Top 21 Best Short Stories in Marathi With Moral , Short Story in Marathi With Moral, Marathi Stories For Kids With Moral
नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मराठी मोटिवेशनल ब्लॉग वरती स्वागत आहे. मित्रांनो जर तुम्ही Best 21 Life Changing Short Stories in Marathi मध्ये वाचणार असाल किंवा Short Stories in Marathi Pdf Free Download करणार असाल तर तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आला आहात.
मित्रांनो जर तुम्ही ह्या Short Stories in Marathi With Moral आर्टिकल ला शेवटी पर्यंत वाचलेत, तर तुम्हाला या आर्टिकल मधून खूप काही शिकायला मिळेन, त्या सोबतच तुम्हाला Short Stories in Marathi Pdf Free Download करण्यासाठी सुद्धा मिळेन. म्हणून मित्रांनो या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.
Top 21 Short Stories in Marathi With Moral – Short Story in Marathi
मित्रांनो या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा, कारन या आर्टिकल मधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. मित्रांनो चला तर मग बिना time वेस्ट करता Top 21 Short Stories in Marathi आर्टिकल ची सुरुवात करुया.
1. आधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा, जग आपोआप बदलेल – Short Stories in Marathi
संध्याकाळची वेळ होती. एक म्हातारी व्यक्ती आपल्या गतकाळातील जीवना विषयी आपल्या मित्राला सांगत होती. ती म्हातारी व्यक्ती म्हणाली, मी जेव्हा तरुण होतो, तेव्हा मी खूप अहंकारी होतो. आणि मला असं वाटायचं की मला सर्वच ज्ञान आहे.
मला वाटायचं की मी सर्वकाही करू शकतो. सर्व बदलण्याची इच्छा मी करत होतो. मी देवाला प्रार्थना करायचो की हे देवा, मी जगाला बदलवू शकेन इतकी शक्ती मला दे. तो व्यक्ती थोडा थांबला व पुन्हा सांगू लागला, कारण वय वाढत चाललेलं होत.
एक दिवस सकाळी मी उठलो व विचार करू लागलो, माझं अर्ध वय तर निघून गेलंय आणि मी तर काहीच केलेलं नाही. मी कोणाला बदलूही शकलो नाही. तेव्हा त्याने देवाला पुन्हा प्रार्थना केली व सांगितले की, देवा मला इतकी शक्ती दे की मी अवती भवतीच्या लोकांना बदलू शकेन.
कारण जे लोक माझ्या खूप जवळचे आहेत त्यांना बदलण्याची आवश्यकता आहे. त्याचा मित्र त्याला म्हणाला की आता काय विचार करतोस? ती व्यक्ती म्हणाली, आता मी म्हातारा झालोय. माझी प्रार्थना आता खूप साधी आणि छोटी आहे.
मी देवाला प्रार्थना करतो की, देवा आता मला इतकी शक्ती दे की, मी कमीत कमी स्वत:ला तरी बदलू शकेन. ती व्यक्ती म्हणाली, मला कळून चुकलंय की जगाला किंवा इतर लोकांना बदलण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत.
या कथेचा तात्पर्य:
कारण स्वत:ला बदलल्या शिवाय तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून सर्वांत आधी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करा, जग आपोआप बदलेल.
- हे पण वाचा: आयुष्य बदलून टाकू शकतात तुमचे हे प्रेरणादायी सुविचार, जाणून घ्या आताच कोणते आहेत ते
- हे पण वाचा: Top 3 Life Changing Hari Katha In Marathi With Moral
2. ज्ञानी माणूस कोण? – Marathi Story For Kids With Moral
मित्रांनो एकदा एका खेडेगावातील एक मुलगी अविवाहित असतानाच माता बनली. खेडेगावातील लोकांना ते ऐकून धक्काच बसला, त्यांनी तिला चांगलं झोडपून काढलं आणि त्या जन्माला आलेल्या बाळाचा बाप कोण हे विचारलं. त्यानंतर आश्चर्याची बाब अशी की तिने गावाच्या सीमेवर राहणाऱ्या एका झेन साधूचे नाव घेतले.
सारे गावकरी त्याच्या मठाकडे गेले, त्यांनी त्याचं ध्यान चालू असताना त्याला शिव्या देत उठवलं आणि दांभिक म्हणून त्याची संभावना केली. तू आमच्या गावातल्या एका मुलीसोबत पापाचरण केलं आहेस. आता तू आई आणि ते बाळ या दोघांचाही सांभाळ केला पाहिजेस. तो झेन साधू एवढंच म्हणाला, ठिक, असं आहे का?
मग त्या झेन साधूने त्या बाळाला आपल्या हातात घेतले आणि त्याच्याकडे अतिशय प्रेमाने पाहिले. पण त्याच्या नावाला जो कलंक लागायचा तो लागलाच. एकेक करता त्याचे सारे शिष्य त्याला सोडून गेले. हे सारे जवळपास वर्षभर चालू होते, शेवटी त्या मुलीला ते काही पाहवले गेले नाही.
मग ती मुलगी गावात गेली आणि आपण हे सारं काही खोटं सांगितलं होतं, असं गावकऱ्यांना सांगून टाकलं. त्या बाळाचा बाप हा तो झेन साधू नसून तिच्या घराजवळच राहणारा दुसरा कुणीतरी होता, हे सांगून टाकलं.
सारे गावकरी पुन्हा त्या झेन साधूकडे गेले आणि त्याला सारं काही सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यावर तो साधू फक्त एवढंच म्हणाला, ‘‘ठिक, असं आहे का?’’
या कथेचा तात्पर्य:
जेव्हा त्या साधू वर आरोप ठेवण्यात आले होते, तेव्हा त्याचं उत्तर एवढंच होतं की ‘ठिक, असं आहे का?’ जी व्यक्ती स्तुती आणि निंदा दोन्ही लाही सारख्याच भावनेने बघते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने ज्ञानी असते. अर्थात् त्यासाठी अत्यंत मानसिक क्षमता हवी असते, अशी उच्च मानसिक स्थिती प्राप्त करण्यासाठी सर्वसाधारण माणूस प्रयत्न करीतच असतो.
3. क्षमा करायला शिका – Marathi Small Story For Students With Moral
एकदा एका शाळकरी मुलाला त्याने एक गंभीर चूक केली म्हणून त्याला शाळेच्या प्राचार्यांकडे पाठवण्यात आले. काय झालं ते ऐकल्यानंतर प्राचार्यांनी एक कोरी वही घेतली आणि त्यावर त्या मुलाचं नाव लिहिलं, मग त्यावर काय तक्रार होती ते लिहिता लिहिता प्राचार्य त्याला म्हणाले की…
मी हे सारं शिसपेन्सिलीने लिहित आहे आणि तुझा गुन्हा गंभीर आहे, असं मी आता तरी समजत नाही. अर्थात् जर या वर्षभरामध्ये तुला दुसऱ्यांदा माझ्याकडे पाठवलं गेलं नाही तर मी जे काय लिहिलं आहे ते खोडून टाकील आणि त्याबद्दल कुणालाच काहीही कळणार नाही.
या कथेचा तात्पर्य:
दया हा सद्गुण प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात ठसवावा असा आहे.
4. सभ्य बना, कदाचित तुम्हाला चांगली मैत्री मिळेल – Marathi Short Stories For Adults
एका माणसाने दिवसभरासाठी एक टॅक्सी भाड्याने घेतली, संपूर्ण शहरभर फिरल्यानंतर जेव्हा त्याने पैसे देण्यासाठी पैशाचे पाकिट काढले, तेव्हा त्या टॅक्सी चालकाने पैसे घेण्यास नकार दिला.
तो चालक म्हणाला, मी जवळपास वीस वर्षापासून टॅक्सी चालवत आहे. या वीस वर्षांमध्ये तुम्ही असे पहिलेच आहात जे माझ्याशी इतक्या सभ्यपणे आणि नम्रपणे वागला आहात. तुमच्यामध्ये मला माझा मित्र सापडला आहे, ज्याच्याकडून मी पैसे घेणार नाही.
या कथेचा तात्पर्य:
जो सभ्यपणा पेरतो त्याला मैत्रीचे फळ नक्की मिळते, जो दया पेरतो त्याला प्रेम मिळते. ज्याने मित्रांची मैत्री जिंकली त्याने सारं काही मिळवल्याप्रमाणे आहे.
- जरुर वाचा: आयुष्य बदलून टाकू शकतात ह्या 15 प्रेरणादायी मराठी कथा, वाचा जरूर
- हे पण वाचा: Top 3 Life Changing Hari Katha In Marathi With Moral
5. तुलना करू नका – Marathi Short Stories For Child
एका वडाच्या झाडाच्या अगदी टोकावर एक लहानशी सुंदर चिमणी राहात होती. ती तिच्यासोबत चिमण्यांना आकाशामध्ये उंच उंच उडताना पाहायची आणि ती स्वत:ला कमी समजायची. तिला प्रत्येक गोष्टीमध्ये तिरस्काराची भावना निर्माण व्हायची.
तू मोराला छान रंग दिलेस, तू बुलबुल पक्ष्याला छान आवाज दिलास, पण मी? मला तू काहीही नाही दिलंस का? तेव्हा एकदा देवाने उत्तर दिलं, की तुला फक्त दु:ख भोगण्यासाठी निर्माण केलेले नाहीये आणि आता तूही तिच चूक करीत आहेस, जी माणूस नेहमी करीत असतो.
तू स्वत: सारखे बनण्याचा प्रयत्न कर आणि तू स्वत:च श्रेष्ठ बनतेस की नाही ते बघ. तुझं स्वत:चं वेगळेपण जाणून घे आणि तुला ज्यामध्ये आनंद वाटेल अशा मार्गाने जाण्याचा आनंद तू मिळव.
या कथेचा तात्पर्य:
प्रत्येकजण देवाच्या प्रतिमे प्रमाणे बनवलेला आहे. त्याने बनवलेल्या प्रत्येक निर्मितीला वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व आहे. वास्तवाकडे आपण नेहमी एका सकारात्मक जीवन ऊर्जेच्या स्वरुपात बघायला हवे. एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कमी आहे म्हणून बघण्याचा दृष्टीकोन नको.
बहुतांशी माणसं ही आपलं आयुष्य इतरांपेक्षा कमी दर्जाचं आहे म्हणून त्याकडे बघतात, त्यामुळे आयुष्यभर अशी माणसं स्वत:च ते आणि आनंद यांच्या मधला अडथळा बनतात.
6. तुम्ही तुमच्या मुलाचं शिक्षण केव्हा सुरू करू शकता? – मराठी गोष्टी लहान मुलांसाठी
एकदा, एक तरुण माता अरिस्टॉटलकडे आली आणि तिने विचारलं, मी माझ्या मुलाचं शिक्षण केव्हा सुरू करू शकते? अरिस्टॉटलने त्यांना विचारलं कि तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे? ती म्हणाली की पाच वर्षांचा आहे. त्याचक्षणी अरिस्टॉटल म्हणाले की मग पटकन घरी जा. आधीच तुम्हाला पाच वर्षे उशीर झालाय.
या कथेचा तात्पर्य:
मुलाचं शिक्षण खरं तर तो जन्मत:च सुरू होतं. मुलांवर लहानपणीच ज्यांचा परिणाम होतो, ते आईवडील असतात, कारण ते त्याला घर नावाच्या शाळेमध्ये मूल्यशिक्षण देतात.
७. ज्ञानाची किंमत ओळखा – Short Story in Marathi With Moral
एकदा एका कारखान्यातील एक महत्त्वाचं यंत्र अचानक बंद पडलं. अर्थात त्याचा परिणाम म्हणून कारखान्यातील सगळं काम बंद पडण्याची वेळ आली. कारखान्यातील सगळे मुकादम आणि अभियंते यांनी खूप प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला.
शेवटी ते यंत्र पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी एका तज्ज्ञाला बोलवण्यात आलं. त्या यंत्राची सारी बारीक सारीक तपासणी केल्यानंतर त्याने एक हातोडा घेतला आणि त्या यंत्राच्या एका विशिष्ट भागावर मारला. त्याचक्षणी ते यंत्र अगदी पूर्ववत काम करू लागलं.
त्यानंतर त्या तज्ज्ञाने त्या यंत्राच्या दुरुस्ती साठीचे १०,००० रुपयांचे बिल पाठवले. अर्थातच, त्या तज्ज्ञाला हे विचारण्यात आले की फक्त एक हातोडी घेऊन एक फटका मारण्याचे १०,००० रुपये कशासाठी द्यायचे? मग त्या तज्ज्ञाने ते बिल जरा वेगळे लिहिले आणि वसूलीसाठी पाठवून दिले.
त्या तज्ज्ञाने बदलून दिलेले बिल असे होते :
- त्या यंत्राला हातोड्याने फटका मारण्याची फी: ०.००५
- फटका मारण्याची जागा शोधण्याची फी: ९,९९५
- एकूण :१०,०००
या कथेचा तात्पर्य:
ज्ञान हीच शक्ती आहे. प्रचंड कष्ट, बुद्धीमत्ता आणि परिश्रम यांची गरज ज्ञान मिळवण्यासाठी असते. तज्ज्ञाला कुणीही पैसे देतात ते त्यांच्या वेळेचे नाही तर त्यांच्या तज्ज्ञ असण्याचे देत असतात.
8. तुम्ही मनात जेवढा विचार करता फक्त तेवढेच तुमचे वय असते.
थॉमस एडिसन हा अशा काही मोजक्या लोकांपैकी एक होता ज्याचा ठाम विश्वास होता की वय तीच बाब असते, ज्याचा विचार तुम्ही तुमच्या मनात करीत असता आणि तुम्ही जेवढा विचार करीत असता, तेवढेच तुमचे वय असते. त्याच्या वयाच्या ऐंशीव्या वाढदिवसा दिवशी त्याच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की त्याने आता थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे आणि आता स्वत:साठी जरा वेळ द्यायला पाहिजे.
तुला आता स्वत:साठी कशाचा तरी छंद लावून घेणे योग्य होईल. तू गोल्फ का बरे खेळत नाहीस? एडिसन म्हणाला, ‘‘पण अद्याप माझं तेवढं वय झालेलच नाहीये.
या कथेचा तात्पर्य:
अगदी रापलेल्या ऐंशीव्या वर्षीसुद्धा एडिसन स्वत:वर असा विनोद करीत होता की मी चांगला तरुण आहे. तुम्ही या पृथ्वीतलावर किती वर्षे काढली यावर वय अवलंबून नसतेच. या उलट असाही विचार करता येईल की तुम्ही ती वर्षे कशी काढलीत?
ज्याच्या मनामध्ये आयुष्यात काही तरी मोठं करण्याचा ज्वलंत आशावाद असतो, अशा माणसाला वयाची मर्यादा काहीही करू शकत नाही.
9. सरावामुळे प्रावीण्य येते. – Marathi Small Story With Moral
पॅडेरेव्स्की, जो एक गाजलेला व्हायलिनवादक होता, तो रोज दहा ते बारा तास सराव करायचा, अगदी तो यशाच्या शिखरावर असतानाही करायचा. एकदा एका कार्यक्रमानंतर त्याच्या व्हायोलिन वादनावर अतिशय प्रेम करणाऱ्या एका रसिकाने ज्याला स्वत:ला व्हायोलिनवादन शिकायचं होतं, त्याने त्यांना प्रश्न विचारला की, या यशाचं रहस्य काय?
पॅडेरेव्स्कीने त्याला आपल्या यशाचं रहस्य काय आहे ते सांगितलं?
तो म्हणाला, मी अगदी आत्मविश्वासाने ही बाब सांगू इच्छितो की मी एक दिवस जरी सराव केला नसता, तर आजचं चित्र जरा वेगळं असतं. मी दोन दिवस जरी सराव केला नसता तर माझ्या टिकाकारांनी ते शोधून काढलं असतं. आणि मी जर तीन दिवस सरावाकडे दुर्लक्ष केलं असतं, तर साऱ्या जगाला हे कळलं असतं.
या कथेचा तात्पर्य:
खरंच यशस्वी होण्यासाठी, तुम्ही तुमची शस्त्रे सतत परजून तयार ठेवायलाच हवी आणि यशाने स्वत:ला आत्मसंतुष्ट होऊ देऊ नका. कारागिराच्या कुठल्याही अवजाराला जास्त दिवस न वापरल्यास गंज लागायला फारसा वेळ लागत नाही आणि रोजच वापरली गेली नाही तर लवकरच निरुपयोगी होतात.
- हे पण वाचा: Top 3 Best Motivational Speech In Marathi For Students
- हे पण वाचा: Top 3 Life Changing Hari Katha In Marathi With Moral
10. तुम्हीच तुमचा वर्तमान आणि भविष्यही आहात. – Short Marathi Story
एक गृहस्थ अगदी ऐषारामात राहत असताना त्याला अचानक नैराश्य आले आणि तो दु:खी झाला. त्यामुळे जरी तो खूप होतकरू होता तरीही तो आपल्या कामाकडे आणि आपल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी व्यवस्थित लक्ष देऊ शकेनासा झाला. पण त्याने त्याच्या उद्दिष्टांचा पाठलाग करणे सुरुच ठेवले, पण त्यामुळे त्याचा वर्तमानाशी संबंध तुटल्यासारखा झाला.
अर्थातच, त्याचा परिणाम त्याच्या कामावर झालाच. त्याचा परिणाम म्हणून तो पुन्हा दु:खी झाला. त्याने पुन्हा अंतर्मुख होऊन चांगल्या प्रकारे कारण जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या या अवस्थेचं नेमकं कारण काय आहे, हे काही त्याला सांगता येईना. सरते शेवटी, तो एका ज्ञानी पुरुषाकडे गेला आणि त्याला नेमकं काय होतंय, हे सांगितलं.
त्याचं सारं ऐकून घेतल्यानंतर तो साधुपुरुष म्हणाला कि भल्या माणसा, तुझ्या मनाची अवस्था अशी दु:खी होण्याचं कारण इतर काही नाही, तू स्वत:च आहेस. तू स्वत:चं उद्दिष्ट तुझ्या डोळ्यासमोर स्वच्छ दिसत असताना मृगजळाच्या मागे धावत आहेस. कृपा करून ही बाब लक्षात घे की जर तुझी दृष्टी फार दूरवरच बघण्यासाठी स्थिर असेल तर तू नक्कीच तुझ्या पायाखालची पायरी चुकणार आहेस.
या कथेचा तात्पर्य:
जर आपण भविष्यातील उद्दिष्ट्ये प्राप्त करू शकलो तरच आपण आनंदी होणार आहोत, असा गैरसमज करून बहुतेक लोकं स्वत:लाच फसवत असतात. पण बहुतेकांच्या हे लक्षात येत नाही की आपल्याला वर्तमान आणि भविष्य यांच्याकडे सारखंच लक्ष द्यावं लागतं.
पुढे कुठेतरी इप्सित जागी आपल्याला तिथं आनंद मिळणार आहे म्हणून आपण त्याकडे बघू शकत नाही. खरा आनंद हा उद्दिष्ट्ये प्राप्तीच्या मार्गावरच असतो, तेही प्रवासामध्ये आणि शेवटी पर्यंत निश्चितच नाही.
11. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद हा सुंदर बनवा – Short Marathi Story
सॉक्रेटिस हा कारागृहामध्ये होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला विषाचा प्याला द्यायचा होता, म्हणजेच त्याला मारलं जाणार होतं. त्याचक्षणी त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्यासोबत असणारा एक दुसरा कैदी कुणा एका कवीचं एक अवघड गीत अतिशय सुरेल गात होता. ते ऐकून सॉक्रेटिस त्याच्याकडे गेला आणि त्याला ते शिकवण्याची विनंती केली.
त्या कवीने त्याला म्हंटले कि आता ते कशाला शिकायचं आहे? उद्या सकाळी तर तू मरणार आहेस ना? सॉक्रेटिस त्याला म्हणाला कि कारण मग मी उद्या हे समजून शांतपणे मरेन की मरण्यापूर्वी मी आयुष्यात एक गोष्ट नवी शिकलो.
या कथेचा तात्पर्य:
आपण या सुंदर पृथ्वीतलावर जो प्रत्येक क्षण जगत असतो, त्याबद्दल आपण भगवंताचे आभार मानायला हवे. सॉक्रेटिस सारखी माणसं त्यांच्या सजगपणातील प्रत्येक क्षण सुंदर बनवतात. प्रत्येक सेकंद काही तरी नवे शिकवतो आणि आपले ज्ञान वाढवण्याची संधी देतो.
12. दोन बायका असण्याचा त्रास – Marathi Short Story For Adults
करीमचं नुकतंच लग्नं झालं होतं आणि त्याचं वैवाहिक जीवन अगदी मस्त चाललं होतं. एके दिवशी किराणा मालाच्या दुकानामध्ये त्याचा मित्र सलीम त्याला भेटला. करीम त्याला त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगू लागला की त्याचं आयुष्य किती सुखकर चालू आहे.
आता गंमत अशी की सलीमला दोन बायका होत्या. त्याने करीमला सांगितलं की बघ, एक लग्नं झालं तर एवढा आनंद आहे, तर दोन लग्नं केलं तर आनंद दुप्पटच होणार. करीमलाही ते पटलं, आणि त्यानेही दुसरं लग्नं केलं. दुसरं लग्नं झाल्यानंतर करीम संकटात सापडला. एकही बायको त्याच्यासोबत राहायला तयार होईना.
पहिली यासाठी तयार नव्हती की त्याने दुसरं लग्नं केलेलं तिला आवडलं नव्हतं आणि दुसरी यासाठी राहत नव्हती की त्याचं पहिलं लग्नं झालेलं होतं. दोन्ही कडून नाकारला गेलेला करीम सरळ मशीदीमध्ये रात्र काढण्यासाठी गेला. तिथं त्याला एका ओसरीवर सलीम अगदी निवांतपणे झोपलेला दिसला.
करीमने त्याला उठवलं आणि दुसरं लग्नं करण्याचा सल्ला का दिलास म्हणून रागात विचारलं. सलीमने शांतपणे करीमला उत्तर दिले कि, मला मशीदी मध्ये एकट्याला फार भयाण वाटत होतं आणि कुणाची तरी सोबत असावी असं मला वाटत होतं म्हणून…
या कथेचा तात्पर्य:
दुसऱ्यांच्या सल्ल्यावर काहीही करू नका. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे काय आणि तोटे काय आहेत यांचाही विचार करा आणि मगच कोणता तो निर्णय घ्या.
13. ढोंगीपणापासून दूर रहा – Marathi Short Story For Child
एकदा एका शिक्षिकेने एक चॉकलेटचा डबा आणि एक शहाणपणा शिकवणारं पुस्तक दोन्हीही वर्गात आणले. मग तिने ते टेबलावर शेजारी शेजारी ठेवले आणि विद्यार्थ्यांना त्यापैकी एक निवडायला सांगितलं. सारी मुलं त्या पुस्तकाभोवती गोळा झाली आणि हे पुस्तक वाचणं किती चांगलं असू शकेल, यावर चर्चा करू लागली.
तथापि, तिथं एकजण होता ज्याने सरळ चॉकलेटचा डबा उघडला आणि आनंदाने एकेक चघळायला सुरुवात केली. सगळ्या मुलांच्या प्रश्नार्थक नजरा पाहून शिक्षिका म्हणाली कि मला तर चॉकलेटच्या या डब्यामध्ये त्या पुस्तकात जेवढं शहाणपण शिकवलं आहे, तेवढंच दिसतंय.
या कथेचा तात्पर्य:
ज्या मुलाने चॉकलेटच्या डब्याची निवड केली, त्याचं हृदय खरं तर प्रामाणिक होते, कारण ढोंगीपणा काही जास्त काळ चालत नाही. ढोंगीपणा पासून दूर राहणे शिकले पाहिजे. आणि आपल्या हृदयाची हाक ऐकली पाहिजे.
14. चुका स्वीकारा, पण खुबीने. – शोर्ट मराठी कथा
डॉ. सॅम्युअल जॉन्सन यांनी एक नवा शब्दकोश प्रसिद्ध केला होता. ज्याचं स्वागत जनतेकडून तसंच समीक्षकांकडूनही अतिशय चांगलं झालं त्या प्रकाशनाचं हे यश साजरे करण्यासाठी त्यांनी डॉ. सॅम्युअल जॉन्सन यांच्या सन्मानार्थ एक मेजवानी आयोजित केली. मेजवानीच्या प्रसंगी प्रत्येकजण त्या शब्दकोशाची गुणवत्ता आणि त्यातील शब्दांचा समावेश यांची स्तुती करीत होता.
डॉ. जॉन्सनही त्यांच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर उपस्थित असलेल्या सर्व लोकांवर छाप पाडत होते. सगळेजण त्यांच्या त्या शब्दकोशाची स्तुती करीत असताना, एका वयस्क स्त्रीने मध्येच त्यांना थांबवले आणि एवढ्या मोठ्या बुद्धीमान माणसाने एवढं प्रचंड बौद्धिक काम करूनही त्यात एक चूक कशी काय राहिली, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.
मग तिने त्यांना विचारलं, या न्यूनतेबद्दल तुम्ही काय म्हणाल? उपस्थित असलेला प्रत्येकजण तिच्या या उद्धटपणामुळे आश्चर्यचकित झाला. जॉन्सन काय उत्तर देतात, याविषयी सगळेजण उत्सुक झाले. डॉ. जॉन्सन थंडपणे म्हणाले कि अज्ञान, बाईसाहेब, शुद्ध अज्ञान! कृपया, मला क्षमा करा.
या कथेचा तात्पर्य:
डॉ. जॉन्सन यांचा नम्रणा वाखाणण्यासारखा आहे. श्रेष्ठ माणसाची पहिली परीक्षा म्हणजे नम्रता! दयाळू माणूस हा त्याच्या मर्यादांमुळे चुका होऊ शकतात, हे स्वीकारतो. त्याला हे कबूल करायला अजिबातच अपमानास्पद वाटत नाही की त्याला जे कळलंय, ते फार थोडं आहे आणि खूप काही शिकायचं बाकी आहे.
15. विकलांगतेतून बाहेर या
राधाबाई ही त्रिचनापल्लीच्या भारतीदासन विद्यापीठातून पी.एच.डी. पदवी प्राप्त केलेली पहिली अंध मुलगी ठरली. हे साध्य करण्यासाठी प्रचंड हिंमत, मनोधैर्य आणि ठाम निश्चयाची गरज होती. त्यावेळी ती म्हणाली की आयुष्यामध्ये एवढ्या उंचीवर पोहचल्याचं अतीव समाधान होतंय, तेही महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियाचा वापर न करता आणि तेही हे साध्य करण्यासाठी आलेल्या साऱ्या अडचणीवर मात करून हे साधल्याने जास्तच समाधान होत आहे.
या राधाबाईच्या कथेतून कोणते तात्पर्य आपल्याला मिळते?
खरा बुद्धीमान कुठेही नावारुपाला येतोच. शारीरिक विकलांगता ही यशाच्या मधला अडसर होऊ शकत नाही. इच्छा तेथे मार्ग!
16. मध्यममार्ग स्वीकारा – Short Marathi Katha
गौतम बुद्धाना जेव्हा आध्यात्मिक प्रश्न पडले, जेव्हा त्यांनी साधनेच्या क्षेत्रामध्ये पादाक्रमण केले, तेव्हा त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या साधनांचा अवलंब केला. आध्यात्मिक मार्गावरचा प्रवास म्हणजे काही गुलाबांच्या पाकळ्यांवरून चालणं नव्हे. त्यावेळी त्यांचा दृढ विश्वास होता की साक्षात्काराचा मार्ग हा तप आणि कठोर साधनांमधूनच जातो.
हे साधण्यासाठी त्यांनी स्वत:ला फारच क्लेश दिले. एके दिवशी ते एका झाडाखाली ध्यानासाठी बसले होते. अचानक त्याचं ध्यान दोन संगीतकारांच्या संवादामुळे तुटलं. एक दुसऱ्याला म्हणत होता, सतारीच्या तारा एवढ्या घट्ट आवळू नकोस, कदाचित त्या तुटतील आणि फार ढिल्याही सोडू नको, नाही तर त्याच्यातून संगीत निर्माण होणार नाही.
या शब्दांमुळे बुद्धासमोर एक रहस्य उलगडलं आणि त्याप्रमाणे त्यांनी साधनेचा मार्ग बदलला. मित्रांनो त्या संगीतकारांच्या संवादामधून बुद्ध हे शिकले कि कुठल्याही गोष्टी टोकाच्या करू नका. जर यश मिळवायचे असेल तर मध्यम मार्ग स्वीकारा.
या कथेचा तात्पर्य:
कुठलीही गोष्ट अगदी टोकाची केली की त्याचा परिणाम वाईट होतो. कुठलीही गोष्ट संयमाने केली की त्यात प्रगती होऊन शेवट यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.
- हे पण जरूर वाचा: चिकूपिकू मराठी मासिकाचा सारांश
17. एक करोड रुपये देऊनही आपण एक सेकंद पण विकत घेऊ शकत नाही.
कोण एके काळी एका गावामध्ये एक कंजुष माणूस राहत होता, ज्याचं सारं आयुष्य हे पैसा गोळा करण्यातच गेले, आणि त्याने कधीही एक पैसा ही खर्च केला नाही. त्याने जवळपास पाच लाख दिनार गोळा केले होते आणि उरलेलं आयुष्य अगदी विलासामध्ये जगण्याचं तो स्वप्नं पाहत होता. पण असं काही होण्यापूर्वीच, यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी तिथं आले.
त्या कंजुष माणसाने त्याच्यासमोर हात पसरले, विनंती केली आणि पृथ्वीतलावर जास्त काळ राहायला मिळावं म्हणून आर्जवेही केली. मला फक्त तीन दिवस द्या, मी तुम्हाला माझ्या संपत्तीतला अर्धा वाटा देतो. त्या दुतांनी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. असं करा फक्त एकच दिवस द्या. मी एवढं कष्ट करून मिळवलेलं सारं काही तुम्हाला देऊन टाकेन.
दूत अद्यापही तटस्थच होते. मग, त्या माणसाने त्यांना विनंती केली की पुढच्या पिढ्यांसाठी काही लिहून ठेवतो, काही सेकंद तरी थांबा. दूतांनी त्याची ही इच्छा मात्र मान्य केली. त्याने पुढचा मजकूर लिहून ठेवला. मित्रांनो त्या कंजुष माणसाने हे लिहून ठेवले होते कि…
ज्याला कुणाला हे मी लिहून ठेवलेले सापडेल, त्याच्यासाठी हे सांगणे आहे की जर तुम्हाला चांगलं जगण्यापुरतं धन मिळालेलं असेल तर उरलेलं आयुष्य पुढे उगाच जमा करण्यासाठी वाया घालवू नका. जगा! माझे पाच लाख दिनार माझ्या आयुष्यासाठी एक सेकंदही विकत घेऊ शकले नाहीत.
ह्या कथेचा तात्पर्य:
त्या कंजुषाने लिहून ठेवलेला मजकूर हाच मुळामध्ये या कथेचा तात्पर्य आहे. मृत्यू हा प्रत्येकासाठी अगदी अपरिहार्य आहे, त्यामुळे उगाचच धन जमा करण्यासाठी एक विशिष्ट मर्यादेपलिकडे जाण्यात काहीही उपयोग नाही.
18. तुम्ही जे मागता त्याबाबतीत जरा सावध असा
कोण एके काळी एक अतिशय गरीब माणूस होता, जो त्याच्या जगण्यासाठी लाकडांची मोळी आपल्या डोक्यावर घेऊन वाहून न्यायचं काम करीत असे. एके दिवशी, तो त्याच्या खांद्यावर ते भलं मोठं ओझं घेऊन जात असताना फार थकला.
तो नदीच्या काठावर जरासा टेकला आणि म्हणाला, मी आजारी आहे आणि फार थकलोय. एकदाचा यम यावा आणि आताच माझी यातून सुटका व्हावी. नेमकं त्याचक्षणी यम तिथं आला आणि समोर उभं राहून म्हणाला, आलोय मी, काय करू सांग. तेव्हा थक्कं झालेला तो म्हातारा म्हणाला कि…
काही नाही, ही मोळी जरा माझ्या डोक्यावर उचलून देतोस का, बाबा?
ह्या कथेचा तात्पर्य:
या कथेपासून दोन गोष्टी निष्कर्ष म्हणून काढता येतात. एक म्हणजे कोणालाही मरण नको असतं, म्हणजे अगदी ते आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येत नाही तोपर्यंत तरी नको असतं. दुसरी बाब म्हणजे आपण जी काही इच्छा मनात धरत असतो, तीच फळाला येत असते. त्यामुळे आपणही नेहमी काय इच्छा ठेवावी याबद्दल जरा सावध असलं पाहिजे आणि आपल्या इच्छाही सावधपणे निवडल्या पाहिजे.
19. व्यावहारिक शहाणपणाचा विकास करा – बोध कथा मराठी
एका अशिक्षित चांभाराच्या मनामध्ये शिकलेल्या लोकांविषयी काही तरी भलताच गैरसमज होता. एकदा एक महाविद्यालयातला प्राध्यापक त्याच्याकडे आला, त्याच्याकडे बुटाचा फक्त एकच जोड होता, आणि त्याला तो ताबडतोब दुरुस्त करून हवा होता.
तेव्हा तो चांभार म्हणाला कि माझी दुकान बंद करण्याची वेळ झालेली आहे. आताच्या आता लगेच हे दुरुस्त करणे मला काही जमणार नाही. त्यापेक्षा तुम्हीच उद्या सकाळी का बरे येत नाहीत? अहो, माझ्याकडे फक्त एकच जोड आहे, आणि बुटं घातल्याशिवाय मला काही जाता येणार नाही.
ठिक आहे, माझ्याकडचा एक वापरलेला बुटाचा जोड मी तुम्हाला आजचा दिवस उसना म्हणून वापरायला देतो. मग तो व्यक्ती अस म्हणाला कि काय? दुसऱ्याच्या बुट वापरायचा? तुम्ही मला काय करायला सांगत आहात? त्या चांभाराने त्या प्राध्यापकांना असं काही उत्तर दिलं की ते अवाक् झाला.
तो चांभार म्हणाला, तुम्ही दुसऱ्यांचे बुट वापरायचे म्हणून एवढी कुरकूर का करता, दुसऱ्या लोकांच्या कल्पना डोक्यामध्ये घेऊन तुम्ही एरवी कामं करीत नाही का?
ह्या कथेचा तात्पर्य:
व्यावहारिक शहाणपण हे पुस्तकी ज्ञानापेक्षा केव्हाही श्रेष्ठ!
20. मेंदूचा वापर करायला शिका – मराठी बोध कथा
एका स्त्रीला तिच्या नवऱ्याने कुठलेसे विजेचे उपकरण दिले होते. ते उपकरण किती गुंतागुंतीचे आहे हे समजून घेण्यासाठी तिने ते उघडून पाहिले. सोबतच्या माहिती पुस्तकानुसार तिने काही तास घालवून ते पुन्हा जोडण्याचाही प्रयत्न केला, पण पुन्हा जोडण्यामध्ये काही यश आले नाही, त्यामुळे शेवटी तिने तो नाद सोडला आणि त्याचे सर्व भाग जेवणाच्या टेबलावर सोडून ती तशीच निघून गेली.
काही तासानंतर ती पुन्हा तिथं आली तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की तिच्याकडे काम करणाऱ्या बाईने ते जोडून पुन्हा वापरण्यायोग्य केले होते, तिने त्या काम करणाऱ्या बाईचे आभार मानले, तुला वाचताही येत नसताना तू हे सारं कसं काय जोडलं? तिने विचारले. त्या घरकाम करणाऱ्या बाईने असे उत्तर दिलं की ही चकितच झाली.
ती बाई म्हणाली कि काय आहे बाईसाहेब, जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला वाचता येत नाही, तेव्हा तुम्ही तुमचा मेंदू चालवायला तयार होता.
ह्या कथेचा तात्पर्य:
विचार करण्याची नैसर्गिक देण प्रत्येकाला मिळाली आहे. तथाकथित शिकलेले लोकं ती मोठ्या प्रमाणात वापरतात, कारण त्यांना हे माहिती नसते की इतर लोकांचे विचार हेही ते न शिकल्यामुळेच आहेत. नकळत, त्यांच्यामध्ये एक प्रकारचे व्यावसायिक शहाणपण निर्माण होते.
मित्रांनो अशावेळी, अगदी निरक्षरता हा पण एक छुपा आशीर्वादच असतो. तथापि, याचा अर्थ प्रत्येकाने निरक्षर राहावे असा नाही.
21. कोणती गोष्ट तुम्हाला पवित्र बनवते? – सकारात्मक बोधकथा
एक जपानी योद्धा होता, जो बुद्धांचा अतिशय निस्सिम असा भक्त होता. एके दिवशी, त्याची बुद्धांसोबत भेट झाली आणि त्याने त्यांना विचारले, कोणती गोष्ट माणसाला पवित्र बनवते? बुद्धांनी उत्तर दिलं, प्रत्येक तास हा काही मिनिटांमध्ये आणि सेकंदांमध्ये विभागला जातो आणि प्रत्येक सेकंद हा काही क्षणांमध्ये विभागला जातो.
या सेकंदाच्या प्रत्येक क्षणामध्ये जो माणूस पूर्णपणे सजग म्हणजे जागृत राहू शकतो, तो पवित्र! हा जपानी योद्धा एकदा शत्रूकडून पकडला गेला आणि त्याला कारागृहामध्ये टाकण्यात आलं. त्या रात्री, त्याला उद्या आपला छळ करण्यात येणार आहे, या विचाराने क्षणभरही झोप लागली नाही.
मग त्या योद्ध्याने कारागृहामध्ये झोप येण्यासाठी काय केले?
त्याला बुद्धांचे शब्द आठवले आणि या विश्वातील सत्य जे आहे, ते याच क्षणी आणि फक्त इथंच आहे याची त्याला जाणीव झाली. मग, तो भान येऊन वर्तमानात आला आणि एका क्षणामध्ये झोपला.
ह्या कथेचा तात्पर्य:
या कथेचे तात्पर्य हेच आहे की ज्याच्यावर भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा अजिबात प्रभाव पडत नाही, तो म्हणजे हवेत उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे आणि शेतावर झुलणाऱ्या लिलिच्या फुलाप्रमाणे आहे. त्यालाच स्वातंत्र्य आणि आनंदाचा अनुभव येत असतो. त्याला उद्याची काळजी नसते. हे पूर्णपणे प्रकट झालेलं स्वत:चं अस्तित्व म्हणजेच पवित्रपण आहे.
मित्रांनो आज च्या ह्या Short Story in Marathi With Moral आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रांनो जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल आणि तुमच्यासाठी उपयोगी ठरले असेल तर, ह्या आर्टिकल ला तुमच्या मित्र मैत्रीण सोबत अवश्य share करा. त्या सोबतच हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले हे हि आम्हाला खाली कॉमेंट करून जरूर कळवा.
Short Stories in Marathi Pdf Free Download – Marathi Short Stories Pdf Download
मित्रांनो जर तुम्ही Short Stories in Marathi Pdf Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंक वरती click करून तुम्ही Marathi Short Stories Pdf Free Download करु शकता.
मित्रानो आपण परत भेटू अशाच एका आर्टिकल सोबत तो पर्यंत तुम्ही जिथे हि असाल तिथे तुम्ही खुश आणि आनंदी रहा….
धन्यवाद…
Very motivational stories applicable in real life.