भगवत गीतेतील हे 5 उपदेश तुमचे आयुष्य बदलून टाकतील | Bhagwat Geeta Updesh in Marathi

भगवत गीतेतील हे 5 उपदेश तुमचे आयुष्य बदलून टाकतील | Bhagwat Geeta Updesh in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मराठी ब्लॉग वरती स्वागत आहे. मित्रांनो आज चे हे आर्टिकल तुम्हा सर्वांच्या साठी खूप स्पेशल आणि लाईफ बदलून टाकणारे साबित होणार आहे, कारण मित्रांनो मी आज तुमच्या सोबत भगवत गीतेतील 5 उपदेश शेअर करणार आहे, जे तुमचं आयुष्य बदलुन टाकतील.

Bhagwat Geeta Updesh in Marathi
Bhagwat Geeta Updesh in Marathi

Top 5 Life Changing Bhagwat Geeta Updesh in Marathi | Geeta Saar in Marathi

मित्रांनो महाभारतामध्ये ज्यावेळेस अर्जुन नैराश्य मध्ये गेला होता आणि त्याला काय करावे हे सुचत नव्हते. आणि युद्धामध्ये आपल्या नातेवाईकांना बघून त्याचे हातपाय गळाले होते, तेव्हा भगवान श्री कृष्णानी त्याला भगवद गीता सांगून त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती.

मित्रांनो अर्जुनाची त्यावेळेस जी अवस्था झाली होती, तशीच आपली सुद्धा काही प्रमाणात त्याचा सारखीच झालेली आसते. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात काही प्रश्न पडलेले असतात आणि काय करावे हे सुचत नाही. जसे की 👇👇👇

  • निर्णय कसा घ्यायचा?
  • टेंशन, चिंता आणि काळजी कशी दूर करायची?
  • आत्म विश्वास कसा निर्माण करायचा?
  • यशस्वी कसे व्हायचे?
  • मृत्यूची भीती कशी घालवायची?

मित्रांनो या सारख्या खूप साऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे श्री कृष्णाने भगवद गीते मध्ये दिली आहेत. पण आजच्या ह्या आर्टिकल च्या मध्यामतून आपण त्यातील 5 महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे बघणार आहोत. चला तर मग बिना टाइम वेस्ट करता सुरू करूया…

मित्रानो हे आर्टिकल मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत वाचकांना वाचण्यासाठी ऊपलब्ध आहे, जर कुणाला हिंदी मध्ये वाचायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकता.

Bhagwat Geeta Updesh in Marathi – काळजी कशी दूर करायची?

मित्रांनो दुसऱ्या अध्यायामध्ये 45 व्या श्लोकात श्री कृष्ण अर्जुनाला असे सांगतात की तुला कर्म करण्याचा म्हणजेच काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण कर्मफळावर म्हणजेच रिझल्ट्स वर सूझा अजिबात अधिकार नाही ये. त्यामुळे तू कामाच्या परिणामाचा अजिबात विचार न करता तुझे पूर्ण लक्ष्य कामावर ठेव.

मित्रानो आज आपण जे काही करतो, ते आपण काही तरी मिळवण्यासाठी करत असतो, जसे की पैसे, बंगला, गाडी इत्यादी.. हे करणे चुकीचे नाही पण आपण परिणामांना एवढे चिकटलेले असतो की आपल्या डोक्यात कायम तेच चाललेले असते.

माझ्याकडे एवढे पैसे आले कमी मी हे घेईन, माझ्याकडे तेवढे पैसे आले की मी ते घेईन. आणि इथे सर्व टेन्शन, चिंता आणि दुःखाला सुरुवात होते. कारण या सर्वाचे मूळ आहे “अपेक्षा” आणि जर आपली अपेक्षा पूर्ण झाली नाही की आपल्याला दुःख होते. म्हणून श्री कृष्ण सांगतात की👇👇👇

तुझ्या हातात फक्त कर्म करणे आहे, बाकी तुझ्या काही कंट्रोल मध्ये नाही ये. त्यामुळे परिणामाचा जास्त विचार न करता काम करत रहा.”

Bhagwat Gita Updesh in Marathi – निर्णय कसा घ्यायचा?

मित्रानो श्री कृष्ण 6 व्यां अध्यायात 35 व्या श्लोकात अर्जुनाला असे सांगतात की हे अर्जुन, चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत कठीण आहे, परंतु योग्य अभ्यासाने आणि अनासक्ती द्वारे आपल्या मनाला संयमित करणे शक्य आहे.

म्हणजे काय मित्रांनो आपल्याला आयुष्यात कोणत्याही ठिकाणी स्पष्टता पाहिजे असेल तर आपल्या मनाला शांत आणि संयमीत करणे अत्यंत आवश्यक आहे. चंचल मनाने किंवा अत्यंत घाई घाईने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता असते. पण आपल्या मनाला संयमित करणे एवढे सोपे नाही ये.

मित्रांनो त्याला संयमित करण्यासाठी खूप कष्ट ह्यावे लागते. म्हणजेच ध्यान करणे, अभ्यास आणि चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. मित्रांनो इथे अभ्यास म्हणजे सतत चांगल्या गोष्टींचे वाचन करणे. त्या सोबतच श्रवण , चिंतन आणि मनन करणे.

विषयांची आसक्ती कमी करणे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे इत्यादी. मित्रांनो जेव्हा आपण या सर्व गोष्टी सातत्याने करतो, तेव्हा आपले मन स्थिर आणि शांत व्यायला मदत होते. आणि तेव्हाच आपण योग्य असा निर्णय घेऊ शकतो.

Bhagavad Gita in Marathi – आत्मविश्वास निर्माण कसा करायचा?

मित्रानो श्री कृष्ण 17 व्या अध्यायात 28 व्या श्लोकात असे सांगतात की “श्रधेविना केलेले कुठलेही काम मग ते दान असेल, त्याग असेल, तपस्या असेल किंवा अजून कोणतेही काम असेल जर त्या कमावरती तुमचा विश्वास नसेल तर ते काम व्यर्थ आहे.

आणि त्या कामाला काहीच अर्थ नाही. म्हणजे काय मित्रांनो “कोणतेही काम करताना त्या कामावरती तुमची पूर्ण श्रद्धा असली पाहिजे आणि विश्वास असला पाहिजे. कोणी तरी सांगतात किंवा कुठे तरी वाचलय म्हणून ते काम करणे योग्य नाही ये.

मित्रांनो मी तुम्हाला एक छोटी सी गोष्ट सांगतो, एका गावामध्ये पाऊस पडलेला नसतो, म्हणून त्या गावातील सगळे लोक तेथील मंदिरात पाऊस पाडण्यासाठी प्राथना करत असतात. त्यांच्या मध्ये एक छोटा मुलगा असतो, आणि तोच फक्त छत्री घेऊन आलेला असतो.

कारण त्यालाच फक्त असा विश्वास असतो की प्राथना केल्यानंतर पाऊस पडणार आहे. मित्रानो यालाच श्रद्धा आणि विश्वास असे म्हणतात. जेव्हा आपण अश्या प्रकारे काम करतो, तेव्हा आपला आत्मविश्वास आपसूकच वाढतो.

भगवत गीता उपदेश इन मराठी – यशस्वी कसं व्हायचे?

मित्रानो श्री कृष्ण तिसऱ्या अध्यायात 21 व्या श्लोकात असे सांगतात की “श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते, त्याचे अनुसुरण सामान्य लोक करतात.” आपल्या कामानी ते जे जे आदर्श घालून देते, त्यानुसार सारे जग कार्य करते.

म्हणजे मित्रानो “तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल आणि जर तुम्हाला त्या क्षेत्रात श्रेष्ठ व्हायचे आणि टॉप ला जायचे आहे” आणि जेव्हा तुम्ही हा विचार म्हणजेच “मला माझ्या क्षेत्रात टॉप ला जायचे आहे” असा तुम्ही तुमच्या मनात विचार घोळवता तेव्हा तुमचे प्रयत्न सुद्धा त्याच दिशेने व्ह्यायला सुरू होतात.

मग त्यामध्ये किती ही अडथळे किंवा संकटे आली तरी ही तुम्ही घाबरत नाही, आणि तुमच्या पुढे एकच धेर्य ठरलेले आसते की “मला माझ्या क्षेत्रात श्रेष्ठ व्हायचे आहे” असा विचार ठेवणाऱ्या व्यक्तीला कोण्हीच यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही.

Bhagvad Geeta Saar in Marathi  – मृत्यूची भीती कशी घालवायची?

मित्रानो श्री कृष्ण दुसऱ्या अध्यायात 20 व्या श्लोकात असे सांगतात की “कोणत्याही काळी आत्म्याला जन्म आणि मृत्यू नाही, आत्मा हा अजर, अमर आणि अखंड आहे. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नी द्वारे त्याला जाळता येत नाही, आणि पाण्या द्वारे त्याला भिजवता ही येत नाही आणि वाऱ्या द्वारे त्याला सुखवता ही येता येत नाही.

ज्या प्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याच प्रमाणे आपला आत्मा जुन्या म्हणजेच म्हाताऱ्या झालेल्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो. म्हणजेच मित्रानो आपण कधीच मरत नाही , मरते ते फक्त आपले शरीर.

मित्रांनो आपण म्हणजे आपले शरीर नाही आहोत, जेव्हा आपण ह्या दृष्टीने आपल्या जीवनाकडे बघतो , तेव्हा आपल्याला मृत्यूची भीती वाटत नाही. मित्रानो हे होते ते भगवत गीतेतील ५ उपदेश जे कृष्णाने अर्जुनाला दिले होते.

मित्रानो या 5 उपदेशांपैकी सर्वात जास्त कोणता उपदेश तुम्हाला आवडला आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरला? हे खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा. त्या सोबतच तुम्हाला जर गीता उपदेश इन मराठी आर्टिकल आवडले असेल तर ह्या आर्टिकल ला तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेयर करा.

Related Posts:

Bhagwat Geeta Saar in Marathi Pdf Free Download

मित्रांनो जर तुम्ही Bhagwat Geeta Saar in Marathi Pdf Free Download करणार असाल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर करा आणि तुम्ही Bhagwat Geeta Saar in Marathi Pdf Download करू शकता.

मित्रांनो आजच्या ह्या Top 5 Geeta Updesh in Marathi आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रानो आपण परत भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग आर्टिकल सोबत तो पर्यंत तुम्हीं जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.

धन्यवाद 🙏🙏🙏

अपने दोस्तों के साथ शेयर करें

Leave a Comment