आयुष्य बदलून टाकू शकतात तुमचे हे प्रेरणादायी सुविचार, जाणून घ्या आताच कोणते आहेत ते…

आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी सुविचार | Best Motivational Quotes in Marathi For Success

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मोटीवेशनल ब्लॉग वरती सहर्ष स्वागत आहे. मित्रानो मी आज तुमच्या सोबत आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी सुविचार Share करणार आहे, म्हणून मित्रानो या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.

मित्रानो मी अशी आशा करतो कि हे सर्व प्रेरणादायी सुविचार जे आज मी तुमच्या सोबत share करणार आहे, ते तुम्हाला नक्की आवडतील आणि तुमच्यासाठी उपयुक्त ही अवश्य ठरतील. चला तर मग आर्टिकल ची सुरुवात करूया..

Best Motivational Quotes in Marathi For Success
Best Motivational Quotes in Marathi For Success

आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी सुविचार | Best Motivational Quotes in Marathi For Success

प्रत्येक प्रयत्नाचा शेवट हा ‘यश’ हाच असतो, आणि जर तस नसेल तर समजून जायचं की आजुन शेवट आलेला नाही ये. – अब्राहम लिंकन

पुस्तकासारखा मित्र नाही, त्याला जवळ करण्याचा अवकाश की ते आपले अंतरंग खुले करते. ते आपल्याला कधीही फसवत नाही, चुकवत नाही. ते नेहमी आपल्या सेवेत तत्पर असते.

जोपर्यंत तुम्ही मनावर ताबा मिळवू शकत नाही , तोपर्यंत तुमचे राग – द्वेष नष्ट होत नाहीत आणि तुमच्या इंद्रियावरही तुम्ही ताबा मिळवू शकत नाही.

मित्र ढालीसारखा असला पाहिजे म्हणजे तो सुखात तुमच्या मागे परंतु दुःखाच्या वेळी तो तुमच्या पुढे असला पाहिजे.

चांगली कल्पना सुचली तर त्यावर कष्ट घेण्यास आजिबात आळस करू नका. कारण लक्ष्यात ठेवा की, फक्त एक चांगली कल्पना तुमचे आयुष्य बदलवू शकते.

खोटे बोलण्याने माणूस काही मिळवत तर नाहीच, परंतु त्याच्यावरील असलेला लोकांचा विश्वास मात्र तो गमावून बसतो.

कार्यात यश मिळो वा न मिळो , प्रयत्न करण्यास आपण कधीही माघार घेता कामा नये. – लोकमान्य टिळक

स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत. अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका।

रत्नांचे ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एक क्षणही मिळू शकत नाही . म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो.

एखादं पुस्तकच काय एखादं महत्त्वाचं सूत्र किंवा एखादं वाक्य सुद्धा आयुष्याला नवी दिशा देणारे ठरू शकते.

Motivational Thought in Marathi – प्रेरणादायी विचार इन मराठी

जे काही करावे असे तुमच्या मनात असेल त्या विषयी उगीच बोलू नका, त्या ऐवजी काय करणार आहे ते आधी करून दाखवा.

उपासतापास पडल्याशिवाय भुकेची तीव्रता , अज्ञानाच्या अंधकारात पिचल्याशिवाय शिक्षणाचे मूल्य आणि उन्हातान्हात राहिल्याशिवाय निवाऱ्याचे मूल्य माणसाला कळत नाही.

भूतकाळाच्या चुका वर्तमानकाळात होऊ नयेत यासाठी जे दक्षता बाळगतात , त्यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल असतो.

जशी शरीराला व्यायामाची गरज आसते , तसेच मनाला वाचनाची गरज आसते.

व्यसन जरी लहानसेच असले तरीही त्याने नुकसान हे होतेच.

आपण विजयी होऊ असा दृढविश्वास ज्यांचा मध्ये असतो तोच खात्रीपूर्वक विजयी होतो.

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर परस्त्री, परनिंदा व परद्रव्य या 3 गोष्टींचा मोह टाळा.

आई असे पर्यंत तिची किंमत वाटत नाही , आणि ती गेली की मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही.

जो व्यक्ती कायम काटकसर करतो तो कधीच दरिद्री होत नाही.

जोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या अनुभवाच्या व बुद्धीच्या कसोटीला उतरून खरी ठरत नाही , तोपर्यंत ती कोणीही सांगितलेली असली तरी खरी मानू नका.

दुर्जन मंडलीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे , आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे अधिक चांगले असते.

Inspirational Quotes in Marathi For Success

जो व्यक्ती आपल्या विजयानंतर ही सयंम ठेवतो, त्या व्यक्तीला दुप्पट विजय लाभतो.

स्तुतीचा वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळा परिणाम होतो. ती विचारी माणसाला नम्र बनवते , मुर्खाला अहंकारी बनवते, व दुर्बलांना अधिक दुर्बल बनवते.

आळस हा मनुष्याच्या प्रत्येक चांगल्या कामात आड येणारा प्रबळ शत्रू आहे.

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, प्रयत्न तरी करीनच , असे धैर्य कायम बाळगा तर तुमची प्रगती निश्चित होईल.

सध्या तुमच्या जवळ जे लहान काम आहे ते उत्तम प्रकारे करून दाखवा, मग मोठे काम स्वतःहून तुमचा मागोवा घेईल.

चांगले विचार मनात नेहमी येत नाहीत, म्हणून ते मनात येताच त्यावर कृती करायला सुरुवात करा.

आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला अजिबात दुःख होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे खरी नीतिमत्ता होय.

दृढ निश्चय हा सर्व शक्तिमान आहे. जगात कोणीतरी होण्याचा निश्चय करा आणि तुम्ही तसे व्हाल. मोठे होण्याचे स्वप्न भगा आणि मग तुम्ही नक्की मोठे व्हाल.

परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा त्या परिस्थितीला आपणास आपणच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे.

जीवनात मनुष्य कित्येकदा पराभूत होतो, तरीपण पराभवाने खचून न जाता पुन्हा शौर्याने ताठ उभे राहणे हेच खरे जीवन आहे.

मित्रानो हे होते ते आयुष बदलणारे प्रेरणादायी मराठी सुविचार, तुम्हा सर्वांना हे सर्व प्रेरणादायी मराठी सुविचार वाचून कसे वाटले? आणि यातून तुम्हाला नवीन काय शिकायला मिळाले? हे आम्हांला खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून जरूर कळवा.

मित्रांनो जर तुम्हाला आमच्या द्वारे लीहले गेलेलं Best Motivational Quotes in Marathi आर्टिकल आवडले असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरले असेल तर या आर्टिकल ला तुमच्या मैत्र मैत्रीण सोबत facebook आणि whatsaap वरती अवश्य शेयर करा.

धन्यवाद …

अपने दोस्तों के साथ शेयर करें

Leave a Comment