आयुष्य बदलणारे 800+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Motivational Quotes in Marathi For Success

आयुष्य बदलणारे प्रेरणादायी मराठी सुविचार | Best Motivational Quotes in Marathi For Success

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मोटीवेशनल ब्लॉग वरती सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो जर तुम्ही आयुष्य बदलणारे प्रेरणादायी सुविचार इन मराठी मध्ये वाचणार असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. मित्रांनो जर तुम्ही ह्या आर्टिकलला शेवटी पर्यंत वाचले तर तुमचे आयुष्य बदलून जाने निश्चित आहे.

प्रेरणादायी मराठी सुविचार | Motivational Quotes in Marathi For Success
प्रेरणादायी मराठी सुविचार | Motivational Quotes in Marathi For Success

आयुष्य बदलणारे प्रेरणादायी सुविचार इन मराठी | Best Motivational Quotes in Marathi For Success

मित्रांनो जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रेरणादायी सुविचार वाचून त्यांना आपल्या आयुष्यामध्ये अमलात आणणे खूप आवश्यक आसते. आणि जो व्यक्ती प्रेरणादायी सुविचारांचे मनन आणि चिंतन करतो, तो व्यक्ती कोणत्याही संकटाना सहजगत्या सामोरे जाऊन यशाचा मार्ग शोधतो.

मित्रांनो एखादा चांगला प्रेरणादायी सुविचार हा हजारों दुरूनांचा नाश करतो व व्यक्तीस इच्छित कार्य करण्याची अदभुत शक्ती देतो. मित्रांनो मी आज तुमच्या सोबत जे प्रेरणादायी सुविचार इन मराठी मध्ये शेयर करणार आहे, ते सर्व सुविचार महान पुरुषांच्या शब्दातून आणि कार्यातून निर्माण झालेले आहेत.

मित्रांनो हे सर्व प्रेरणादायी मराठी सुविचार तुमच्यासाठी प्रेरणादायी आणि आयुष्य बदलून टाकणारे ठरतील हीच अपेक्षा. चला तर मग तुमच्या सोबत शेयर करुया प्रेरणादायी सुविचार इन मराठी मध्ये…

Life Changing & Inspirational Quotes in Marathi – प्रेरणादायी मराठी सुविचार

जीवनामध्ये एवढे मोठे यश मिळवा की, यशाची परिभाषा बदलावी लागेल.

प्रत्येक प्रयत्नाचा शेवट हा ‘यश’ हाच असतो, आणि जर तस नसेल तर समजून जायचं की आजुन शेवट आलेला नाही ये. – अब्राहम लिंकन

विजयाचा इच्छेने जो प्रेरित होतो, आणि त्यासाठी चिकाटीने सतत प्रयत्न करीत असतो, तोच शेवटी विजयी होतो.

कृतिशील नसणाऱ्या व्यक्तीला प्रतक्ष्य देव सुद्धा मदत करू शकत नाही.

तुम्ही जर आपल्या चुकांकडे पाठ फिरवली, तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवेल.

केवळ परिस्थिती आपल्याला दुबळे बनवत नाही, तर परिस्थितीकडे पाहण्याचा आपला अविवेकी दृष्टिकोन आपल्याला दुबळे बनवितो.

जो व्यक्ती आपल्या विजयानंतर ही सयंम ठेवतो, त्या व्यक्तीला दुप्पट विजय लाभतो.

पुस्तकासारखा मित्र नाही, त्याला जवळ करण्याचा अवकाश की ते आपले अंतरंग खुले करते. ते आपल्याला कधीही फसवत नाही, चुकवत नाही. ते नेहमी आपल्या सेवेत तत्पर असते.

जे पुस्तक तुम्हाला अधिक विचार करायला भाग पाडते ; ते पुस्तक जीवनात तुम्हाला अधिक सहाय्यभूत बनते.

प्रेम करणे ही कला आहे ; परंतु प्रेम टिकवणे ही साधना आहे.

स्तुतीचा वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळा परिणाम होतो. ती विचारी माणसाला नम्र बनवते , मुर्खाला अहंकारी बनवते, व दुर्बलांना अधिक दुर्बल बनवते.

ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधकार नाहीसा होतो, त्याचप्रमाणे मन प्रसन्न होताच सर्व व्याधी नाहीशा होतात.

अंगात जुना सदरा असला तरी चालेल पण नवे पुस्तक विकत घ्या.

जोपर्यंत तुम्ही मनावर ताबा मिळवू शकत नाही , तोपर्यंत तुमचे राग – द्वेष नष्ट होत नाहीत आणि तुमच्या इंद्रियावरही तुम्ही ताबा मिळवू शकत नाही.

मित्र ढालीसारखा असला पाहिजे म्हणजे तो सुखात तुमच्या मागे परंतु दुःखाच्या वेळी तो तुमच्या पुढे असला पाहिजे.

आळस हा मनुष्याच्या प्रत्येक चांगल्या कामात आड येणारा प्रबळ शत्रू आहे.

Motivational Thought in Marathi – प्रेरणादायी विचार इन मराठी

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, प्रयत्न तरी करीनच , असे धैर्य कायम बाळगा तर तुमची प्रगती निश्चित होईल.

प्रत्येक क्षणाची किंमत ज्या व्यक्तीला कळाली, तो व्यक्ती निश्चितच मोठा होणारच..

आदर्श व्यक्तीचे अनुकुरण केल्यामुळे आपण पण त्यांचा सारखे यशस्वी होतो.

प्रेम व क्रोध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

चांगली कल्पना सुचली तर त्यावर कष्ट घेण्यास आजिबात आळस करू नका. कारण लक्ष्यात ठेवा की, फक्त एक चांगली कल्पना तुमचे आयुष्य बदलवू शकते.

ज्या व्यक्तीच्या अपेक्षा कमी तो अधिक सुखी असतो.

खरे तेच बोलावे, उदात्त तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे आणि हित ज्यात असेल तेच करावे.

असं काहीतरी वेगळं करून दाखवा की जे या जगात कुणालाही सुचलं नसेल .

उद्यासाठी चांगली तयारी म्हणजे आजचे काम उत्तम प्रकारे करणे.

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला व्यक्तीला सर्व काही साध्य होते.

माझी ओळख ‘देशातला बदल घडवून आणणारा एक व्यक्ती’ म्हणून व्हायला हवी असे प्रत्येकाला वाटले पाहिजे.

आपल्या गरजा अमर्याद असतात पण थांबायचे कुठे ते आपल्या हाती असते.

तुम्हाला स्वतःची किंमत कळून घ्यायची असेल तर संपत्ती , घरदार , पदव्या इत्यादी.. बाजूला ठेवून स्वतःच्या अंतरंगाची पारख करा.

ज्ञान हे पैशा पेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते, परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.

सध्या तुमच्या जवळ जे लहान काम आहे ते उत्तम प्रकारे करून दाखवा, मग मोठे काम स्वतःहून तुमचा मागोवा घेईल.

काय वाचतो या पेक्षा काय लक्ष्यात राहते यावरच हुशारी अवलंबून असते.

नियमितपणामुळे मनाला शिस्त लावली तर मनावर बुद्धीचे नियंत्रण राहते.

चांगले विचार मनात नेहमी येत नाहीत, म्हणून ते मनात येताच त्यावर कृती करायला सुरुवात करा.

अधिक पैशाच्या मागे लागू नका, परंतु पाठीमागे नाव राहील अशा सत्कार्यात पैसे गुंतवा.

Inspirational Thoughts in Marathi – प्रेरणादायी मराठी विचार

आपल्या प्रगतीचा रस्ता हा आपल्या हातात आहे, फक्तं वाट चालण्याचा निर्धार हवा.

दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐका आणि त्यावर विचार करा, मात्र विचारल्या शिवाय आपले मत प्रकट करू नका.

घराचे समाधान हे त्या घरातील स्त्रीच्या समाधानावर अवलंबून असते.

प्रत्येक माणसाला एकांतवासाचे काही क्षण दिवसातून मिळत असतात. या क्षणांचा तो कसा उपयोग करतो यावर त्या दिवसाचे यशापयश अवलंबून असते.

घरात खूप पुस्तके जमा करणारा व आपल्या पाल्याकडे भरपूर लक्ष पुरविणारा पालक धनवानच असतो.

जो थोडक्यात पण महत्वाचे सांगतो तोच खरा वक्ता असतो.

आपल्यामागे टीका न करता आपल्या तोंडावर टीका करतो तोच आपला खरा मित्र आसतो.

आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला अजिबात दुःख होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे खरी नीतिमत्ता होय.

माणूस किती कमवतो या पेक्षा तो किती देतो यावरच त्याची श्रीमंती ठरते.

मूर्खा जवळ हुशारी असू शकेल पण परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची पात्रता शहाण्याजवळच असते.

शेजाऱ्यावर अवश्य प्रेम करा, पण दोन घरांच्यामध्ये असलेले कुंपण तसेच राहू द्या.

तुमच्या आवडीचे काम मिळाले नसले तरी ही मिळालेले काम आवडीने करा.

जे काही करावे असे तुमच्या मनात असेल त्या विषयी उगीच बोलू नका, त्या ऐवजी काय करणार आहे ते आधी करून दाखवा.

Inspirational Quotes in Marathi

चांगली पुस्तके वाचावी व त्यातील सुंदर कल्पना व विचार लिहून ठेवावे, कारण नंतर ते पुनः पुन्हा वाचून आनंद मिळतो.

दृढ निश्चय हा सर्व शक्तिमान आहे. जगात कोणीतरी होण्याचा निश्चय करा आणि तुम्ही तसे व्हाल. मोठे होण्याचे स्वप्न भगा आणि मग तुम्ही नक्की मोठे व्हाल.

हाताने काम, मुखात नाम व अंत : करणात राम हाच जीवनात आराम मिळवण्याचा मार्ग आहे.

वचन देताना विलंब करा, पण पाळताना मात्र घाई करा.

आयुष्य वाढविण्याला महत्त्व देण्यापेक्षा ते सुधारण्याला महत्त्व द्या.

आयुष्यात जे घडते तो अनुभव नव्हे, तर त्यातून तुम्ही काय शिकता तो अनुभव असतो.

पुन्हा पुन्हा वाचणे , वाचलेले स्मरणात ठेवणे व स्मरणात ठेवलेले कागदावर लिहून काढणे यालाच अभ्यास करणे असे म्हणतात.

काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद हा आयुष्यभर न संपणारा आनंद आहे.

मृत्यूला थोपवणं आपल्या हाती नसलं तरी आरोग्य जोपासणं आपल्या हाती असते.

इच्छाशक्ती आणि चिकाटी या दोन गुणांच्या बळावरच माणसाची स्वप्ने साकार होतात.

Inspirational Quotes in Marathi For Success

जो मनुष्य आपल्या मनाची वेदना , मनातील दुःख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो.

सज्जन म्हणून जन्माला येणे हा योगायोग , पण सज्जन म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई होय.

प्रार्थना ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याची शक्ती आहे.

स्वतःच्या पायावर हिमतीने उभा राहिलेला मनुष्य गुडघे टेकलेल्या माणसापेक्षा श्रेष्ठ असतो.

खोटे बोलण्याने माणूस काही मिळवत तर नाहीच, परंतु त्याच्यावरील असलेला लोकांचा विश्वास मात्र तो गमावून बसतो.

स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा , इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

जीवन सुंदर व यशस्वी करण्याकरिता तीन गुण हवेत. प्रेम , ज्ञान व शक्ती.

जीवनातील सर्वोच्च सुख एखाद्या गोष्टीचा त्याग केल्याने मिळते, एखादी गोष्ट मिळवल्याने नव्हे.

जीवन हा एक सागर आहे. त्याच्या तुफानी लाटांना पाहून मनुष्य घाबरतो , परंतु तळाशी असलेल्या रत्नांना शोधून काढण्याचा मात्र तो कधीच प्रयत्न करीत नाही.

परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा त्या परिस्थितीला आपणास आपणच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे.

कार्यात यश मिळो वा न मिळो , प्रयत्न करण्यास आपण कधीही माघार घेता कामा नये. – लोकमान्य टिळक

कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली की दुःखास प्रारंभ होतो आणि अपेक्षाच ठेवली नाही की दुःखाचे नावच उरत नाही. – ज्ञानेश्वरी

या जगात एकच जात आहे आणि ती म्हणजे माणूस आणि एकच धर्म आहे तो म्हणजे माणुसकी.

कोणाकडून कशाचीही अपेक्षा न करणारा माणूस सदैव सुखी असतो.

तुमची ज्याच्यावर माया आहे ; त्याही पेक्षा तुमच्यावर ज्याची माया आहे, त्याच्याशी मैत्री करणे अधिक हितावह असते.

परीक्षेच्या निकालाच्या दिवशी हसायचे असेल तर वर्षभर डोळ्यात पाणी येईपर्यंत अभ्यास करावा.

Motivational Quotes in Marathi For Students

कुठलीही गोष्ट आधी स्वतः करावी, मग दुसऱ्याला सांगावी.

पुस्तकी ज्ञान असू द्या ते जरुरी आहे , त्याचबरोबर व्यवहारज्ञान असणे ही महत्त्वाचे आहे.

स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत. अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका।

शिष्टाचाराचा एक महत्त्वाचा नियम, म्हणजे दुसऱ्याशी बोलताना स्वतः विषयी कमीत कमी बोलणे.

रत्नांचे ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एक क्षणही मिळू शकत नाही . म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो.

कोणत्याही विद्यार्थ्यांचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही अशा पद्धतीने शिकविणे हेच शिक्षण शास्त्राचे खरे मर्म आहे. – इमर्सन

जीवनात मनुष्य कित्येकदा पराभूत होतो, तरीपण पराभवाने खचून न जाता पुन्हा शौर्याने ताठ उभे राहणे हेच खरे जीवन आहे.

स्वतःच्या बुद्धीने चालून चूक करण्यापेक्षा दुसऱ्याने म्हणजेच यशस्वी व्यक्तीने दाखविलेल्या मार्गाने जाणे अधिक चांगले असते.

ज्या माणसाला माणुसकी नाही अशा माणसाला तुम्ही माणुसकी दाखविलीत तरच तुमच्या माणुसकीला अर्थ आहे.

एखाद्या गोष्टीत दोष शोधून काढणे सोपे असते पण तीच गोष्ट अधिक चांगल्या रीतीने करून दाखविणे अवघड असते.

Motivational Quotes in Marathi For Success

ज्याच्या अंगात काम करण्याची धमक आहे, त्याला पोट भरण्याची काळजी वाटत नाही.

केवळ स्तुती केल्यानंतरच नव्हे तर कोणी दोष दिल्यानंतरही ज्याची विनम्रवृत्ती कायम राहते तो खरा विनयशील.

जेथे स्त्रियांना मान दिला जातो तेथेच देवता संतुष्ट होतात. जेथे स्त्रियांचा अनादर केला जातो तिथे पवित्र धार्मिक विधी करूनही पुण्य लाभत नाही.

दुसऱ्यांच्या भावनांची कदर केली तरच ते आपल्या भावनांची कदर करू शकतील.

मनातील कुविचार हेच मानवाचे खरे शत्रू आहेत.

आपली मुले चांगली व्हावीत यासाठी आपण दुप्पट वेळ आणि निमपट पैसा खर्च केला पाहिजे.

सतत काम करत राहा, मग यश आपोआप तुमच्या मागून येईल.

कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वोच्चपदी पोहचण्यासाठी कामाविषयीची संपूर्ण बांधिलकी असणे आवश्यक असते.

स्वतःवर विश्वास असेल तर या जगामधील कोणतीही गोष्ट प्राप्त करणे असंभव नाही.

वर्तमानकाळातील प्रत्येक क्षणात आपल्याला संपूर्णपणे जगता आले पाहिजे.

जिथे तुमची भीती दडलेली असते तिथे तुमचे तेजही दडलेले असते.

एक मूल , एक शिक्षक , एक पुस्तक , एक लेखणी जग बदलू शकते. – मलाला युसफझाई

Motivational Quotes in Marathi For Success

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी इच्छा , ध्यास व दृढविश्वास या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात.

उत्तम रीतीने जीवन जगणाऱ्या माणसाविषयी जगभर आदरभावच असतो.

दुःखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला हात , प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. – स्वामी विवेकानंद

ज्या गोष्टी तुम्हाला प्रसन्न करतात , केवळ त्यांचाच तुम्ही विचार करा. त्यांचा नाही की जे तुमच्या मनात दुःख निर्माण करतात. – अब्राहम लिंकन

स्वावलंबी आणि कष्टाळू माणसांना संकटे कधीही शिवू शकणार नाहीत.

चांगल्या भावना मनात ठेवून उपयोग नाही. त्या शब्दरूपाने दुसऱ्यापर्यंत पोहचवता आल्या पाहिजेत.

तोंडातून निघालेला शब्द परत माघारी घेता येत नाही, म्हणून बोलताना विचार करावा.

विनोद म्हणजे जगातील दुःख, अडचणींकडे खेळकर दृष्टीने पाहणे होय.

जिद्द , दृढनिश्चय व आत्यंतिक तळमळ असेल तर विद्या प्राप्त होते. विनय हा ज्ञानी माणसाचा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे.

एखादं पुस्तकच काय एखादं महत्त्वाचं सूत्र किंवा एखादं वाक्यसुद्धा आयुष्याला नवी दिशा देणारे ठरू शकते.

अंधश्रद्धांना थारा देऊ नका. स्वत : च्या प्रयत्नांवर व बुद्धीवर विश्वास ठेवा. – स्वामी विवेकानंद

जो विनयशील वृत्तीचा असतो त्याचा कोणीही अपमान करू शकत नाही . – रोलेक्स

जेथे तुम्ही राहता ते घर नव्हे , जेथे तुम्हाला समजून घेतले जाते ते घर होय.

निरंतर परिश्रम करण्याची स्वाभाविक आवड म्हणजे प्रतिभा होय .

Motivational Quotes in Marathi Text

सदैव चांगल्या लोकांच्या सहवासात राहिले तर आपले मनही सद्गुणांचे उपासक होईल .

संकटांना जिद्दीने तोंड देणे म्हणजे बुद्धिमत्ता होय.

तुमचा प्रत्येक छोटा – मोठा निर्णयच तुम्हाला यशापयशाकडे घेऊन जाणारा मार्ग ठरत असतो.

कठीण परिस्थितीला घाबरून पळून न जाता परिस्थितीशी सामना करण्याचा गुण म्हणजे धैर्य होय.

तीन गोष्टी देत राहा, मान , दान , ज्ञान. – रवींद्रनाथ टागोर

गरज सरो , वैद्य मरो असे कधीही वागू नये.

प्रेमाच्या आणि माणुसकीच्या चार शब्दामुळे मैत्री वाढते, मात्र खन्या मैत्रीची पारख मात्र संकटकालीच होते.

संयम म्हणजे सामर्थ्य क्षमता सिद्ध करायची असते , सांगायची नसते.

चार जणांचा सल्ला जरूर घ्यावा , पण आपल्याला सुयोग्य वाटेल तेच करावे.

उपासतापास पडल्याशिवाय भुकेची तीव्रता , अज्ञानाच्या अंधकारात पिचल्याशिवाय शिक्षणाचे मूल्य आणि उन्हातान्हात राहिल्याशिवाय निवाऱ्याचे मूल्य माणसाला कळत नाही.

गुणी मनुष्य जगाला हवा हवासा वाटतो.

एखाद्या चुकीमुळे कालचा दिवस दुःखात गेला असेल तर, त्याच्या आठवणीने आजचा दिवस व्यर्थ गमावू नये.

आत्मविश्वास सुविचार मराठी

पाठांतर करून खूप माहिती लक्षात ठेवणे म्हणजे ज्ञान नव्हे , कोणत्याही परिस्थितीत तर्कशुद्ध व बुद्धिनिष्ट विचार करता येणे म्हणजे ज्ञान.

म्हातारपणात सुरकुत्या पडणार असतील तर त्या अंगावर पडू देत , मनावर नको. मन कधीही म्हातारे होता कामा नये.

मनुष्य कितीही शहाणा असला तरी अधिकाराचा चष्मा डोळ्यावर लावल्यावर त्याला पूर्वीचे जग वेगळेच दिसू लागते.

जो कधीही शंका उपस्थित करून प्रश्न विचारत नाही, तो काहीच शिकू शकत नाही.

जो केलेल्या उपकाराची जो परतफेड करीत नाही, तो मानव जातीला काळीमा आहे.

मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी नक्की होते.

चुका केल्याशिवाय आतापर्यंत एकही मनुष्य यशस्वी झालेला नाही.

नीच लोकांची संगत कधीच करू नये, आणी सज्जनाची संगत कधीच कधी टाळू नये.

धूर्त माणूस कधीही प्रामाणिक नसतो.

मनाची एकाग्रता ही ज्ञान साधनेची गुरुकिल्ली आहे.

निरंतर परिश्रम करण्याची स्वाभाविक आवड म्हणजे प्रतिभा होय.

खरे तेच बोलावे, उदात्त तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे आणि हित ज्यात असेल तेच करावे.

गुरू हा सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी, चंद्रापेक्षा अधिक शीतल आणि विजेपेक्षा अधिक शक्तिशाली आहे.

ग्रंथ आणि मित्र थोडेच असावे पण ते चांगले असावे.

जगातील दुःखांनी आपल्यासाठी जन्मच घेतला नाही असे समजून नेहमी हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही जीवनातील जास्तीत जास्त आनंद लुटू शकाल.

कितीही अडचणी आल्या तरी शुद्ध चारित्र्य त्यावर मात करते आणि आपला मार्ग मोकळा करून घेते.

Good thoughts in Marathi For Students

भूतकाळाच्या चुका वर्तमानकाळात होऊ नयेत यासाठी जे दक्षता बाळगतात , त्यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल असतो.

बाहेरच्या घडामोडीतील चुकांवर चर्चा करायला व्यक्तीला वेळ आहे , पण स्वतःच्या चुका शोधायला एक मिनिटही वेळ नाही.

आपल्या अंगी आत्मविश्वास , धैर्य , मनोबल या गोष्टी असल्याशिवाय यश मिळत नाही.

शिस्त , कार्यक्षमता आणि तत्परता या तीन गोष्टी वाढल्या की कर्तबगारी वाढते.

कोणतीही गोष्ट जोडायला वेळ लागतो , पण तोडायचे काम क्षणार्थात होते.

प्रतिभा म्हणजे एक टक्का स्फूर्ती आणि नव्याण्णव टक्के मेहनत व कष्ट असतात.

ग्रंथ म्हणजे काळाच्या विशाल समुद्रातून माणसाला घेऊन जाणारी जहाजे आहेत.

गरुड हा एकटाच उडत असतो , एकत्र घोळका करून जमतात ती फक्त मेंढरे असतात.

जशी शरीराला व्यायामाची गरज आसते , तसेच मनाला वाचनाची गरज आसते.

स्वावलंबनाने आपली मान वर राहते आणि परावलंबनाने मान खाली जाते.

आपली त्या कामातील आवडच आपले काम सोपे करते.

चांगल्या विचारांचे स्मरण करत रहा, मन आपोआप पवित्र होईल .

भोगापेक्षा त्यागातील वैभव श्रेष्ठ असते.

रागीट आणि चिडकी माणसे नेहमी अल्पायुषी असतात.

Inspirational Quotes in Marathi For Students

श्रेष्ठ माणसे सत्कार्याची कास धरतात तर दुबळे लोक देवाचा हवाला देतात.

सद्गुणांचा दुरुपयोग केला तर त्याला दुर्गुणांचे स्वरूप आलेच म्हणून समजा.

संकटसमयी मूर्ख लोक ज्योतिष्याकडे धावतात तर, शहाणे लोक आपल्या बुद्धिचातुर्याच्या व शक्तीच्या जोरावर संकटाशी सामना करतात.

माणसाचे सर्वांत मोठे तीन शत्रू आहेत. आळस , अज्ञान व अंधश्रद्धा.

अनोळखी माणसाला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये.

सज्जन लोकांची संगत म्हणजे सुखी जीवन आणि दुर्जन लोकांची संगत म्हणजे विस्तवाशी खेळ .

सुखाला कारण सुविचार तर दुःखाला कारण अविचार.

विचारांना कृतीची जोड मिळाली नाही , तर विचार कितीही प्रगल्भ असला तरी तो अर्थशून्य व निष्प्रभ ठरतो.

आईची माया आणि पित्याचे प्रेम तराजूत मोजता येत नाही.

विश्रांतीचे खरे सुख भरपूर काम केल्यानंतरच अनुभवता येते.

क्रोधाने रक्त जळते , आयुष्य घटते , हास्य मरते , उत्साह नष्ट होतो , आनंद मावळतो , क्रोध हा एक मानसिक विकार आहे या रोगावर संयम हेच एक औषध आहे.

Success Quotes in Marathi

चांगल्या गोष्टी जाणीवपूर्वक वारंवार केल्यामुळे चारित्र्य अस्तित्वात येते.

संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हा.

जो कर्तव्य पार पाडतो , तोच सुखाचा अधिकारी होतो.

प्रसन्नता ही सर्व सद्गुणांची जननी आहे.

कृतीशिवाय बोलणाऱ्यांना फार काळ किंमत राहत नाही.

सामान्य माणसे आधी तयार झालेल्या वाटेवरून जातात , पण थोडी ध्येयवादी , स्वप्नवेडी माणसे स्वतःचा मार्ग स्वतःच शोधतात किंवा स्वतःच निर्माण करतात.

चांगले दिसण्याचा मोह धरण्यापेक्षा चांगले होण्याचा प्रयत्न करा.

योग्य वेळी आणि योग्य शब्दात दिलेल्या प्रोत्साहनामुळे माणसाचा उत्साह द्विगुणित होतो व त्याच्या हातून मोठे कार्य होऊ शकते.

भिकेच्या पोळीपेक्षा कष्टाची भाकरी केव्हाही चांगली.

शिक्षक हा वयाने वृद्ध होत असला तरी ती ज्ञानाने नेहमीच तरुण असतो.

अनुभव मूर्ख माणसांनाही शिकवू शकतो , अनुभवातूनही जो शिकत नाही तो महामूर्ख होय. – टॉमस फूलर

दुःखावर रामबाण उपाय एकच तो म्हणजे विचलित न होणारे खंबीर मन. – प्लेटो

स्वतःची स्तुती , खोटा गर्व आणि अभिमान यांचा माणसाने त्याग करावा.

घर असावे घरासारखे , नकोत नुसत्या भिती। तिथे असावा प्रेमजिव्हाळा , नकोत नुसती नाती.

मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते.

वाईट परिस्थितीत जो आईवडिलांचे रक्षण व पोषण करतो तोच खरा पुत्र होय.

आईची ममता ही हिमालयाच्या उत्तुंग शिखरापेक्षाही उंच , विशाल व सागरापेक्षाही अथांग आणि आकाशातील पोकळीपेक्षा भव्य असते.

शारीरिक बळापेक्षा बुद्धीचे बळ अधिक परंतु बुद्धीच्या बळापेक्षाही शुद्ध चारित्र्याचे बळ अधिक असते.

Life Quotes in Marathi – जीवनावर मराठी स्टेटस

वैभवाच्या काळात तो कोणालाही ओळखत नाही आणि विपत्तीच्या काळात त्याला कोणीही ओळखत नाही.

आपल्या प्राणापेक्षाही दिलेल्या वचनाला अधिक जपावे.

काटेकोरपणे नियमितपणा पाळल्यास साधारण पात्रतेचा माणूससुद्धा मोठ्या पदाला पोहचू शकतो.

सर्व चांगल्या गोष्टींसाठी टापटीप आणि व्यवस्थितपणा याची आवश्यकता असते.

तोंडातून निघून गेलेला शब्द आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही.

जो दुसऱ्यावर विसंबून राहतो, त्याचा कार्यभाग बुडतो.

भुकेने कासावीस झालेले पोट नी अन्यायाने तडफडणारे मन यातून क्रांतीचा जन्म होतो.

शिस्त , कार्यक्षमता व तत्परता या तीन गोष्टी वाढल्यावरच कर्तबगारी वाढते. – पंडित नेहरू

क्रोधाचा उगम मूर्खपणात व त्याचा अंत पश्चात्तापात होतो.

ज्याप्रमाणे राजवाड्याच्या शिखरावर बसलेला कावळा श्रेष्ठ ठरत नाही , त्याप्रमाणे मनुष्य उच्चासनाने श्रेष्ठ ठरत नाही तर अंगच्या गुणांमुळे श्रेष्ठ ठरतो.

जीवनात विनोद आणि हास्य याला महत्त्वाचे स्थान आहे, पण जीवनाचे हास्य करू नका.

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात.

ज्यांना विचार करण्या इतकी सुद्धा बुद्धी नसते, ते केवळ करमणुकीतच सगळे सुख आहे असे मानतात.

अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही.

ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नव्हे, तर ती अभ्यास व कष्ट करून मिळवावी लागते.

डॉक्टरी उपायापेक्षा पथ्य पाळल्यानेच रोग लवकर बरा होतो.

व्यसन जरी लहानसेच असले तरीही त्याने नुकसान हे होतेच.

शांतीने रागाला, नम्रतेने अभिमानाला, सरळतेन मायेला आणि समाधानाने लोभीपणाला जिंकले पाहिजे.

अनुभव हा महान शिक्षक आहे , पण तो मोबदला फार घेतो.

आपण विजयी होऊ असा दृढविश्वास ज्यांचा मध्ये असतो तोच खात्रीपूर्वक विजयी होतो.

ज्याला आपल्या घरात शांती मिळते तोच खरा सुखी. मग तो राजा असो किंवा शेतकरी असो.

एकमेकातील द्वेषाची भावना सुडाने नष्ट होत नाही तर ती प्रेमानेच नष्ट होते. – गौतम बुद्ध

म्हातारपणी खर्च करता यावा म्हणून तरुणपणी पैसे वाचवा.

Marathi Inspirational Quotes – प्रेरणादायी मराठी सुविचार

कोणतेही मोठे कार्य उत्साहाशिवाय यशस्वी होत नाही.

काठ्या व दगड फार तर हाडे मोडतील पण शब्द मात्र अनेकदा नाती तोडतात.

आशावादी दुःख विसरण्यासाठी हसतो आणि निराशावादी हसण्याचेच विसरतो.

पुरुष परमेश्वराची कीर्ती आहे , पण स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे.

तुम्हाला कोणी फसवले म्हणून तुम्ही कोणास फसवणे हे योग्य नाही.

जीवनातला प्रत्येक दिवस हा आपला शेवटचा दिवस आहे असे समजून आनंदात जगा.

खरा मित्र तोच जो तोंडावर कडू बोलतो परंतु पाठीमागे आपली स्तुती करतो.

लोभी माणसाला सर्व सुखे प्राप्त झाली तरी त्याला कधीच समाधान लाभत नाही. – सेंट पॉल

विनयशीलतेने जेवढी कामे होतात, तेवढी कामे अधिकार चालवून होत नाहीत.

शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे.

ज्या ज्या दिवशी आपली थोडीसुद्धा प्रगती झाली नसेल , तो दिवस आपला फुकट गेला आहे असे समजावे.

संभाषणावरून माणसाची खरी किंमत होते. चांगल्या स्वभावाची माणसे साहजिकपणे चांगलेच बोलतात.

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर परस्त्री, परनिंदा व परद्रव्य या 3 गोष्टींचा मोह टाळा.

आपली आई आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे.

मनुष्याने आपण होऊन आपला उद्धार करावा.

हृदयातला माणुसकीचा झरा आटू देऊ नका.

बौद्धिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय.

गुणांचे कौतुक करताना कंजुषपणा कधीच करू नये.

गैरसमज पोटात न ठेवता त्याचे निराकरण करावे.

मौन धारण करणाऱ्याचे कधीच कोणाशीही भांडण होत नाही.

Marathi Quotes on Life – जीवनावर मराठी सुविचार

आईचे प्रेम जेथे असेल , ती झोपडी राजराजेश्वराच्या ऐश्वर्यालाही लाजवील. आणि हे प्रेम जिथे नाही, ते महाल दिवाणखाने म्हणजे स्मशानच होय.

ग्रंथाइतका प्रांजळ व निष्कपट दुसरा गुरू मिळणार नाही.

अयपश आले तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही सोडू नका . – विवेकानंद

बोलावे की बोलू नये हा भ्रम निर्माण झाल्यास मौन पाळावे.

समंजस माणूस आपल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करताना कचरत नाही.

तुम्ही दुसऱ्याचे वाईट करायला गेलात , तर तुमचेच वाईट होईल.

समोर अंधार दिसत असला तरी त्याच्या पलीकडे उजेड आहे हे कायम लक्षात ठेवावे.

तुमच्या कृतीपेक्षा तुमचे शब्दच तुम्हाला शत्रू निर्माण करायला कारणीभूत ठरतात.

मनाच्या निर्मळते शिवाय निर्भयता उत्पन्न होत नाही.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. म्हणून त्यांना निर्माण होय देऊ नका.

जो मुलांचे मन जाणतो तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो.

गुरू तेथे ज्ञान , ज्ञान तेथे आत्मदर्शन आणि आत्मदर्शन तेथे समाधान.

विचारांच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.

गुरू म्हणजे माणसाच्या रूपातील परमात्मा.

दुर्बल माणूस संकट येण्यापूर्वीच घाबरतो , भित्रा माणूस संकट आल्यावर घाबरतो तर धैर्यवान माणूस संकटातून पार पडल्यावर घाबरतो.

आपण कोण आहोत हे माहिती असण्यापेक्षा , आपण कोण होणार हे समजणे सर्वात महत्त्वाचे आहे.

motivational quotes, marathi hindi

आई असे पर्यंत तिची किंमत वाटत नाही , आणि ती गेली की मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही.

चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय कीर्तीचा सुगंध दरवळत नाही .

जगाने आपल्यासाठी जे केले त्याहून अधिक आपण जगासाठी केल्यानेच यश मिळते.

आपल्या बोलण्यातील आणि वागण्यातील नम्रता माणसाला यशाच्या उंच शिखरावर नेते.

आपले जीवन सुखात घालवायचे असेल तर शब्द जपून वापरावेत व ते मधुर स्वरात उच्चारावेत.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते अकस्मात खाली कोसळतात.

अज्ञानापेक्षा ग्रंथ वाचणारे श्रेष्ठ , त्यांच्यापेक्षा ग्रंथ समजणारे श्रेष्ठ आणि त्यांच्याहून आत्मज्ञानी श्रेष्ठ.

सद्गुणाशिवाय सौंदर्य म्हणजे बिनवासाचे फूल होय.

प्रसन्नता आणि नम्र स्वभाव ही माणसाजवळ असलेली दोन शिफारस पत्रेच आहेत.

सुशिक्षित नेहमी सुसंस्कृत असतातच असे नाही. तसेच सर्व अशिक्षित असंस्कृत असतातच असे नाही.

दिवस चांगल्या तऱ्हेने घालवला तर समाधानाची झोप मिळते.

इतरांच्या आयुष्यात जे प्रकाश आणतात ते स्वतः त्यापासून दूर राहू शकत नाहीत.

सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

प्रेम कधी ही सूड घेत नाही व अपराध पोटात घेते.

जो व्यक्ती कायम काटकसर करतो तो कधीच दरिद्री होत नाही.

दुसऱ्याला हसविण्यात स्वत: चे मन मोकळे होते आणि स्वच्छ होते.

ज्याचा एकदा वाईट अनुभव आला तर त्यावर पुन्हा कधी ही विश्वास ठेवू नये.

जो दुसऱ्याची योग्यता ओळखतो आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो तोच खरा सुखी.

जो काम करतो त्याच्याच हातून चुका होतात.

प्रेरणादायी विचार मराठी – Motivational Thoughts in Marathi

शिक्षणाशिवाय माणसाला स्वतःची ओळख होऊ शकत नाही.

चांगल्या गोष्टीचे चितन केल्याने मनुष्य चांगला होतो.

यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे.

जेव्हा माणसाचा तोल सुटतो , तेव्हा मौन स्वीकारून मन शांत झाल्यावरच बोलावे.

स्त्री व पुरुष ही समाजरथाची दोन चाके असून त्यांना समान संधी व दर्जा दिल्यावरच समाज प्रगती करू शकतो.

माणसाची कृती ही त्याच्या विचारांचा आरसा असते.

कुटुंबातील अखंड प्रेमाचा झरा म्हणजे आई होय.

न बोलता आपला पराक्रम करून दाखवणे हेच सत्पुरुषाचे व्रत होय.

रोज एका माणसाला तरी आनंद देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे दहा वर्षात ३६५० माणसे किंवा जवळजवळ एक छोटे शहर तुम्ही आनंदित केलेले असेल .

तुम्ही हसलात तर सर्व जग तुमच्याबरोबर हसेल , पण रडू लागलात तर तुमच्या दुःखात कोणीही सहभागी होणार नाही.

जगामध्ये नेहमी दात्याची भूमिका घ्या. सर्व काही दान करा व परतीची अपेक्षा करू नका.

विरोध दर्शवून व भांडून तुम्ही विजय मिळवाल तर तो व्यर्थ आहे. कारण त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या शुभेच्छा तुम्हाला कधीच मिळणार नाही.

Inspiring Quotes in Marathi For Success

जोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या अनुभवाच्या व बुद्धीच्या कसोटीला उतरून खरी ठरत नाही , तोपर्यंत ती कोणीही सांगितलेली असली तरी खरी मानू नका.

क्षमा करणे चांगले पण विसरणे अधिक चांगले.

आलेल्या संकटांना जो कोणी आनंदाने स्वीकारतो तोच खरा सुखी होतो.

जो गतगोष्टींचा विचार करत नाही आणि भविष्यकाळाला भीत नाही, तोच खरा सुखाचा मालक आहे.

दुसरा काय म्हणतो यापेक्षा स्वतःला काय वाटते ते महत्त्वाचे असते.

मायेच्या धाग्याने जोडलेले जीव कितीही लांब असले तरी ते एकत्रच असतात.

नाते हे झाडाच्या मुळासारखे असते , पण त्याला प्रेमाचा ओलावा नसेल तर त्या नात्याचा काय उपयोग!

जीवनात से धैर्य व आधार देतात, आलेल्या संधीचा योग्य फायदा घेणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होते.

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील यश तिने आज काय प्राप्त केले यावर नव्हे , तर त्यासाठी किती प्रमाणात अडथळे ओलांडले यावरून ठरते. – बुकर वॉशिग्टन

आईने पाठीवरून प्रेमळपणाने हात फिरवून केलेले उपदेश साऱ्या ज्ञानापेक्षा पवित्र असतात.

अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वांत मोठे कारण आहे.

पराक्रमाचा अभिमान असावा पण उन्माद नसावा . – वि . स . खांडेकर

जो कसलीच चिंता करत नाही त्यालाच जीवनात शांती आणि आराम मिळतो.

दुसऱ्याचे दुःख स्वतःचे समजणे याचेच नाव दया.

दुर्जन मंडलीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे , आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे अधिक चांगले असते.

ज्याच्याजवळ धैर्य आहे व जो मेहनत करायला घाबरत नाही.

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.

दुसऱ्याचे हृदय जिंकून घेणारा नशीबवान समजला जातो ; परंतु जो स्वतःला जिंकू शकतो त्याच्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नाही .

सतत थेंबाथेंबाने पडणारे पाणी कठीण पाषाणालाही भेदू शकते ; परंतु पाण्याचा मोठा लोंढा त्याच्यावरून वाहून गेला तर त्याची नावनिशाणीही राहत नाही. स्वेट मॉर्डन

मित्रानो हे होते ते आयुष बदलणारे प्रेरणादायी मराठी सुविचार, तुम्हा सर्वांना हे सर्व प्रेरणादायी मराठी सुविचार वाचून कसे वाटले? आणि यातून तुम्हाला नवीन काय शिकायला मिळाले? खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा.

मित्रांनो जर तुम्हाला आमच्या द्वारे लीहले गेलेलं Best Motivational Quotes in Marathi आर्टिकल आवडले असतील किंवा तुमच्यासाठी उपयोगी ठरले असेल तर या प्रेरणादायी सुविचार इन मराठी आर्टिकल ला इतरानसोबत अवश्य शेयर करा.

Releted Posts:

  1. Best 135 Positive Thoughts in Marathi
  2. Best 165 Life Changing Swami Vivekananda Quotes in Marathi
  3. Top 10 Best Marathi Books to Read Before You Die
  4. Top 3 Best Motivational Speech In Marathi For Students
  5. Best Motivational Quates in Hindi

Motivational Quotes in Marathi PDF Free Download

मित्रांनो जर तुम्ही Motivational Quotes in Marathi PDF Free Download करणार असाल तर, तुम्ही खाली दिलेल्या डाऊनलोड लिंक वरती क्लिक करून Motivational Quotes in Marathi PDF Free Download करू शकता.

मित्रानो आजच्या ह्या Motivational Quotes in Marathi आर्टिकल मध्ये फक्त एवढेच , मित्रानो आपण परत भेटू अशाच एका लाईफ चेंजिंग आर्टिकल सोबत, तो पर्यंत तुम्ही जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.

धन्यवाद 🙏🙏🙏

Rate this post
अपने दोस्तों के साथ शेयर कीजिये.

Leave a Comment