो प्रयत्न व संघर्ष करावा लागतो, त्यामुळे त्याचे पंख बळकट व विकसित होतात . त्या मुलानं फुलपाखराला त्या प्रयत्नापासून वंचित केलं आणि त्यामुळे फुलपाखरू मेलं. हेच तत्त्व आपल्या आयुष्याला लागू करून पहा.
आयुष्यात प्रयत्नाशिवाय , संघर्षाशिवाय काहीच चांगलं निर्माण होत नाही. आपण जर आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांतून समर्थ होण्यासाठी धडपडू दिलं नाही तर आपण खरं म्हणजे त्यांचे आईवडील या नात्याने नुकसान करत असतो.
Marathi Motivational Story – यशाचे रहस्य
एकदा एका तरुणानं सॉक्रेटिसला यश मिळवण्याचं रहस्य विचारलं. सॉक्रेटिसने त्याला दुसऱ्या दिवशी नदीजवळ भेट म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे ते दोघे दुसऱ्या दिवशी सकाळी भेटले. सॉक्रेटिसने त्याला आपल्याबरोबर नदीच्या दिशेने चालायला सांगितलं.
असं करत ते नदीच्या पात्रातून चालू लागले. पाणी जेव्हा त्यांच्या गळ्यापाशी आलं तेव्हा सॉक्रेटिसने अचानक त्या तरुणाचं डोकं पाण्याखाली दाबलं. त्या तरुणाने डोकं वर काढण्याचा खूप प्रयत्न केला , पण सॉक्रेटिसची पकड घट्ट होती . तो तरुण काळानिळा पडेपर्यंत सॉक्रेटिसने त्याचं डोकं पाण्याखाली दाबून धरलं.
सॉक्रेटिसने तरुणाचं डोकं पाण्याबाहेर काढलं तेव्हा त्या तरुणाने पहिली गोष्ट कोणती केली तर धापा टाकत एक दीर्घ श्वास घेतला. सॉक्रेटिसने त्या तरुणाला विचारलं, तू पाण्यात असताना तुला सर्वाधिक गरज कशाची वाटली ? त्या तरुणाने उत्तर दिलं, हवेची. सॉक्रेटिस म्हणाला, ” हेच यशाचं रहस्य आहे.
तुला जेवढ्या तीव्रतेने हवेची गरज वाटली तेवढ्याच तीव्रतेने यशाची ओढ लागेल तेव्हा तुला ते मिळेल. ” खरोखरच यशाचं यापेक्षा दुसरं रहस्य काही नाही.”
जरुर वाचा: Think and Grow Rich Marathi Summary – With Marathi Pdf Download
Positive Motivational Stories in Marathi – दुसऱ्याचा विचार करणं
एकदा एक दहा वर्षांचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला. तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं की आईस्क्रीम कोन केवढ्याला आहे ? वेटर म्हणाला , तीन रुपये. तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला . नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला आहे असं विचारलं.
वेटरने त्रासिकपणे उत्तर दिलं , अडीच रुपये. तो मुलगा म्हणाला , मला आईस्क्रीमचा लहान कप दया. त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिलं आणि तो गेला. वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं.
कपाजवळ आठ आणे त्याने टीप म्हणून ठेवले होते. आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने वेटरचा विचार केला होता. त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती. स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता.
मिञांनो जर आपन सगळे त्या लहान मुलाप्रमाणे दुसऱ्याचा विचार करायला लागलो तर हे जग किती सुंदर होईल! दुसऱ्याचा विचार करून त्याच्याशी सौजन्याने आणि नम्रतेने वागा. कारण विचारपूर्वक वागण्यातून दुसऱ्याची कदर करण्याची वृत्ती दिसून येते.
Best Motivational Story in Marathi – बुद्धीरूपी कुऱ्हाड
एक लाकूड तोड्या जॉन एका कंपनीमध्ये पाच वर्षे काम करीत होता. त्या पाच वर्षांत त्याला एकदाही पगारवाढ मिळाली नाही . मात्र त्याच्यानंतर कामाला लागलेल्या बिल नावाच्या नव्या लाकूडतोड्याला वर्षाच्या आतच पगारवाढ मिळाली.
हे पाहून जॉनला फार वाईट वाटले आणि त्याने मालकाकडे हा विषय काढला. मालक म्हणाला की “तू पाच वर्षापूर्वी जितकी झाडं तोडत होतास तितकीच झाडं आज ही तोडतोस.” आम्हाला काम करणारी माणसं हवीत. तुझी उत्पादन क्षमता वाढली तर तुझा पगार आम्ही आनंदाने वाढवू.
जॉनने खूप प्रयत्न केला पण त्याला अधिक झाडं तोडता येईनात . निराश होऊन तो पुन्हा मालकाला भेटला. त्याने जॉनला बिलचा सल्ला घेण्याची सूचना केली. तो म्हणाला की कदाचित आपणा दोघांना माहीत नसलेली एखादी महत्त्वाची गोष्ट बिलला माहीत असेल.
जॉनने बिलला विचारल्यावर तो म्हणाला की एक झाड तोडलं की मी दोन तीन मिनिटे थांबतो आणि कुऱ्हाडीला धार लावतो. तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटची धार कधी लावली होतीस? “या प्रश्नाने जॉनचे डोळे उघडले. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं .
मित्रांनो मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होती? मिञांनो गतवैभव आणि शिक्षण फारसे उपयोगी पडत नाहीत. आपण आपल्या बुद्धीला सदैव धारदार ठेवलं पाहिजे.
Short Motivational Stories in Marathi With Moral
मिञांनो ही गोष्ट रशियातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची आहे. एकदा त्याला राजाकडून असं वचन मिळालं की तो एका दिवसात जेवढं चालेल तेवढी जमीन त्याची होईल. त्यासाठी अट अशी होती की जिथून तो सुरुवात करेल त्या ठिकाणी त्याने सूर्यास्तापूर्वी परत यायचं.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच त्या श्रीमंत शेतकऱ्याने वेगात चालायला सुरुवात केली; कारण जास्तीत जास्त जमीन त्याला मिळवायची होती. दुपारी तो दमला तरी चालत राहिला ; कारण अजून श्रीमंत व्हायची आयुष्यात एकदाच मिळणारी ही संधी त्याला घालवायची नव्हती.
दुपार सरत आल्यावर घातलेली अट त्याला आठवली. जिथून सुरुवात केली तिथं सूर्यास्तापूर्वी त्याला परत जायचं होतं. जास्तीत जास्त जमीन मिळवायच्या लोभामुळे तो आता खूप दूर आला होता. त्यानं आता परतीचा प्रवास सुरू केला आणि त्याचं लक्ष सूर्यास्ताकडे होतं.
सूर्यास्त जवळ येऊ लागला तसा तो अधिक जोरात पळू लागला. पळता पळता तो पूर्णपणे थकला , त्याला श्वास घेता येईना. तरीही सर्व शक्ती पणाला लावून तो पळत राहिला आणि सुरुवातीच्या ठिकाणी येऊन पोहोचला. पण तिथंच तो खाली पडला आणि मेला.
तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागी तर पोहोचला. राजाने त्याला सर्व जमीन दिली, पण शेवटी त्याला पुरण्यात आलं. त्यासाठी त्याला फक्त साडेतीन हात जागा लागली. या गोष्टीत एक मोठंच सत्य दडलं आहे. तो शेतकरी श्रीमंत होता का नव्हता हे महत्त्वाचं नाही , अतिहव्यास धरलेल्या कोणत्याही माणसाचा शेवट याच पद्धतीने होतो.
Short Marathi Motivational Stories For Students
आयुष्य एक प्रतिध्वनी आहे. एक छोटा मुलगा आईवर रागावला आणि ओरडू लागला की मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस. शिक्षेच्या भीतीने तो घरातून बाहेर पळाला. तो एका दरीपाशी आला आणि ओरडू लागला की मला तू आवडत नाहीस , मला तू आवडत नाहीस.
आणि दरीतून प्रतिध्वनी आला, मला तू आवडत नाहीस , मला तू आवडत नाहीस. “त्या छोट्या मुलाने आयुष्यात प्रथमच प्रतिध्वनी ऐकला होता . तो घाबरून परत आईकडे आला आणि म्हणाला की आई आई , दरीत एक दुष्ट मुलगा आहे ; तो मला तू आवडत नाहीस , असं ओरडतोय.
आईच्या लक्षात सर्वकाही आलं आणि तिनं मुलाला परत दरीकडं जायला आणि ‘ मला तू आवडतोस , असं ओरडायला सांगितलं. तो मुलगा दरीजवळ तिथं गेला आणि ओरडला, मला तू आवडतोस. दरीतून तसाच प्रतिध्वनी आला. त्या छोट्या मुलाला एक चांगला धडा मिळाला की 👇👇👇
आपलं आयुष्य हे प्रतिध्वनीसारखं आहे : आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. मिञांनो बेंजामिन फ्रँकलिन जी असे म्हणाले होते की “तुम्ही जेव्हा इतरांशी चांगलं वागत असता तेव्हा तुम्ही स्वतःशी उत्तम वागत असता.”
Inspirational Story in Marathi For Success
छोट्या छोट्या गोष्टींनीच मोठा फरक पडतो .
मिञांनो एक माणूस पहाटे समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला होता. त्याला असं दिसलं की पहाटेच्या भरतीच्या लाटांबरोबर शेकडो ‘स्टारफिश ‘ किनाऱ्यावर आलेले होते आणि भरतीचा ओघ ओसरल्यावर पाणी निघून गेल्यामुळे ते किनाऱ्यावरच अडकून पडले होते.
उगवत्या उन्हाबरोबर ते मरणार हे अगदी निश्चित होते. भरती अगदी नुकतीच येऊन गेल्यामुळे त्या (स्टार फिश) अजून जिवंत होत्या. तो माणूस थोडासा पुढे गेला, आणि त्याने एक स्टारफिश उचलला आणि पाण्यात फेकला. मग दुसरा , तिसरा असे त्याचे काम चालू राहिले.
त्याला तेथून जाणाऱ्या दुसऱ्या एका माणसाने विचारले की तू हे काय करतोयस? इथे शेकडो स्टारफिश आहेत. तू किती जणांना मदत करू शकशील? आणि त्याने काय फरक पडणार आहे ? त्या माणसाने काही उत्तर दिलं नाही, तो दोन पावलं पुढे गेला. आणखी एक स्टारफिश पकडून त्याने पाण्यात फेकला आणि म्हणाला की 👇👇
त्याने या स्टारफिशला फरक पडतो. ही गोष्ट मोठी विचार करण्यासारखी आहे . आपण स्वतः असा काही फरक किंवा बदल घडवत आहोत का ? बदल घडवून आणण्यासाठी कोण किती मोठा आहे किंवा लहान आहे याने काही फरक पडत नाही .
मिञांनो जर प्रत्येकानेच अगदी थोडासा जरी बदल घडवून आणला तरी आपण सगळे मिळून एक मोठा बदल घडवून आणू शकतो, नाही का ?
Motivational Story in Marathi For Success – चंडोल पक्ष्याची गोष्ट
एकदा एका जंगलात एक चंडोल पक्षी गात होता. आणि एक माणूस अळ्यांनी भरलेला डबा घेऊन आला. चंडोल पक्ष्याने त्याला विचारलं, तू कुठं चालला आहेस ? तुझ्या डब्यात काय आहे ? तेंव्हा त्या शेतकऱ्याने उत्तर दिलं , डब्यात अळ्या आहेत आणि त्या घेऊन मी बाजारात चाललो आहे .
बाजारात अळ्या विकून मी पिसं घेणार आहे. चंडोल पक्षी म्हणाला की माझ्याजवळ खूप पिसं आहेत, मी एक पीस काढून तुला देईन म्हणजे मला अळ्या शोधाव्या लागणार नाहीत. शेतकऱ्याने चंडोल पक्ष्याला अळ्या दिल्या आणि त्या बदल्यात पक्ष्याने त्याला आपले एक पीस उपटून दिलं.
दुसऱ्या दिवशी तसंच घडलं . दिवसामागून दिवस तसंच घडत गेलं आणि शेवटी चंडोल पक्ष्याच्या शरीरावर एकही पीस राहिलं नाही. आता त्याला उडताही येत नव्हतं आणि अळ्याही शोधता येत नव्हत्या. तो कुरूप दिसू लागला आणि त्याचं गाणं थांबलं आणि लवकरच तो मरून गेला.
या गोष्टीचं तात्पर्य काय ? तात्पर्य अगदी स्पष्ट आहे – चंडोल पक्ष्याला अन्न मिळवायचा जो मार्ग सोपा वाटला होता , तो प्रत्यक्षात त्याच्या साठी खडतर मार्ग निघाला.
मिञांनो आपल्या आयुष्यातही असंच घडतं, पुष्कळ वेळा आपण सोप्या मार्गाच्या , सहज साध्याच्या शोधात असतो , पण वास्तवात तोच मार्ग कठीण निघतो.
Motivational Story For Students in Marathi With Moral
मित्रानो तुम्हा सर्वांना लांडगा आला असं ओरडणाऱ्या धनगराच्या मुलाची गोष्ट माहीत आहे. गावातल्या लोकांची थोडी मजा करायची म्हणून तो ओरडला वाचवा ! वाचवा ! लांडगा आला रे आला. आणि गावातले लोक त्याचं ओरडणं त्याच्या मदतीला धावून आले.
परंतु त्यांना लांडगा काही दिसला नाही. कशी फजिती केली म्हणून तो मुलगा त्यांना हसला आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी तो मुलगा तसाच ओरडला. लोक धावत आले आणि त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. त्यानंतर एक दिवस मेंढ्या राखत असताना खरोखरच एक लांडगा आला.
तो मुलगा मदतीसाठी ओरडू लागला आणि गावातल्या लोकांनी त्याचं ओरडणं ऐकलं, पण या वेळेस त्याच्या मदतीला कोणी आलं नाही. त्यांना वाटलं , हा पुन्हा खोडी काढतोय . कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. लांडग्याने त्याची मेंढी पळवली.
Moral of Motivational Story in Marathi For Students
माणसं जेव्हा खोटं बोलतात तेव्हा ते आपली विश्वासार्हता गमावतात. एकदा त्यांच्यावरचा विश्वास उडाला की ते खरं बोलले तरी त्यांच्यावर कोणी कधीच विश्वास ठेवत नाहीत. चांगल्या चारित्र्याची पारख प्रामाणिकपणा वरून होते.
आमचे अन्य आर्टिकल :
- Top 3 Motivational Speech In Marathi For Students
- Top 3 Life Changing Hari Katha In Marathi With Moral
- Top 15 Best Motivational Story in Hindi For Success
- 15 सफल लोगों की असफलता की कहानियां
- Best 165 Life Changing Swami Vivekananda Quotes in Marathi
Motivational Story in Marathi Pdf Free Download
मिञांनो जर तुम्ही Motivational Story in Marathi Pdf Free Download करणार असाल तर, तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रेरणादायी कथा मराठी Pdf Free Download करू शकता.
Motivational Story in Marathi Pdf Free Download
मित्रानो ह्या होत्या त्या Top 15 Best Motivational Stories in Marathi मध्ये, तुम्हा सर्वांना या सर्व कथा कश्या वाटल्या खाली कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा. आणि जर हे आर्टिकल तुमच्यासाठी उपयोगी ठरले असेल, तर तुमच्या मित्र मैत्रीण सोबत अवश्य शेयर करा.
धन्यवाद 🙏🙏🙏
FAQ QUESTIONS:
सर्वात Best Marathi Motivational Story कोणती?
एका राजाची प्रेरणादायी कथा हि सर्वात Best Motivational Story आहे, स्टोरी वाचण्यासाठी knowledge grow blog वरती अवश्य भेट द्या.
सर्वात best real life inspirational story कोणती आहे?
विल्मा रुडॉल्फ ची कहाणी हि सर्वात best real life inspirational story आहे?
outstanding and very good this is all motivational story’s .
Mst hai
Sir
thank u so much bhava…