Top 10 Best Marathi Books to Read Before You Die

Top 10 Best Marathi Books to Read Before You Die | 10 पुस्तके जी तुमचे आयुष्य बदलून टाकतील.

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मराठी मोटीवेशनल ब्लॉग वरती स्वागत आहे. मित्रानो आजचे हे आर्टिकल तुम्हा सर्वांच्यासाठी खूप useful आणि प्रेरणादायी ठरणार आहे, म्हणून मित्रांनो ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.

Best Marathi Books to Read Before You Die
Best Marathi Books to Read Before You Die

Top 10 Best Marathi Books to Read Before You Die

मित्रांनो असं म्हणतात की “आयुष्यात सहज आणि लवकर यश मिळवायचे असेल तर तुम्हाला पुस्तकांबरोबर दोस्ती करावीच लागेल.” आणि असे ही म्हणतात की माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात 👇

एक म्हणजे त्याला आयुष्यात भेटलेली माणसे आणि त्यानं वाचलेली पुस्तके” कारण यशस्वी लोकांचे 40 – 40 वर्षाचे अनुभव आपल्याला एका पुस्तकात वाचायला मिळतात. मित्रांनो असं ही म्हणतात की 👇

“स्वतः चुका करून जर आपण शिकत राहिलो तर आयुष्य छोटे पडेल, त्यामुळेच आपण दुसऱ्यांच्या चुकांमधून जर शिकलो तर आप खरे शहाणे आणि हुशार” आणि हे सर्व अनुभव आपल्याला पुस्तकांमधूनच शिकायला मिळतात.

मित्रानो आज जगातील 75% कोट्याधीश जे आपल्या स्वतःच्या हिमतीवर कोट्याधीश झाले आहेत, ते सर्व लोक सरासरी महिन्याला 2 पुस्तके वाचतात. त्या सोबतच आज जगातील 90% मोठ्या कंपनीचे सीईओ महिन्याला 4 पुस्तके वाचतात.

फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग तसेच बिल गेट्स, एलोन मस्क ही सर्व श्रीमंत लोक महिन्याला 3 ते 4 पुस्तके वाचतात. मित्रांनो मुकेश अंबानी, ओप्रा विन्फ्रे, वॉरेन बफेट आणि अशी अनेक मोठी व्यक्तीमत्वे यांच्यातील एक कॉमन सवय म्हणजे “अफाट वाचन

मित्रांनो ही सर्व लोक सतत पुस्तके वाचून ज्ञान ग्रहण करत असतात, कारण यांना माहिती आहे की “आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात जर पुढे जायचे असेल तर ज्ञानाला पर्याय नाही” म्हणून मित्रानो मी आज तुमच्या सोबत माझ्या टॉप 10 आवडत्या पुस्तकाची नावे सांगणार आहे, जी तुमचं आयुष्य बदलुन टाकतील.

Top 10 Books to Read Before You Die in Marathi

मित्रानो जर तुम्ही ती सर्व पुस्तके वाचलीत तर मी खात्रीने सांगतो की “तुम्हाला यशस्वी आणि मोठे होण्यापासून कोणचं थांबवू शकणार नाही” आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही सर्व पुस्तके मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत वाचकांना वाचण्यासाठी ऊपलब्ध आहेत.

1. The Power of Your Subconscious Mind – आपल्या अवचेतन मनाची शक्ती

मित्रांनो या पुस्तकात डॉ. जोसेफ मर्फी यांनी आपल्या बहिर्मन आणि अंतर मन या दोन्ही बद्दल डिटेल्स मध्ये सांगितले आहे. मित्रानो आपल्या आयुष्यात बहिर्मनाचे कार्य फक्त 5% आहे, आणि तर 95% कार्य अंतर मनाचे आहे.

मित्रानो या सगळ्याची विस्तृत माहिती डॉ. जोसेफ मर्फी यांनी लीहलेल्या the power of your Subconscious Mind पुस्तकात वाचायला मिळेल. या पुस्तकात लेखकाने शास्त्रीय पद्धतीने बहिर्मन आणि अंतर मन यांची अनेक खरी उदाहरणे देऊन समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

मित्रानो जर तुम्ही हे पुस्तक वाचले तर तुमच्या आयुष्याचा नकाशा तुमच्या हातामध्ये येईल. मग तुम्हाला कोणत्याही बुआ बाबा किंवा कोणत्याही जोतिष्याकडे जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे मित्रांनो माझे असे म्हणणे आहे की प्रत्येकानं हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

मित्रांनो जर तुम्हाला हे पुस्तक अमेझॉन वरून विकत घ्यायचे असेल किंवा या पुस्तकाची मराठी किंवा हिंदी pdf डाऊनलोड करायची असेल तर तुम्ही खाली दिलेला लिंक वरती क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

2. Rich Dad Poor Dad

मित्रांनो मला नेहमी वाटते की “ह्या पुस्तकाला प्रत्येकाने कॉलेज मध्ये असतानाच वाचले पाहिजे”. मित्रांनो जेव्हा मी हे पुस्तक वाचले तेव्हा माझा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. अक्षरशः या पुस्तकाने माझ्या आयुष्यात क्रांती घडवून आणली आहे.

मित्रांनो हे पुस्तक माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. या पुस्तकामध्ये रॉबर्ट नावाचा एक मुलगा असतो, ज्याचे २ वडील असतात. एक त्याचे खरे वडील आणि एक त्याच्या मित्राचे वडील. त्याच्या खऱ्या वडिलांकडे Phd ची डिग्री आसते, आणि ते उच्च शिक्षित सुद्धा असतात पण तरी सुद्धा से आयुष्भर गरिबीत जीवन काढतात.

मित्रानो आणि त्यांचे दुसरे वडील कमी शिकलेले असतात म्हणजेच आठवी पास असतात. पण तरीही राज्यामध्ये श्रीमंत असतात. आणि मग हे दोन्ही ही वडील रॉबर्ट ला कसे सल्ले देतात, पण रॉबर्ट फक्त आपल्या श्रीमंत वडिलाचेचं का ऐकतो, आणि त्यांनी सांगितलेल्या युक्त्या वापरून तो कसा श्रीमंत होतो हे सर्व सुंदर प्रकारे या पुस्तकात दिले आहे.

मित्रांनो तुम्हाला पैशाच्या बाबतीत काही अडचण असेल आणि आपले पैसे कसे वापरावे? हे जर समजत नसेल तर तुम्ही हे पुस्तक वाचलेच पाहिजे. मित्रानो या पुस्तकाची मराठी आणि हिंदी समरी या ब्लॉग वरील वाचण्यासाठी ऊपलब्ध आहे.

3. You Can Win – आपण जिंकू शकतो.

मित्रांनो मी जेव्हा पासून Self Development वरती पुस्तके वाचायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या माहिती नुसार मी सर्वात आधी ह्या पुस्तकाला वाचायला सुरुवात केली. हे पुस्तक वाचून मी इतका प्रभावित झालो की मी त्या वेळेस माझ्या सर्व मित्रांना हे पुस्तक वाचण्यासाठी सांगितले होते.

मित्रानो छोट्या छोट्या गोष्टीन मधून आयुष्यातील मोठ मोठे धडे आपल्याला ह्या पुस्तकातून मिळतात. हे पुस्तक वाचल्यानंतर मला अशी जाणीव झाली की “आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल किती कमी माहिती आहे” हे पुस्तक आपल्याला सांगते की 👇

आयुष्यात आपण किती छोट्या छोट्या चुका करतो, ज्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये पश्र्चाताप करण्याची वेळ येते.” आणि त्या चुकांपासून आपण कसे वाचू शकतो आणि कश्या सुधारणा करून आपण आपले आयुष्य सुंदर बनवू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळतात.

मित्रांनो जर तुम्ही या पुस्तकाला खरेदी करणार असाल किंवा या पुस्तकाची मराठी pdf फ्री डाऊनलोड करणार असाल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे.

4. The Monk Who Sold His Ferrari – सन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली.

मित्रांनो या पुस्तकात एका अश्या व्यक्तीची गोष्ट सांगितली आहे, जो एक यशस्वी वकील असतो, पण आपल्या कामांमध्ये असलेल्या ताण तणावामुळे आणि शारीरिक आजारांना कंटाळून तो आपली सर्व संपती विकतो आणि सत्याच्या शोधात निघतो.

सत्याचा शोध घेता घेता तो हिमालयात जातो, तिथे त्याला काही सन्यासी भेटतात, जे त्याला आयुष्य बदलणारे ७ धडे देतात. आणि त्या सोबतच एक अट ठेवतात की “हे आयुष्य बदलणारे ७ धडे फक्त स्वतः पुरते ठेवायचे नाहीत, त्या ऐवजी ते ७ धडे लोकांना पण सांगायचे.

मित्रानो ह्या पुस्तकाने लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे, जर तुम्ही एक स्टूडेंट असाल आणि परीक्षेच्या टेन्शन मुळे तुम्ही तणावाखाली असाल तर हे पुस्तक तुमच्या साठी आहे. किंवा तुम्ही एक नोकरदार असाल आणि कामाच्या टेन्शन मुळे तणावाखाली असाल तर तुम्ही पण हे पुस्तक अवश्य वाचावे.

मित्रांनो जर तुम्हाला हे खरेदी करायचे असेल किंवा या पुस्तकाची मराठी किंवा हिंदी pdf free download करणार असाल तर त्याची मी लिंक खाली दिलेली आहे.

5. 7 Habits of Highly Effective People – अती परिणामकारक लोकांच्या ७ सवयी

मित्रानो 1989 साली स्टीफन कवी यांनी लिहलेले हे पुस्तक आज सुद्धा बेस्ट सेलर म्हणजेच सर्वात जास्त विकले जाणारे पुस्तक आहे. आता पर्यंत पूर्ण जगात या पुस्काच्या 5 करोड पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. मित्रानो माणसाचे यश हे त्याला सवयी काय आहेत, यावर अवलंबून असते.

मित्रानो असे म्हणतात की “माणूस हा आपल्या सवयींचा गुलाम असतो” म्हणून तुम्हाला जर चुकीच्या सवयी असतील तर तुम्ही अधोगती कडे जाता, आणि जर तुम्हाला चांगल्या सवयी असतील तर तुम्ही प्रगती कडे जाता. मित्रांनो स्टीफन कवी यांनी आपल्या अनेक वर्षाच्या संशोधनानंतर या पुस्तकात यशस्वी लोकांच्या ७ सवयी दिल्या आहेत.

ह्या ७ सवयींना जो कोण्ही आपल्या आयुष्यात अमलात आणील, तो व्यक्ती सर्वागणे यशस्वी होईल, आणि त्याला काहीच कमी पडणार नाही. आणि या पुस्तकामध्ये छोटे छोटे जे अनुभव आणि गोष्टी दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आहेत.

त्यामुळे ज्याला नोकरी मध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये किंवा वयक्तिक जीवनात अपयश येत असेल आणि हे समजत नसेल की आता काय केले पाहिजे? तर त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे.

मित्रानो जर तुम्ही हे पुस्तक खरेदी करणार असाल किंवा या पुस्तकाची मराठी आणि हिंदी pdf download करणार असाल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे.

Best Marathi Books to Read For Students

6. Bhagavad Geeta

मित्रानो तुम्हाला भगवद गीते बद्दल वेगळे सांगायची गरज नाही, हे नुसते फक्त पुस्तक नाही ये, तर हे ज्ञानाचे विद्यापीठच आहे. मित्रानो तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गीतेमध्ये मिळेल. मित्रांनो जेव्हा कुरुक क्षेत्रात अर्जुन युद्ध करण्यासाठी येतो, तेव्हा तो आपल्याच प्रियजनांना बघून त्याला नैराश्य येते.

मित्रानो आज सुद्धा या धावपळीच्या जगामध्ये लोक नैराश्याने ग्रस्त आहेत आणि टेन्शन मध्ये आहेत. मित्रानो भगवान श्री कृष्ण त्या वेळी अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नांचे समाधान देतात, आणि अर्जुनाला त्या वेळी जे प्रश्न पडले होते, ते आज सुद्धा आपले प्रश्न आहेत. आणि त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे श्री कृष्णाने गीतेत दिले आहेत.

मित्रानो जर तुम्ही हे पुस्तक खरेदी करणार असाल किंवा या पुस्तकाची मराठी आणि हिंदी pdf download करणार असाल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे.

7. The Compound Effect

मित्रांनो The Compound Effect Book हे माझे सर्वात आवडते पुस्तक आहे. ह्या पुस्तकात लेखकाने यशस्वी होण्याचे ५ नियम सांगितले आहेत. आणि या पुस्तकात छोटे छोटे बदल घडवून कसं यश मिळवता येतं हे सुद्धा विस्तृतपने सांगितले आहे.

मित्रानो मी या पुस्तकाची हिंदी समरी सुद्धा या ब्लॉग वरती पब्लिश केली आहे, ती तुम्ही अवश्य वाचा. त्यांची लिंक मी खाली दिलेली आहे. मित्रानो हे पुस्तकं तुम्ही जरुर वाचा, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही मला धन्यवाद जरुर द्याल…

Best Marathi Books to Read For Success

8. Zero to One

मित्रांनो या पुस्तकाचे लेखक एक उद्योजक आणि paypal कंपनी चे सह संस्थापक राहिले आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की “जर तुम्हाला मोठे यश मिळवायचे असेल तर तुम्हाला काहीतरी तेवढेच वेगळं केले पाहिजे”

मित्रांनो ज्या गोष्टी आधीच झाल्या आहेत त्याच गोष्टीना परत करून तुम्ही जास्त यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही काहीच नवीन करत नाही आणि ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच परत परत करत राहता , तेव्हा तुम्ही 0 पासून N पर्यंत जाता. ज्याला horizontal प्रगती म्हणतात.

पण जेव्हा तुम्ही या जगात काही तरी नवीन घेऊन येता, म्हणजेच ते आधी कोण्ही कधीच केले नाही ये, तेव्हा तुम्ही 0 पासून 1 च्या दिशेने वाटचाल करता. याला vertical प्रगती असे म्हणतात. आणि इथे अमर्यादित संधी असतात.

या पुस्तकाचे लेखक पिटर जी असे म्हणतात की “प्रत्येक मोठी घटना एकदाच घडते”. म्हणजे आता या जगात दुसरा Steve jobs परत iPhone बनवणार नाही, आणि दुसरा मार्क झुकरबर्ग परत फेसबुक ची निर्मिती करणार नाही. किंवा दुसरा बिल गेट्स परत मायक्रोसॉफ्ट ची स्थापना करणार नाही.

मित्रांनो याचं सर्व गोष्टी या पुस्तकात लेखकाने सांगितल आहे की “ आपल्याला काहीं तरी नवीन आणि वेगळं करावे लागेल, ज्याची या जगाला अत्यंत गरज आहे.” आणि मित्रांनो तेव्हाच आपण मोठे यश मिळवू शकतो. कारण तिथे आपल्याला अनेक संधी उपलब्ध असतात.

शिवाय आपल्याशी स्पर्धा करणारा कोन्ही ही नसतो. मित्रानो जर तुम्हाला स्टार्टअप मध्ये रुची असेल तर तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा. जर तुम्ही हे पुस्तक खरेदी करणार असाल किंवा या पुस्तकाची मराठी आणि हिंदी pdf download करणार असाल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे.

9. Think and Grow Rich

मित्रानो जर तुम्हाला श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती कसं व्हायचं? हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही Think and Grow Rich पुस्तकाला अवश्य वाचा. मित्रानो ह्या पुस्तकाला अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांनी लिहलेले आहे.

लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहण्याच्या आधी 500 पेक्षा जास्त यशस्वी लोकांचे इंटरव्ह्यू घेतले होते आणि त्यानंतर त्यांना यशस्वी होण्याचे रहस्य कळाले होते. त्या रहस्याला त्यांनी “विचार करा आणि श्रीमंत व्हा” म्हणजेच “थिंक अँड ग्रो रीचं” या पुस्तकामध्ये सांगितले आहे.

मित्रानो तुम्ही जर थिंक अँड ग्रो रीचं पुस्तक खरेदी करणार असाल किंवा याची PDF फाईल फ्री मध्ये डाऊनलोड करणार असाल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे.

10. आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला.

मित्रांनो ज्या लोकांना मृत्यूचे नाव जरी ऐकले तरी त्यांची थरकाप होते, अश्या लोकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. मित्रांनो लेखक अनिता जी यांनी आपल्या मृत्यू जवळचा अनुभव या पुस्तकात दिला आहे.

ती कशी 4 वर्ष कॅन्सर ने ग्रस्त असते, आणि तिच्या शरीराचा सापळा झालेला असतो. आणि एक दिवस जे व्हायचे होते तेच झाले, म्हणजेच एक दिवस तिच्या शरीराचे सर्व अवयव बंद पडतात. मग नंतरच्या 30 तासामध्ये असे काही चमत्कारिक घडते, जे या पुस्तकात सुंदर रित्या सांगितले आहे.

नंतर परत तिला कशी जाग येते आणि तिचा 4 वर्षाचा कॅन्सर कसा 6 महिन्यात पूर्णपणे बरा होतो. आणि मग तिच्या कॅन्सर चे खरे कारण तिला त्या मृत्यू जवळचा अनुभवा मध्ये समजते. हे सगळं वाचताना अक्षरशः अंगावर शहारे येतात.

मग लेखिका आपण आनंदी का रहायला पाहिजे? हे सांगते. मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे, पण तो खरच भयानक वाटतो तेवढा आहे का! का वेगळच काही तरी आहे? मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची अचूक उत्तरे या पुस्तकामधून मिळतील.

मित्रानो जर तुम्ही हे पुस्तक खरेदी करणार असाल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. तेथून तुम्ही त्या पुस्तकाला खरेदी करू शकता.

11. The Secret (Bonus)

मिञांनो तुमची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे का? आणि लाख प्रयत्न करूनही तुमच्या हाती फक्त अपयशच लागतं आहे का? आणि तुम्हाला असे वाटतं आहे का की तुम्ही कधी ही यशस्वी होऊ शकत नाही? तर मित्रांनो हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.

मिञांनो जर तुम्ही हे पुस्तक वाचले तर तुम्हाला समजेल की लॉ ऑफ अट्रैक्शन म्हणजे काय? आणि हे कसे कार्य करते? त्या सोबतच तुम्हाला पैशाचे रहस्य, आरोग्याचे रहस्य आणि मानवी संबंधाचे (नाते) रहस्य काय आहे? हे सर्व तुम्हाला ह्या पुस्तकातून कळेल.

मित्रांनो जर तुम्हाला हे वाचायचे असेल तर ह्या पुस्तकाला खरेदी करण्याची लिंक आणि यांची मराठी आणि हिंदी pdf free download करण्याची लिंक मी खाली दिलेली आहे.

Conclusion of Best Marathi Books to Read Before You Die

मित्रांनो ही होती ती 10 लाईफ बदलून टाकणारी पुस्तके, जी तुम्ही जरुर वाचली पाहिजेत. मित्रानो जर हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरले असेल? तर ह्या आर्टिकल तुमच्या मित्र मैत्रीण आणि परिवारासोबत अवश्य शेयर करा.

मित्रानो अशीच लाईफ बदलून टाकणारी Marathi & Hindi Books PDF Free Download करण्यासाठी आमच्या Knowledge Grow Telegram Channel ला आजच Subscribe करा.

मित्रानो आजच्या ह्या Top 10 Best Marathi Books to Read Before You Die आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, परत भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग आर्टिकल सोबत, तो पर्यंत तुम्हीं जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.

धन्यवाद 🙏🙏🙏

अपने दोस्तों के साथ शेयर करें

Leave a Comment