Top 135 Best Positive Thoughts in Marathi , Good Thoughts in Marathi
नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मराठी मोटिवेशनल ब्लॉग वरती स्वागत आहे. जर तुम्ही Motivational & Positive Thoughts in Marathi मध्ये वाचणार असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला Best 135 Positive Thoughts in Marathi मध्ये वाचायला मिळतील.
मित्रांनो जर तुम्ही ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत वाचले तर तुम्हाला ह्या आर्टिकल मधून खूप काही शिकायला मिळणार आहे. जे तुमचे आयुष्य बदलवून टाकू शकते. म्हणून मित्रानो ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.
Top 135 Best Positive Thoughts in Marathi | Good Thoughts in Marathi
1. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक सुंदर व्यक्तिमत्त्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते,
पण सुंदर व्यक्तिमत्त्व मात्र सदैव जिवंत राहते.
2. अशा माणसांबरोबर राहा, जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात , अशा माणसांबरोबर बरोबर नका राहू, जे इतर माणसांबद्दल बोलतात.
3. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा पन विचार केला तर , नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही..!
4. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहर्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते.
5. कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर फारसं मनावर घेवु नये , कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील..!
6. जी गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे करते , ती तुम्हाला विशेष बनवित आसते. म्हणून कधीच दुसऱ्यांनी स्वीकारावे यासाठी
स्वतःला बदलू नका.
7. आपण जितके अधिक एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेवढेच ते आपल्याला नियंत्रित करते.
8. स्वत: ला मुक्त करा आणि गोष्टींना त्यांचा स्वतःचा नैसर्गिक मार्ग घेऊ द्या.
9. आयुष्य खुप सुंदर होईल , जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये हे समजू लागेल.
10. सुंदर गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा , तुम्हीं नेगेटिविटी पासून दूर राहता.
Positive Thoughts in Marathi About Life
11. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल , पण आपल्यापासून कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे अशी भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो..!
12. तुमच्या मध्ये मोठं कामं करण्याची क्षमता असताना , सरासरीच्या कामात समाधान अजिबात मानू नका.
13. मन हे कचरा कुंडी नाही की त्यामध्ये
तुम्ही राग, द्वेष तिरस्कार ठेवत बसाल,
तर मन हे प्रेम, आनंद आणि गोड आठवणी ठेवण्याचा Treasure बॉक्स आहे.
14. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना होत नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हाच ते दोघे चमकतात.
15. तुम्हीं जर प्रयत्न केला नाही तर ते कधीच शक्य होणार नाही.
16. इतरांना इंप्रेस करण्यात नव्हे तर जे तुम्हाला आनंदी करतात त्यांच्याबरोबर आयुष्य व्यतीत करा.
17. आपल्याला खरोखर हव्या असलेल्या गोष्टीसाठी कधीच हार मानू नका. कारण प्रतीक्षा करण अवघड आहे , परंतु पश्याताप करण फार कठीण आसते.
18. या जगात फक्त एकच पर्याय कधीच नसतो आणि या जगात पर्यायांची कमी नाही. म्हणून हार मानू नका व शिकत रहा.
19. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामधे जर खूप संघर्ष करावा लागत असेल , तर स्वतःला खूप नशिबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामधे क्षमता असते..!
20. कोणतेही काम कठीण असणार आहे, पण कठिण म्हणजे अशक्य असं नक्कीच नाही.
Positive Thoughts Marathi – प्रेरणादायी विचार इन मराठी
21. लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच शाळा किंवा डिग्री शिकवत नाही.
22. हा तुमचा रस्ता आणि फक्त तुमचा स्वतःचा रस्ता आहे. इतर लोक कदाचित तुमच्याबरोबर चालू शकतील, परंतु कोणीही तुमच्यासाठी चालू शकणार नाही.
23. फक्त तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा ,
त्यापेक्षा उत्कृष्ट असं काहीही नाही ये…
24. पूर्ण होईपर्यंत सर्व काही अशक्य आहे.
25. तुम्हाला एखादी गोष्ट जर हवी असेल तर तुम्हाला त्यासाठी कारणे सापडतील. आणि ते साध्य करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक उद्देश आवश्यक आहे.
- जरुर वाचा: 100+ प्रेरणादायक पॉजिटिव थॉट्स इन हिंदी
26. सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला परिस्थिती आपल्यावर हावी होण्याऐवजी परिस्थिती बदलायच सामर्थ्य देते.
27. काय आहे ते स्वीकारा, काय होतं ते विसरा, काय होईल यावर विश्वास ठेवा.
28. शांतता आणि हास्य ही दोन अशी सामर्थ्यवान साधने आहेत. हसणं हे बर्याच समस्यांच निराकरन करण्याचा मार्ग आहे आणि शांतता बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग आहे.
29. खरी प्रगती तेव्हाच होते , जेव्हा तुम्ही स्वतःच्याच फालतूपणाला कंटाळन जाता.
30. जेव्हा प्रेमाची आणि मायेची माणस आपल्याजवळ असतात तेव्हा कितीही मोठे दुःख असले तरी ही त्याच्या वेदना जाणवत नाहीत.
Good Thoughts in Marathi – सुविचार इन मराठी
31. आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर इतर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.
32. पैसा सर्वस्व नाही पण , पैश्याशिवाय काहीच होत नाही.
33. तुमच्या गोष्टीची कोणालाही काळजी नाही जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही.
34. आजकाल रिलेशनशिप मध्ये असणे मोठी गोष्ट नाही, तर रिलेशनशिप मध्ये नसणे ही मोठी गोष्ट आहे. Proud to be single..😎
35. सुख म्हणजे अडथळे, संकटे नसणे असं अजिबात नाही, त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता आणि अडथळ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता यावर सर्व काही अवलंबून आहे.
36. तुम्ही तडफदारीने आनंद शोधताय का
सवयी प्रमाणे दुःखी राहायची कारणं शोधताय..? लक्षात ठेवा जिकडे तुम्ही लक्ष देता त्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात…
37. जिवन जगणं हे दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही.
38. बदल ही शक्यतो शांत प्रक्रिया असते त्यासाठी धैर्य आणि हिंमतीची गरज असते.
– हिंमत लागते तुम्ही जसे आहात तसे राहण्याची
– हिंमत लागते नकारात्मकता सोडून द्यायची
– हिंमत लागते स्वत:च्या सीमेच्या पलीकडे जाण्याची
– हिंमत लागते स्वतः स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची…
39. योग्य वेळेची वाट पाहत बसाल तर आयुष्य भर वाटंच पाहत बसाल म्हणून योग्य वेळेची वाट पाहत बसू नका, तर योग्य वेळ निर्माण करा.
40. काळजी ही भटकलेल्या रस्त्या शिवाय काहीही नाही, मग रस्ता कसे बदलाल 👇👇
तुमचे विचार बदलण्यापासून सूरवात करा. तुमचे विचार शंका आणि आलेल्या अडचणीने भरू नका, तुमचे विचार शक्यता आणि अडचणीवरच्या उपायांनी भरा.
41. तुम्हाला आयुष्यात नेहमी तेच लोक भेटणार नाहीत ज्यांची तुम्ही अपेक्षा केली होती. कधी कधी आयुष्य तुम्हाला अशा लोकांना भेटवते 👇👇👇
जे की तुम्हाला मदत करतील, जे तुम्हाला त्रास देतील, जे तुम्हाला सोडून जातील, जे तुमच्यावर प्रेम करतील, आणि नंतर हळुहळू तुम्ही एक बळकट व्यक्ती बनाल…
42. ज्याला तुमच्या अश्रूंचे मूल्य माहित नाही अशा व्यक्तीसाठी तुम्ही कधीही रडू नका.
43. शांत समुद्राने कधीही कर्तबगार नाविक बनवला नाही.
44. जो पर्यंत आपण अनुमती देत नाही तोपर्यंत कोणीही तुमचा आनंद, शांतता, प्रेम, तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. कारण आपण आपल्या सर्व भावनांचे मालक आहोत.
45. आपण सगळे या जगात आलो आहोत आनंदी राहण्यासाठी, ती तुमची खरी ओळख आहे. ती जगाला दाखवा…
46. ग्लास अर्धा रिकामा असला किंवा अर्धा भरलेला असला. आपल्याकडे ग्लास आहे याबद्दल आभार माना आणि त्यामध्ये काहीतरी आहे याबद्दल कृतज्ञता बाळगा. बाकी त्याला भरायचा की रिकामा करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे…
47. प्रत्येक सेकंदाला आपले जीवन बदलण्याची संधी असते, कारण कोणत्याही क्षणी आपण आपल्या भावना बदलू शकतो.
48. आपण आपल्या कथेवर पुनर्लेखन
करू शकतो आणि आपल्या इच्छेनुसार आपल्या जीवनात बदल करू शकतो. म्हणून
आपल्याला नेमकं काय मागे खेचत आहे आणि त्यासाठी आपण काय केले पाहिजे ते आधी शोधा.
49. कधीकधी धरून ठेवणे हे सोडून देण्यापेक्षा अधिक नुकसान कारक ठरते.
50. आपल्या धेऱ्यासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हंटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात…
- जरूर वाचा : Best 165 Swami Vivekananda Quotes in Marathi
Great Thoughts in Marathi – महान विचार इन मराठी
51. तुमच्या भविष्याला तुमची गरज आहे, तुमच्या भूतकाळाला नाही…
52. इतरांच्या चुकांमधून शिका. तुम्ही एवढं नाही जगणार की सगळ्या चुका तुम्ही स्वतः करून मग त्यातून काहीं तरी शिकाल…
53. लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही अशा जगात राहत आहात, जिथे कृत्रिम लिंबाचा वापर पाहुण्यांना वेलकम ड्रिंकसाठी केला जातो आणि खऱ्या लिंबाचा वापर फिंगर बावुल मध्ये हात धुण्यासाठी केला जातो.
54. आपल्याला खरं चित्र कधीच दिसणार नाही. कारण खरं चित्र फक्त कलाकारांच्या मनात अस्तित्त्वात असतं…
55. खरोखर काय महत्वाचे आहे ते स्वतःला विचारा आणि नंतर आपल्या उत्तराभोवती स्वतःचे जीवन घडवण्याचे धाडस करा.
56. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो, म्हणून हसत रहा आणि जरा विचार कमी करा, कारण तुम्ही आहात तर जीवन आहे, ही संकल्पना मनी बाळगा…
57. आपण अडथळ्यांना कसे हाताळता
ते यश मिळविण्यासाठीची आपली क्षमता निश्चित करते.
58. आपण कितीही प्रयत्न केले तरी महासागर किंवा हवामान बदलू शकत नाही,
म्हणून त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपलं जहाज कसं चालवायचं हे शिकलं पाहिजे…
59. समुद्र सर्वांसाठी सारखाच आहे पण
काहींना त्यात मोती सापडतात, काहींना त्यात मासे सापडतात तर, काहींचे फक्त पाय ओले होतात. आयुष्य सर्वांसाठी सारखंच आहे , पण ज्यासाठी आपण प्रयत्न करतो
तेच आपल्याला मिळू शकतं..
60. कठीण काळात लक्षात ठेवा आपण किती मजबूत आहात , हे तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत मजबुत राहण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नसतो. कधीकधी चांगल्या गोष्टी दूर होतात. जेणेकरून उत्तम गोष्टी जवळ येऊ शकतील…
Beautiful Thoughts in Marathi
61. शांततापूर्ण जीवनासाठी दोन नियम अपयश कधी हृदयात जाऊ देवू नका आणि
यशाचा अहंकार कधी मेंदूत जावू देवू नका.
62. जेवढं तुम्ही इतर लोक काय विचार करतील, याची कमी काळजी कराल तितकेच तुम्ही आनंदी राहाल.
63. शब्दांवर विश्वास ठेवू नका कृतींवर विश्वास ठेवा.
64. या ग्रहावरील सर्व लोकांपैकी तुम्ही, स्वतःशी इतर लोकांपेक्षा अधिक बोलता, आपण योग्य गोष्टी बोलताय का? हे सुनिश्चित करा…
65. कधीकधी, शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मर्यादेपलीकडे जाऊन स्वतःचे नियम सेट करणे.
66. लढायला शिका म्हणजे गुलामीची वेळ येणार नाही…
67. तुम्हाला योग्य वाटतय तेचं करा, जगाला काय वाटतंय ते नाही कारण, शेवटी जे भोगायचय ते तुम्हालाच भोगायचय जगाला नाही…
68. चूक नसताना परिस्थिती विरोधात जाते
तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा, कारण हे कलयुग आहे. इथ खोटयाचा स्वीकारलें जाते आणि खऱ्याला लुटलं जातं…
69. कधी कधी मजबूत हातानी पकडलेली बोटे सुद्धा सुटतात , कारण नाती ताकदीने नाही, तर मनाने निभवावी लागतात.
70. जर तुम्हाला खरोखर काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला मार्ग जरूर सापडेल.
नाहीतर तुम्ही त्यासाठी एक निमित्त शोधाल.
Motivational Quotes in Marathi For Students
71. छत्री पाऊस थांबवू शकत नाही..
परंतु पावसात उभ राहण्याची हिम्मत देते.
आत्मविश्वास कदाचित यश आणू शकत नाही. पण आव्हानांना सामोरे जाण्याची हिम्मत जरुर देतो.
72. अज्ञानाने जेवढे नुकसान होत नाही तेज्या पेक्षा जास्त नुकसान माणूस फक्त अहंकाराने करुन घेतो.
73. आपल्या आनंदाची किल्ली दुसर्याच्या खिशात ठेवू नका.
74. लोखंडाला कोणीही नश्ट करू शकत नाही , पण त्याचा स्वतःचा गंज त्याला नश्ट करू शकतो. तसचं कोणीही एखाद्या व्यक्तीला कमजोर करू शकत नाही पण त्याची स्वतःची मानसीकता त्याला कमजोर करू शकते.
75. क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौना इतका उत्तम मार्ग कोणताही नाही.
76. एखाद्या गोष्टीची अपेक्षा करताय तर
त्यासाठी तेवढे प्रयत्न करणे पण आवश्यक आहे.
77. नकली लोकांच्या सोबत राहून दुःखी राहण्यापेक्षा, एकटं राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं.
78. प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करून
नाही त्या अडचणी तयार करायचं बंद करा आणि निर्णय घ्या व कामाला लागा..!
79. आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात. म्हणून अडचणींना कळू द्या की तुम्हीं अधिक वाढीव आहात.
80. राग म्हणजे काय? राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःला उगीच त्रास करून घेणे… लय बेकार 😡😓
Motivational Quotes in Marathi For Success
81. उजडणारा नवीन दिवस आपल्यासोबत काल काय झालं हे आठवून खराब करू नका…
82. आयुष्यात एकतर तुम्ही प्रवासी आहात
किंवा पायलट आहात !!! त्या दोन्ही मधील नेमकं काय आहात ते तुम्हाला ठरवायचंय आहे.
83. गोष्टी ठीक होतील यासाठी थांबत बसू नका , आयुष्य नेहमीच गुंतागुंतीचे असेल आत्ताचं आनंदी राहण्यास शिका, नाहीतर तुमची मुदत संपेल.
84. प्रशंसा कर्तुत्वाची होत असते, नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते..!
85. वेदनेशिवाय धडा निरर्थक आहे.
कारण एखाद्या गोष्टीचा त्याग केल्याशिवाय कोणालाही फायदा होऊ शकत नाही. परंतु त्या वेदना सहन करून आणि त्यावर मात करून त्याला एक सामर्थ्यवान, अतुलनीय हृदय मिळेल. एक मेटल वालं हृदय 🙂🤟
86. कधी कधी वाटतं की सगळे दरवाजे बंद झालेत पण सगळे बंद झालेले दरवाज्यानां लॉक असेलच असं नाही. असू शकतं की ते तुमच्या लाथ मारण्याची वाट बघत असतील..!
87. धाडस हे भीतीच्या एक पाऊल पुढे असतं..
88. आयुष्यात ‘कोण आपल्या पुढे आहे’ हे महत्वाचं नाही किंवा कोण आपल्या मागे आहे. तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की
‘आपल्या सोबत कोण आहे.’
89. नाती तुमच्या जखमा भरु शकत नाहीत, आणि एकट राहून तुम्ही काय मरणार नाही, हे लक्षात ठेवा.
90. मी बरेच मित्र यामुळे गमवले कारण, मी त्यांना पहिल्यांदा मेसेज करायच बंद केला म्हणून…
प्रेरणादायी विचार मराठी – Best Positive Thoughts in Marathi
91. 40% किंवा 90% नी आयुष्यात काय फरक पडत नाय. पण जर तुम्ही जे करताय त्यात 100% देत असाल , तर जग तुमचचं आहे. 😎
92. तुम्ही जेवढं नकारात्मक व्यक्तींना आणि गोष्टींना उत्तर द्यायचं बंद कराल, तेवढंचं तुम्हीं शांतीपूर्ण जिवन जगाल..!
93. तुम्ही जिथे आहात तिथं राहणे जर तुम्हाला आवडत नसेल , तर तिथून निघा पहिले कारण तुम्ही काय झाड 🌴 नाहीत..
94. तुमच्या विश्वासाची दहाड एवढी असू द्या , की तुम्हाला तुमच्या शंका चा आवाज
चुकून सुधा न यावा…
95. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीचा अर्थ,
त्याला घ्यायचंय तसाच घेतो , त्यामुळे एड्यांच्या नादाला लागू नये ..!
96. ती गोष्ट करायला अवघड आहे
पण ती गोष्ट करणे अशक्य नाही ये..!
97. दोन गोष्टी तुम्हाला आनंदी राहण्यापासून थांबवतात, भूतकाळात जगणं आणि आपली दुसऱ्याशी तुलना करणं.
98. वेळ प्रत्येक वेळी बरोबरचं असते
जेव्हा तुम्हाला काही तरी चांगलं करायचं असतं..!
99. त्यावेळी काय झालं हे महत्वाचं नाही ,
तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे
हे सर्वात जास्त महत्वाचं आहे..!
100. लोकं आयुष्यातून निघून जातील
,“या गोष्टीला घाबरु नका” प्रत्येक जणाला खूष ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला हरवाल या गोष्टीला घाबरा..!
Best Inspiration Quotes in Marathi
101. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुमच्याकडे येत आहेत , त्याला फक्त योग्य वेळ येण्याची आवश्यकता आहे..!
102. कधी कधी एखादी गोष्ट तुम्हाला खूप दुःखी करते, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा धढा शिकवून जाते.
103. अशक्य म्हणजे एक तथ्य नाही,
तर ते एक मत आहे…
104. मानवी जीवनात सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मृत्यू नव्हे, तर उद्देशा शिवाय जिवन जगणे होय.
105. कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्विकार करा.. कारण झाडाच्या वाढीसाठी
ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते.
106. वाईट वेळ निघून जाते पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांचे खर रूप दाखवून जाते.
107. आपण सगळे एकाच गेम मध्ये आहोत. फक्त लेवल वेगवेगळ्या आहेत. सगळ्यांना सारखीच संकटे आहेत फक्त आपले राक्षस वेगवेगळे आहेत…
108. डोळे पण उजेडासाठी उघडावे लागतात कारण फक्त सुर्य उगवल्यावर आंधार नाही जात..
109. तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही, यावर इतर लोक काय म्हणतात याला महत्व नाही. फक्त तुम्ही काय करता या गोष्टीला महत्व आहे…
110. “स्वत: ला मर्यादित बनवू नका, बहुतेक लोक जे ते विचार करतात , त्याला मर्यादा घालतात. तुम्ही एवढे लांब जावू शकता , जेवढं तुमचं मन तुमचे विचार जातात. लक्षात ठेवा, ज्याचा आपण विचार करू शकतो, ते आपण साध्य करू शकतो”
Positive Quotes in Marathi – सकारात्मक सुविचार इन मराठी
111. काय चुकीचं होईल याचा विचार सोडून द्या, आणि त्या ऐवजी याच्या उत्साहात रहा की काही तरी चांगलं होईल.
112. फुंक मारून दिव्याला विजवू शकता
अगरबत्ती ला नाही , कारण जो सुगंध पसरवतो त्याला कोण वीजवू शकत नाही..!
113. तुम्हाला जर आयुष्यावर राज्य करायचं असेल , तर त्यासाठी अगोदर तुम्हाला स्वतःच्या मनावर राज्य करणे आवश्यक आहे.
114. कोणीही यश मिळवू शकतो, परंतु केवळ हुषारचं अपयशांपासून शिकू शकतात.
115. लोकं जेव्हा विचारतात की तू काय काम करतोस , तेव्हा खरं तर ते हे बगत असतात की तुम्हाला किती इज्जत द्यायची आहे.
116. एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुमचं ध्येय सोन्या, बाबू पेक्षा लय भारी आहे,
म्हणून तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
117. तुमच्या भूतकाळाने तुम्हाला शक्ती आणि शहाणपण दिले आहे, त्यामुळे येणारे दिवस साजरे करा, पुन्हा त्या गोष्टीची शिकार होवू नका.
118. मागं बघत राहाल तर फक्त पच्याताप होईल पुढं बघत राहाल तर भरपूर गोष्टी बरोबर करायच्या संधी मिळतील.
119. तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यात आहे , पण तुमचा भविष्यकाळ तुमच्या हातात आहे…
120. केवळ एक गोष्ट आहे जी स्वप्न साध्य करणे अशक्य बनवते, आणि ती म्हणजे अयशस्वी होण्याची भीती.
Motivational Thoughts in Marathi – सकारात्मक विचार इन मराठी
121. तुम्हीं जे काही करत आहात त्याचा आनंद घेत नसाल तर, तुम्हीं ती गोष्ट कधीही चागल्या पद्धतीनं करू शकत नाही…
122. अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात आणि यशस्वी लोकं आपल्या निर्णयांतून पूर्ण जगाला बदलून टाकतात.
123. जोपर्यंत स्वतःवर अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका…
124. आपल्या शरीरापेक्षा आपल्या आत्म्याला अधिक आवडेल अशा व्यक्तीला शोधा.
125. जर तुम्हाला तुमचे आयुष्य घडवायचं असेल तर हे 100% तुमच्या हातात आहे, त्यामुळे निर्लज्यासारखं सारखं तक्रार करायच बंद करा.
126. जे झालं ते झालं, जे गेलं ते उडत गेलं. एक आयुष्याचा धडा म्हणजे आयुष्यात सदैव पुढं चालत रहा…
127. मी मोठा की तू मोठा, यातच आयुष्य संपून जात, सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसलाय. ज्याला हे कळल, त्यालाच हे जीवन कळल..
128. स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे..
129. रक्त गट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे..!
130. दुनिया नावं ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा.
प्रेरणादायी सूविचार इन मराठी – Suvichar in Marathi
131. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्याच नशिबी असतात…!
132. तुम्ही जर प्रत्येक व्यक्तिला ज्यज करत बसला तर तुमचं कोणाशीही पटणार नाही, तुम्ही जर त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केला तर सगळे तुमचे होतील…
म्हणून लोकांना समजून घ्यायची सवय लावा.. तुम्ही प्रत्येक नात्यामध्ये सुख आणि प्रेम अनुभवाल..
133. रागात घेतलेले निर्णय बरोबर करता येत नाहीत…
134. “इतरांचे ह्रदय जिंकणे हाच जीवनाचा हेतु ठेवा, कारण जग जिंकुन सिंकदर सुद्धा रिकाम्या हातानेच गेला होता”
135. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाही
म्हणूनच आयुष्य हसत जगा..!
Releted Articles:
- Swami Vivekananda Inspiration Quotes in Marathi
- आयुष्य बदलणारे प्रेरणादायी मराठी सुविचार
- चिकूपिकू मराठी मासिकाचा सारांश
- मृत्यूच्या आधी प्रत्येकाने ही 10 पुस्तके वाचलीच पाहिजे
- Motivational Quotes in Hindi For Success
- 100+ प्रेरणादायक पॉजिटिव थॉट्स इन हिंदी
Conclusion of Positive Thoughts in Marathi :
मित्रांनो हे होते ते प्रेरणादायी पॉजिटिव थॉट्स इन मराठी मध्ये, तुम्हा सर्वांना कसे वाटले? हे खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आणि जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर ह्या आर्टिकलला तुमच्या मित्र मैत्रीण सोबत अवश्य शेयर करा.
मित्रानो आजच्या ह्या Top 135 Best Positive Motivational Quotes in Hindi For Success in Marathi आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रांनो आपण परत भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग आर्टिकल सोबत तो पर्यंत तुम्हीं जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.
धन्यवाद 🙏🙏🙏