Chinta Soda Sukhane Jaga Book Summary in Marathi | How to Stop Worrying and Start Living Summary in Marathi
नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मोटिवेशनल ब्लॉग वरती सहर्ष स्वागत आहे. मित्रानो मी आज तुमच्या सोबत एका लाईफ चेंजींग पुस्तकाची मराठी समरी शेयर करणार आहे.
मित्रांनो जर तुम्ही ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत वाचले तर तुम्हाला ह्या आर्टिकल मधून खूप काही शिकायला मिळणार आहे. म्हणून मित्रानो ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.
Chinta Soda Sukhane Jaga Book Summary in Marathi
मिञांनो जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या चिंतेने ग्रस्त आहे. आणि चिंता अनेक प्रकारच्या असतात. जीवन आहे तर चिंता आहे. आणि प्रत्येक चिंतेचे काही ना काही समाधान नक्कीच असते; पण आपल्या चिंतेमध्येच आपण इतके गुरफटून गेलेले असतो की, फक्त चिंता करूनच अस्वस्थ होत असतो.
मित्रांनो चिंतेच्या बाबतीतली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यामुळे आपली एकाग्रतेची शक्ति संपून जाते आणि निरोगी व्यक्ती पण चिंता केल्याने आजारी पडते. डॉ. अलेक्सिस कॅरोल यांनी असे म्हंटले होते की ,
“ज्यांना चिंतेशी संघर्ष करता येत नाही, ते तारुण्यातच मृत्यु स्वीकारतात.”
मित्रांनो तुम्ही चिंतारुपी कॅन्सर ने ग्रस्त आहात का? आणि या चिंतारुपी कॅन्सर पासून तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल? तर आज च्या या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा. कारण या आर्टिकल मधून तुम्हाला चिंतेवर मात करून सुखाने जगण्याचा मूलमंत्र जाणून घ्यायला मिळणार आहे, जो तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो.
चिंता सोडा सुखाने जगा पुस्तकाच्या लेखकांविषयी थोडक्यात :
मिञांनो चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकाचे लेखन इंटरनेशनल बेस्ट सेलर पुस्तकं “लोक व्यवहार” या पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी यांनी केले आहे. आणि त्यांनी खूप सारी पुस्तके ही लिहली आहेत, जी आज पण पॉप्युलर आणि बेस्ट सेलर आहेत.
मिञांनो त्यांनी चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकात चिंता सोडुन सुखाने जगण्याचे खूप सारे मूलमंत्र दिले आहेत. आणि चिंतांच्या समस्याचे विश्लेषण कसे करावे आणि कश्या प्रकारे त्या सोडवाव्यात याची व्यावहारिक उत्तरे पण दिली आहेत.
मिञांनो या पुस्तकात दिलेल्या मूलमत्रांना जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अमलात आणले तर तुम्ही आनंदी आणि निरोगी राहून सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकता. चला तर मग चींतेवर मात करून सुखाने जगण्याचे मूलमंत्र जाणून घेऊया.
आज कसे जगावे?
मिञांनो चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी जी असे म्हणतात की जर तुम्हाला सुखी आणि चिंता मुक्त जीवन जगायचे असेल तर तुम्हाला डे नाईट कंपार्टमेंट मध्ये जीवन जगावे लागेल.
मिञांनो डे नाईट कंपार्टमेंट मध्ये जीवन जगणं म्हणजे नेमकं काय आणि ते कसे जगावे? हे मी तुम्हाला साध्या सरळ भाषेत समजावण्याचा प्रयत्न करतो. डे नाईट कंपार्टमेंट मध्ये जीवन जगणं म्हणजे वर्तमान मध्ये जगने आणि फक्त न फक्त आजच्या पुरते जीवन जगणे.
मित्रानो एका महान व्यक्तीचे असे म्हणणे आहे की, 👇👇
“उद्याचा आजिबात विचार करू नका. कारण उद्या आपला विचार स्वतः करेल, आजच्या वाईटासाठी आजचाच दिवस पुरेसा आहे.”
मित्रानो यावर तुमचे मत असे असेल की “उद्याचा विचार तर करावाच लागेल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी योजना तर आखवीच लागेल आणि त्यासाठी तयारी तर करावीच लागेल. म्हातारपणासाठी बचत तर करून ठेवावीच लागेल.
मिञांनो हे खर तर आहे, असेच करायला हवे. परंतु वरती दिलेल्या ओळीचा अर्थ तुम्ही वेगळाच घेतला आहे. त्या ऐवजी त्या ओळीचा अर्थ असा आहे की “उद्याचा विचार करा, पण जराशा सावधानी पूर्वक करा, योजना आखा, तयारी करा पण उद्याची चिंता मात्र करू नका.”
मित्रांनो या वेळी या क्षणी तुम्ही आणि आपण सर्वच २ शास्वत प्रवाहाच्या संगमावरती उभे आहोत. एक म्हणजे आपला विराट भूतकाळ, जो नेहमीच आपल्या सोबत असतो आणि दुसरे म्हणजे आपले भविष्य, जे आपल्या आयुष्यातील आखेराच्या क्षणापर्यंत चालतं आसते.
या दोन्ही पैकी कोणत्याही एका शास्वत प्रवाहात राहणे, या क्षणी आपल्याला शक्य आहे का? नाही, एका क्षणासाठी सुद्धा नाही. तरी ही आपण तशा प्रकारचा प्रयत्न करून आपल्या शरीराचे आणि मनाचे नुकसान करीत असतो.
- जरुर वाचा: Vichar Niyam Marathi PDF Free Download
- जरूर वाचा: Think and Grow Rich Marathi Summary – With Marathi Pdf Download
पण एक असा क्षण आहे ज्या क्षनामध्ये तुम्ही आणि आपण सर्वच सुखा समाधानाने जगू शकतो, आणि तो क्षण आहे, आतापासून ते झोप पर्यंतचा क्षण. मित्रानो रॉबर्ट लुई यांचे असे म्हणणे आहे की, ओझे किती ही अवजड असेल तरी ही व्यक्ती ते रात्री झोपेपर्यंत उचलू शकतो.
म्हणजेच मित्रानो सूर्य मावळतेला जाई पर्यंत कोणी ही व्यक्ती आनंदाने, धेर्याने, प्रेमाने, शांततेनं जगू शकते. आणि अश्या प्रकारे जीवन जगणे हाच जगण्याचा खरा अर्थ आहे. आणि जीवनाची पण आपल्या कडून हीच अपेक्षा असते.
मित्रानो रोम मधील कवी होरेस यांनी असे लीहले आहे की,
आज फक्त तोच सुखी आहे, जाच्यामध्ये आजला आपले म्हणण्याचे सामर्थ्य आहे. आणि आत्मविश्वासाने भरलेला जो असू म्हणू शकतो, “उद्या तुला काय करायचे असेल ते कर, मी आज चा दिवस तर जगून घेतला आहे.”
मित्रानो लहान मूल असे म्हणते की ‘मी मोठा झाल्यावर…’ ते मोठे झाले की म्हणते ‘मी कमवायला लागल्यावर…’ कमवायला लागल्यावर म्हणतो की ‘माझे लग्न झाल्यावर…’ लग्न पण होते. मग काय फरक पडतो? आता त्यांचा परत विचार बदलतो आणि म्हणतो की ‘मी रिटायर झाल्यावर..’
आता खरोखरच रिटायर झाल्यावर तो मागे वळून आपल्या जीवन प्रवासाकडे पाहतो, तर त्याला थंड हवेमुळे कापरे भरून येते. काय माहित कसे पण आपण सर्व काही गमावले आहे, आणि जीवन तर मागेच राहून गेले आहे. म्हणून मित्रानो हे जीवन प्रत्येक क्षणासाठी जगायचे आसते, हे आपल्याला खूप उशिराने लक्ष्यात येते.
त्यामुळे आपण दररोज, दर तासाला, दर क्षणाला जीवन जगायला हवे. डेट्रॉईट चे कैलाशवाशी एडवर्ड एस. एवांस तर चिंता करता करता मृत्यूच्या जवळ गेले होते. तेव्हा कुठे ते शिकले की “जीवन दर क्षणाला जगण्यासाठी असते, त्यामुळे ते आपण दररोज, दर तासाला जगायला हवे.
मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जीवनातून चिंता हद्दपार करायची असेल तर तुम्हाला भूतकाळ आणि भविष्याचे दरवाजे लोखंडी दाराने बंद करावे लागणार. आणि एक एक दिवस day Night Compartment मध्ये जगावे लागणार. आणि त्या सोबतच स्वतः ला हे प्रश्न विचारा की …
मी भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा पश्चात्ताप करून मी माझा वर्तमान बिघडवित आहे का? आणि भूतकाळात जे घडून गेले आहे, त्यात काही सुधारणा केली जाऊ शकते का?
‘आज ला धरून ठेवा’ अशा प्रकारचा संकल्प करून मी रोज सकाळी उठतो का? याच २४ तासात जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो का?
डे नाईट कंपार्टमेंट मध्ये मी अतिशय चांगल्या प्रकारे जगू शकतो का? असे करायला मी कधी पासून सुरुवात करील? पुढच्या आठवड्यात, उद्यापासून की आज आणि आता पासूनच ?
मी वर्तमान मध्ये जगणे टाळीत आहे कारण मला उद्याची चिंता वाटते आणि मला क्षितिज वरील चमत्कारी गुलाबी बागेची अपेक्षा आहे?
- जरूर वाचा : The Secret Book in Marathi Pdf Free Download
- जरूर वाचा : Rich Dad Poor Dad Book Summary In Marathi
चिंतादायी परिस्थितीवर मात करण्याचे उपाय
मित्रानो चिंतादायी परिस्थितीवर मात करण्याचे अचूक सूत्र तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे का? जर माहीत करून घेणार असाल तर मी तुम्हाला लगेच काम करू शकणारा एक असा उपाय सांगणार आहे. ज्याचा वापर विलिस कॅरिअर यांनी आपल्या चिंतादायी परिस्थितीवर मात करण्यासाठी केला होता.
पहिला टप्पा:
मिञांनो जेव्हा तुमच्यावर चिंतादायी परिस्थितीवर मात करण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्ही न घबरता, प्रामाणिकपने त्या स्थितीचे विश्लेषण करा आणि अंदाज लावा की या अपयशाच्या परिणाम म्हणून माझ्या बाबतीत वाईटात वाईट काय होऊ शकते?
दुसरा टप्पा:
नंतर त्यामुळे होणाऱ्या वाईटात वाईट परिणामाचा अंदाज लावल्यानंतर तुम्ही त्या स्थितीला स्वीकारण्यासाठी तुमची मानसिक तयारी करा. म्हणजेच आवश्यकता पडली तर त्याचा स्वीकार करण्यासाठी सुध्दा तयार रहा.
तिसरा टप्पा:
त्यानंतर त्यामधील वाईटात वाईट स्थितीला कशी सुधारता येईल यावर तुम्ही तुमची सर्व ऊर्जा आणि सर्व वेळ शांतपणे खर्च करण्याचे ठरवा. म्हणजेच शांतपणे वाईटातील वाईट स्थितीला सुधारण्याचा प्रयत्न करा.
मिञांनो जर तुम्ही ह्या 3 स्टेप्स ना follow केले तर, तुम्ही कोणत्याही चिंतादायी परिस्थितीवर मात करू शकता. आणि त्या चिंतादायी परिस्थितीतून व्यवस्थितपने बाहेर पडू शकता.
- जरूर वाचा: Top 15 Best Motivational Stories In Marathi For Success
- जरूर वाचा : The Psychology of Money Marathi Summary
चिंता दूर कशी करावी आणि चिंता मिटवण्याचे नियम:
मित्रानो तुम्ही जर खूप चिंता करत असाल आणि जर तुम्हाला चिंता मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला कोणत्यान कोणत्या तरी कामात व्यस्त राहावे लागेल. कारण चिंतित असलेल्या व्यक्तीने कामामध्ये पूर्णपणे बुडून जायला हवे. नाही तर तो निराशेन कोमेजून जाईल.
मित्रांनो आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगून हे समजविण्याचा प्रयत्न करणार आहे की चिंता रुपी वाळवी कशी आपल्या मनात घर करून आपली अंतर्गत शक्ति पोखरून टाकते.
मिञांनो कॉलोरेडो मध्ये एका अतीविशाल वृक्षाचे काही अवशेष शिल्लक आहेत. तो वृक्ष सुमारे चारशे वर्षे उभा असावा, असे निसर्ग विज्ञान सांगते. जेव्हा कोलबंसने सॅन सॅल्वाडोर मध्ये पाऊल ठेवले होते, तेव्हा हा वृक्ष म्हणजे इवले से रोपटे होतें.
जेव्हा तीर्थयात्रा करणारे फ्लाय माऊथ मध्ये बसले तेव्हा हा वृक्ष अर्धा झाला होता. याच्या अतिशय दीर्घ आयुष्यात त्याच्यावर चौदा वेळ वीज कोसळली. चार शतकांत शेकडो वेळा वादळे आली, पण कोणी त्याच्या केसालाही धक्का लाऊ शकले नाही.
पण शेवटी वाळवीच्या सैन्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला जमिन दोस्त केले. वाळवी त्याच्या सालीच्या आत घुसली आणि लहान लहान पण सतत हल्ले करीत त्या वाळविणे त्या विशालकाय वृक्षाला पोखरून टाकले.
- जरूर वाचा: Think and Grow Rich Marathi Summary – With Marathi Pdf Download
- अवश्य वाचा: The Alchemist Marathi Book Summary – With Marathi PDF Download
जंगलातील विशालकाय वृक्ष ज्याचे काळ काही बिघडवू शकला नाही , ज्याच्यावर वीजेचा किंवा वादळी वाऱ्याचा काही परिणाम झाला नाही, असा वृक्ष अशा बारीक सारीक कीटकांपुढे पराभूत झाला, ज्याला माणूस चिमटीत धरून ठार मारू शकतो.
मिञांनो आपण सर्व जण पण त्या विशालकाय वृक्षा सारखेच आहोत, म्हणजेच आपल्या जीवनातील विजेचा किंवा वादळी वाऱ्याचा आपण कसा तरी सामना करतोच की नाही? या उलट चिंतेची वाळवी आपल्या मनात घर करून आपली अंतर्गत शक्ति पोखरून टाकते. छोटी वाळवी, जिला आपण चुटकी मध्ये कुस्कुरून टाकू शकतो.
म्हणून मित्रानो चिंतेने तुम्हाला संपवून टाकायच्या आधी तुम्ही चिंतेला संपवून टाकण्याच्या दुसरा नियम असा आहे की तुम्ही स्वतःला बारीक सारीक गोष्टीमुळे विचलित होऊ देऊ नका, ज्याच्याकडे खर तर दुर्लक्ष्य करायला हवे किंवा ज्यांना विसरायला हवे.
मिञांनो हे कायम लक्ष्यात ठेवा की
“हे जीवन इतके लहान आहे की ते व्यर्थ वाया जातं कामा नये.”
मिञांनो आज च्या ह्या आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मिञांनो ही फक्त ह्या पुस्तकाची छोटी सी समरी होती, जर तुम्ही हे पुस्तक पूर्णपणे वाचणार असाल तर या पुस्तकाची मराठी pdf फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता. पुस्तक डाऊनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
मित्रानो जर तुम्हाला ही मराठी समरी आवडली असेल किंवा तुमच्या साठी उपयोगी ठरली असेल तर या आर्टिकल ला तुमच्या मित्र मैत्रीण सोबत अवश्य शेयर करा. त्या सोबतच आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करा.
Chinta Soda Sukhane Jaga PDF Free Download
मिञांनो जर तुम्ही Chinta Soda Sukhane Jaga PDF Free Download करणार असाल किंवा या पुस्तकाची प्रिंटेड कॉपी विकत घेणार असाल तर त्या दोन्हींची लिंक मी खाली दिलेली आहे.
- Chinta Soda Sukhane Jaga PDF Free Download
- Marathi Paperback: Buy on Amazon
- Chinta Chhodo Sukh Se Jiyo Hindi Book Pdf Free Download
- Hindi Paperback: Buy on Amazon
मित्रानो आजच्या या Chinta Soda Sukhane Jaga Book Summary in Marathi आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रानो आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग आर्टिकल सोबत तो पर्यंत तुम्ही जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.
धन्यवाद…
Sir
Very Useful information. Good job