Knowledge GrowKnowledge Grow
  • Biographies
  • Book Summaries
    • Motivational Summaries
    • Self Help Summaries
    • Financial Summaries
    • Spiritual Summaries
  • Motivational Stories
  • Motivational Quotes
  • Self Help Articles
  • About Us & More
    • Content Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Terms and Conditions
    • DMCA
Knowledge GrowKnowledge Grow
  • Biographies
  • Book Summaries
    • Motivational Summaries
    • Self Help Summaries
    • Financial Summaries
    • Spiritual Summaries
  • Motivational Stories
  • Motivational Quotes
  • Self Help Articles
  • About Us & More
    • Content Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Terms and Conditions
    • DMCA
Follow US
Knowledge Grow > Book Summary in Marathi > Time Management Summary – With Marathi PDF Download

Time Management Summary – With Marathi PDF Download

Last updated: 31/05/23
By Shridas Kadam
Share
21 Min Read
SHARE

Time Management Book in Marathi PDF Free Download , Time Management in Marathi Pdf Free Download, Time Management Book Summary in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे Marathi Book PDF Free Download Website वरती स्वागत आहे. मित्रांनो जर तुम्ही Time Management Book in Marathi PDF Free Download करणार असाल किंवा या पुस्तकाची मराठी समरी वाचणार असाल तर तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आला आहात.

Time Management Book in Marathi PDF Free Download
Time Management Book in Marathi PDF Free Download

Time Management Book in Marathi PDF Free Download

मित्रानो जर तुम्ही ह्या आर्टिकल ला शेवट पर्यंत वाचले तर तुम्हाला Time Management Book in Marathi PDF Free Download करण्यासोबतच या पुस्तकाची मराठी समरी सुद्धा वाचायला मिळेल. चला तर मग सुरू करूया…

Contents
Time Management Book in Marathi PDF Free DownloadTime Management Book Summary in Marathi1. वेळेचे लॉग बुक ठेवा.2. सर्वात महत्वाचे काम सर्वात आधी करा.3. सकाळी लवकर उठा.4. पॅरेटोचा 80/20 नियम5. डेडलाईन निश्चित करा.6. मोबाईलचा कमीत कमी वापर करा.7. दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक बनवा.9. टीव्ही वरती वेळ वाया घालवू नकाTime Management Book in Marathi PDF Free DownloadTime Management in Hindi PDF Free DownloadTime Management Marathi Pdf Free Download कशी करायची?Time Management या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?वेळेचे व्यवस्थापन कसे करावे?

Time Management Book Summary in Marathi

मित्रांनो आपल्या सर्वांच्या कडे एका दिवसामध्ये 24 तासच असतात, ना कुणाकडे याच्या पेक्षा जास्त असतात किंवा कमी असतात. ह्या 24 तासांचा उपयोग आपण ज्या प्रकारे करतों, त्यावरूनच निश्चित होते की आपण यशस्वी व्यक्ती होईल की नाही?

परंतू काही वेळा आपणाला हेच समजत नाही की आपण आपल्या वेळेचा सर्वात चांगला सदुपयोग कसा करायचा? म्हणून मित्रांनो आपणाला वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचे 30 सिद्धांत जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

मित्रानो टाइम मॅनेजमेंट या पुस्तकामध्ये डॉ सुधीर दीक्षित यांनी टाईम मॅनेजमेंट करण्याचे 30 सिद्धांत दिले आहेत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचे जीवन सार्थक, सुखी आणि यशस्वी बनवू शकता.

मित्रांनो तुम्ही कोण्ही ही असा जसे की विद्यार्थी, कर्मचारी, बिसनेस मैन किंवा सेल्समन, हे सर्व सिध्दांत तुमच्या साठी उपयोगी ठरणार आहेत. मित्रानो जर तुम्ही ह्या सर्व सिद्धांताना अमलात आणले, तर तुमचे जीवन बदलू शकते. चला तर मग सुरू करूया…

1. वेळेचे लॉग बुक ठेवा.

मित्रानो ज्याप्रमाणे तुम्ही पैशाचं अंदाजपत्रक बनवता, तसंच वेळेचे ही अंदाजपत्रक बनवा. जसे आपण पैशांचे अंदाजपत्रक बनवताना, आपले पैसे कुठे खर्च होत आहेत याचा हिशोब ठेवतो. तसेच वेळेच्या बाबतीतही हेच धोरण ठेवा. एका डायरीत एका आठवडयात कोणत्या कामावर किती वेळ खर्च झाला आहे याच्या नोंदी ठेवा. ड्रायव्हरांच्या भाषेत त्याला लॉगबुक असे म्हणतात.

गाडी किती किलोमीटर चालली आणि कुठपर्यंत चालली याचा हिशोब ते यात लिहितात. वेळाच्या अशा लॉगबुक मध्ये तुम्ही जेवढा बारीक – सारीक हिशोब लिहाल, तितका तुम्हांला जास्त फायदा होईल. या लॉगबुक मध्ये पहिल्या स्तंभात त्या कामासाठी घालवलेल्या वेळाचा हिशोब लिहा म्हणजे एखादी महत्त्वाच्या गोष्टीची नोंद सुटून जाणार नाही.

वरील पद्धतीचं लॉगबुक तुम्ही कॉम्प्युटरवर एक्सेलशीटवर किंवा इतर कुठलही सॉफ्टवेअर वापरुन करू शकता. यात एक आठवडयातील प्रत्येक तासाचा तपशील लिहा. मी खात्रीने सांगतो की हे लॉगबुक लिहिल्यावर तुमचे डोळे उघडतील. आपला वेळ कुठल्या कामात जातो हे तुमचं तुम्हालाच कळेल.

मोबाईलचं कॉल रजिस्टर रात्री बघा त्यावरून तुम्हाला कळेल. इंटरनेटवर किती वेळ किती घालवलात ते देखील तुम्हांला त्यावरील घडयाळ बघून कळेल. एका आठवड्यानंतर रविवारी निवांतपणे बसून वेळाच्या सगळ्या नोंदींचं विश्लेषण करा. असं केल्याने तुम्ही इंटरनेट , मोबाईल , टीव्ही आणि भेटीगाठी यासाठी किती वेळ घालवलात हे तुम्हाला कळेल.

माणूस मुळात आळशी असतो, त्यामुळे तुमचं मन अशा प्रकारच्या विश्लेषणाच्या भानगडीत न पडण्याचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न करेल. तुम्ही असाही विचार कराल की लॉगबुक ठेवण्याची काय गरज आहे, तुमचा वेळ कुठे जातोय हे तुम्हांला तर व्यवस्थित कळतय. मात्र असा विचार अजिबात करू नका.

मित्रानो लॉगबुक एक महत्त्वाचा पाया आहे, त्याच्यावर तुम्ही वेळाच्या नियोजनाची इमारत उभी करू शकता. त्यामुळे स्वतःला शिस्त लावा आणि वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या दुसऱ्या सिद्धांतापर्यंत पोचण्याआधी वेळेचे लॉगबुक ठेवा.

  • Eat That Frog Book in Marathi PDF Free Download
  • Think and Grow Rich Marathi Summary – With Marathi Pdf Download

2. सर्वात महत्वाचे काम सर्वात आधी करा.

मित्रानो मूर्ख व्यक्ती जे काम शेवटी करते तेच काम बुद्धिमान व्यक्ती ताबडतोब करते. दोघेही एकच काम करतात. फरक फक्त वेळेचा असतो. मित्रानो आपल्या दिनचर्येत बरेचदा असे होते की आपल्यासमोर जे काम येते ते आपण करायला लागतो.

त्यामुळे आपला सगळा वेळ छोटी छोटी कामे उरकण्यात संपून जातो. आपली महत्त्वाची कामे फक्त याच कारणामुळे होत नाहीत की आपण कमी महत्वाची कामे करण्यात गुंतलेलो असतो. महत्वाकांक्षी माणसाने याबाबतीत जागरुक राहावे, कारण यश मिळवण्यासाठी महत्वाचे काम आधी करणे आवश्यक असते.

एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की यश हे बिन महत्वाच्या कामामुळे मिळत नसून महत्वपूर्ण काम केल्याने मिळते. त्यामुळे आपल्या कामांचा अग्रक्रम स्पष्ट ठरवा आणि बिन महत्वाच्या कामात वेळ घालवू नका. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत आहे : सगळ्यात महत्वाचे काम सर्वात आधी करा.

  • हे पण अवश्य वाचा: The Alchemist Marathi Book Summary – With Marathi PDF Download

3. सकाळी लवकर उठा.

मित्रानो रात्री लेट झोपून सकाळी 8 किंवा 9 वाजता उठणे हे टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टीने पूर्ण चुकीचे आहे. कारण सकाळी उशीरा उठल्यावर तुम्हाला इतर कामांसाठी वेळ असेल, मात्र स्वत: साठी वेळ नसेल. यावर लोक असा युक्तिवाद करतील.

सकाळी लवकर उठणे त्यांच्या आवाक्यातील नाही. रात्रीच्या शांत वेळात त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि रात्री कितीही वेळ ते काम करू शकतात. मात्र हा युक्तिवाद चुकीचा आहे. सकाळी ४ वाजता उठलात तरीही तुम्हाला शांती मिळेल, आणि त्या वेळेला काम अधिक चांगल्या पध्दतीने होईल.

महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यावेळाला शरीर आणि मन ताजेतवाने असल्यामुळे कामाला वेग येत असतो. रात्रीच्या वातावरणात ऑक्सीजन कमी असल्यामुळे डोकं जास्त चालत नाही. म्हणून रात्रीची वेळ बौद्धिक कामांसाठी योग्य नसते. आदर्श वेळ सकाळचीच असते, त्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर असतो.

मित्रानो जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर सकाळी ६ वाजता आणि सायंकाळी सहा वाजता त्याच रस्त्यावर एक चक्कर मारुन बघा. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या बाबतीत सगळयात जास्त अडचणी दुसऱ्यांमुळे येतात. त्यामुळे सकाळी एका तासात तुम्ही जितकी कामे करू शकता, त्याच कामांना दुपारी तीन तास लागतात.

सकाळी मोबाईलचे टेन्शन नसते, वर्तमानपत्रही उशीरा येते, मुलेही सकाळी उशीरा उठतात. त्यामुळे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने काम करू शकता. सकाळी सूर्योदया आधी दोन तास सकाळी उठावे आणि सूर्योदय झाल्यावर दोन तासांनी झोपावे हा दिनचर्येचा आदर्श भाग असतो. तुम्ही पहाटे चार वाजता उठलात तर तुमच्याकडे वेळच वेळ असतो.

कामावर जाण्या अगोदरही चार पाच तासाचा वेळ तुमच्याकडे असतो. या वेळात तुम्ही व्यायाम करु शकता, पूर्ण दिवसाची आखणी करू शकता आणि महत्त्वाची कामेही करू शकता. दुसऱ्या बाजूला लवकर झोपण्याच्या सवयीमुळे तुम्ही अनेक समस्यातून मुक्त होऊ शकता. याशिवाय तुमची जीवनशैली सुध्दा आरोग्यपूर्ण राहाते.

मित्रानो एका महान व्यक्ती चे असे म्हणणे आहे की 👇👇👇

सकाळी दहा वाजेपर्यंत आनंदात असाल तर उरलेला दिवस आपली काळजी स्वत: च घेईल. म्हणूनच मित्रांनो वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा तिसरा सिध्दांत आहे : सकाळी लवकर उठणे.

  • जरूर वाचा: Think and Grow Rich Marathi Summary – With Marathi Pdf Download

4. पॅरेटोचा 80/20 नियम

मित्रानो परेटोचा २०/८० चा नियम वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण तो जाणून घेतल्यावर तुम्ही वेळाचा आणखी चांगला उपयोग करू शकाल. पॅरेटोचे असे म्हणणे आहे की तुमच्या कामाचा २० % अग्रक्रम तुम्हाला ८०% परिणाम देऊ शकेल.

फक्त तुम्ही २० % अग्रक्रमात तुमचा वेळ, उर्जा, पैसे आणि कर्मचारी यांचा समावेश करा, म्हणजेच आपला ८० % वेळ, केवळ २०% परिणाम साधण्यात वाया जातो. जर आपल्याला आपल्या वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा असेल तर आपण त्या २० % सार्थकी लागणाऱ्या वेळाचा शोध घेतला पाहिजे.

तर तो वेळ वाया जाण्यापासून शक्य तितका वाचवायला हवा. एवढेच नाही तर जो ८०% वेळ घालवून आपण फक्त २०% परिणाम मिळवतो त्या वेळाचाही शोध घेतला पाहिजे. यामुळे आपण सार्थकी लागणाऱ्या वेळाचे प्रमाण वाढवू शकतो आणि निरर्थक जाणारा वेळ कमी करू शकतो.

मित्रानो कामाची योजना करताना जर तुम्ही पॅरेटोच्या २०/८० या नियमाचे पालन केले तर तुमचे यश कल्पनातीत वृध्दिंगत होईल याचे कारण तुम्ही कोणत्या वेळाचे तुमच्या यशात किती योगदान आहे हे सत्य उमजून ती योजना आखाल. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा चौथा सिद्धांत हा आहे.

पॅरेटोच्या २०/८० चा पॅरेटोचा नियम आपल्याला अप्रत्यक्षरित्या, परफेक्शन किंवा परिपूर्णतेचा आपला जो हट्ट असतो त्याबाबत सावध करतो. हा नियम असे सांगतो की आपण ८०% काम २०% वेळातच पूर्ण करत असतो. उरलेले २०% काम करण्यात ८० % वेळ वाया घालवत असतो.

हा वेळ वाया अशासाठी जातो, कारण आपल्याला ते आदर्शरित्या करायचे असते. कितीतरी वेळा परफेक्शनचा आग्रह वेळाचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अपयश येते. जर तुम्हाला असे वाटत असेल की एवढी मेहनत करून देखील यश पदरात पडत नाहीये , तर तुम्ही पॅरेटोचा सिद्धांत वापरुन बघा. त्यामुळे आपण कोणत्या कामावर किती कष्ट घेत आहोत ते तुम्हाला कळेल.

जीवनात तुम्ही किती मेहनत करता ते महत्त्वाचे नसून ती मेहनत किती हुशारीने आणि चातुर्याने करता ते महत्त्वाचे असते. यश मिळवण्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या लक्ष्य प्राप्तीसाठी किती वेळ घालवत आहात आणि छोट्या छोट्या कामात किती वेळ वाया घालवत आहात.

बऱ्याच वेळा असे होते की आपण आपला वेळ छोटया छोटया कामात घालवत असतो. आपल्याला असे वाटत असते की आधी सोपी आणि छोटी कामे आटपून घ्यावीत. मग शांतपणे महत्त्वाच्या मोठया कामाकडे वळावे. मात्र नंतर आपल्याला ही त्रासदायक जाणीव होते की मोठया आणि महत्त्वाच्या कामांना आपल्याकडे आता वेळच उरला नाही. जर तुम्ही पॅरेटोचा सिद्धांत लक्षात ठेवलात तर असे कधीच होणार नाही.

  • Eat That Frog Book in Marathi PDF Free Download

5. डेडलाईन निश्चित करा.

मित्रांनो डेडलाईन म्हणजे वेळेची शेवटची मर्यादा, जुन्या काळी जेलच्या चारी बाजूंभोवती एक रेघ आखलेली असायची, त्याच्या बाहेर गेल्यावर कैद्यांवर गोळ्या झाडल्या जायच्या, त्या रेषेला डेडलाइन असे म्हणत. आजकाल डेडलाईन ओलांडली तर तुमचा जीव जाणार नाही, पण तुमची प्रतिष्ठा आणि करिअरमधील बढतीच्या संधी जरूर जातील म्हणून डेडलाईनचे गांभीर्य ओळखा.

जर तुम्हाला दुसऱ्या कुणाची डेडलाईन पाळायची नसेल तर स्वतःच स्वतःच्या कामाची डेडलाईन ठरवणे फारच चांगले. एखाद्या कामाला किती वेळ लागेल याचा विचार करा, आणीबाणीसाठी थोडा अवकाश ठेवा. आणि काम पूर्ण करण्याची शेवटची तारीख म्हणजेच डेडलाईन निश्चित करा. सुरुवातीला थोडा त्रास होईल पण मग डेडलाईन किंवा त्याच्या आतच काम पूर्ण करणे तुम्हाला जमू लागेल.

डेडलाईन निश्चित करणे एक अशी लाभदायक सवय आहे की ज्यामुळे तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करू शकाल. डेडलाईन मध्ये असे काय आहे की ज्यामुळे तुमची क्षमता वाढते आणि तुम्ही वेगाने काम पूर्ण करू शकता ? सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक स्पष्ट लक्ष्य मिळते.

लक्ष्य असेल तर आपण काम वेगाने करू शकतो हे आपण जाणतोच. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यासाठी एक योजना बनवतो आणि त्यानुसार काम करण्यासाठी स्वतःला शिस्त लावतो. तिसरे डेडलाईनमुळे तुमचे लक्ष त्यावर केंद्रित राहते. त्यामुळे तुम्ही कमी वेळात जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने नवीन उपाय शोधता.

तुम्ही तुमच्या जीवनात याचा अनुभव घेतला असेल की जेव्हा तुम्हाला डेडलाइन दिली जाते कि, हे काम अमुक वेळात पूर्ण करायचे आहे असे सांगितले जाते, तेव्हा तुमचे तन मन त्यातच व्यग्र असते. तुमच्यामध्ये एड्रीनलीनचा स्राव तयार होतो आणि आळस पळून जातो.

तुम्ही सक्रीय होता, सतर्क होता आणि मनापासून कामाला लागता. हे काम वेळात झाले नाही तर तुम्ही अडचणीत याल याची तुम्हाला कल्पना असते. तुम्ही सकाळी लवकर उठता, रात्री उशिरापर्यंत काम करता, तुमची झोपही कमी होते कमी वेळ वाया जातो आणि अशा तऱ्हेने वेळेत काम पूर्ण करता.

यासाठी आपण एक उदाहरण लक्षात घेऊ, असे धरुन चला की सामान्यपणे तुम्ही सहा मिनिटात एक किलोमीटर अंतर धावता. पण एखादा भयानक कुत्रा तुमच्या पाठीमागे लागला तर तुम्ही किती वेगाने पळाल ? साहजिकच तुम्ही सहा मिनिटांपेक्षा कमी वेळात एक किलोमीटर अंतर पार कराल, कारण तुमच्यामागे तो भयानक कुत्रा लागलाय !

मित्रानो डेडलाईनला असाच पाठीमागे लागलेला वाघ आहे असे समजा , जो तुमच्याकडून वेगाने काम करून घेतो.

Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download

6. मोबाईलचा कमीत कमी वापर करा.

मोबाईलवर हल्ली आपण कितीतरी कामे करतो. मोबाईलवर बोलती , गाणी ऐकतो फिल्म बघतो , शिवाय गेम खेळतो , चॅटिंग करतो , फेसबुकावर जातो , नेट सर्फिंग , इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करतो , फोटो काढतो , व्हिडीओ बनवतो आणि बघतो.

एका छोट्याशा मोबाईलमुळे सारं जग खरोखरच आपल्या मुठीत आले आहे. पण जरा थांबा ! आठवा काही वर्षांपूर्वी मोबाईल नव्हते , तेव्हाही आपले जीवन सुरळीत चालूच होते. मोबाईल युगात प्रवेश केल्याने आपला केवढा किंमती वेळ निरर्थक गोष्टीत वाया जातो.

आजकालची तरुण मुले मोबाईलवर गाणी ऐकणे , चॅटिंग करणे आणि बोलण्यात इतके हरवलेले असतात की , त्यांच्याजवळ विचार करायला सुद्धा वेळ नसतो. जरा रिकामा वेळ मिळाला की मोबाईल चालू होतो. क्लास मध्येही मुले मोबाईलवरुन मेसेज पाठवतात. मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी हानीकारक आहे हे त्यांना समजत नाही.

बहुतेक मोबाईल्स मधून इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन निघते, ज्याच्यामुळे अनेक प्रकारचे धोके निर्माण होतात. अती रेडिएशनने ब्रेन ट्युमर , नपुंसकता , कॅन्सर , गर्भपात , डीएनएची विकृती असे अनेक गंभीर विकार जडतात. त्यामुळे तुम्ही मोबाईलचा जितका कमी उपयोग कराल तेवढे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

मात्र मोबाईलची ही साथ कितीतरी पटीनी दिवसेंदिवस वाढतच चाललीय. एका पहाणीनुसार असे आढळून आले आहे की अमेरिकेतील लोक जवळजवळ ३ तासाचा वेळ मोबाईल इंटरनेटवर वाया घालवतात. या वेळाचा दोन तृतियांश भाग हा इन्स्टंट मेसेजिंग साठी वापरला जातो.

मोबाईल हा वेळाच्या बाबतीतला सर्वात मोठा शत्रू आहे. कारण तो आपल्याला बिन महत्त्वाच्या कामात गुंतवतो आणि महत्वाची कामे राहून जातात. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सहावा सिद्धांत आहे : मोबाईलचा कमीतकमी वापर करा.

  • हे पण अवश्य वाचा: The Alchemist Marathi Book Summary – With Marathi PDF Download

7. दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक बनवा.

मित्रांनो वेळेच्या नियोजनाची आदर्श स्थिती म्हणजे आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशीच्या कामाचे नियोजन करणे. एक दिवस आधी नियोजन केल्याने तुम्हाला अवचेतन मनाच्या शक्तीचा लाभ मिळतो. मित्रांनो आपल्या मनाचे दोन प्रकार असतात, एक चेतन मन आणि एक अवचेतन मन.

चेतन मन विचार करत असते, अवचेतन मन आपल्याला जाणवत नाही , मात्र हेच मन आपल्याला योग्य प्रकारे आणि कमी वेळात काम करण्याचे नवीन प्रकार सुचवू शकते. रात्री खूप विचार करूनही उत्तर मिळाले नाही आणि सकाळी त्याचे उत्तर मिळाले ?

विचार न करताच सगळं काही ठीक झालंय असं घडलंय का ? झालं असेल तर ते तुमच्या अवचेतन मनामुळे झालं आहे. रात्री जेव्हा तुम्ही आणि तुमचे मन झोपलेले असते. तेव्हा तुमचे अवचेतन मन त्या समस्येवर काम करते आणि सकाळ होताच उत्तर तुमच्यासमोर हजर केले जाते. चेतन मन जणू काही त्याचं काम आऊटसोर्स करत असतं.

जे काम चेतन मनाला अवघड असतं ते अवचेतन मन चुटकीसरशी करतं म्हणूनच अवचेतन मनाचा उपयोग करून घेण्यासाठी कामाची योजना आदल्या दिवशी करा. तुम्हाला खरंच जर व्यवस्थापन करायचं असेल तर जागृत मनाचाच नाही, तर अवचेतन मनाचाही उपयोग करून घ्यावा लागेल.

मित्रानो हेच मन तुम्हांला कमी वेळात अधिक काम करण्याचे उपाय शोधण्यात मदत करेल. एक रात्र आधीच योजना केलीत तर रात्रभर ती कार्यसूची तुमच्या अवचेतन मनाकडे सामावली जाते. दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपोआप योग्य क्रम सुचतात आणि तुम्ही त्याप्रमाणे काम करू लागता.

चिंता सोडा सुखाने जगा Marathi Book PDF Free Download

9. टीव्ही वरती वेळ वाया घालवू नका

मित्रांनो टीव्हीमुळे आज जितका वेळ वाया जात आहे, तितका इतिहासात कधी दुसऱ्या कारणामुळे झालेला आढळत नाही. टीव्हीचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. पण आपण मात्र इथे फक्त वेळ वाया जाण्याच्या संदर्भात विचार करणार आहोत.

एका पाहणीवरुन असा निष्कर्ष निघाला आहे की, लोक एका आठवडयात जवळजवळ १७ तास टीव्ही बघतात म्हणजे रोज जवळ जवळ अडीच तास. याचा अर्थ लोक त्यांच्याजवळ असलेल्या सक्रिय वेळेतला २०% वेळ टीव्ही बघण्यावर फुकट घालवतात.

जरा विचार करा तुम्ही टीव्ही बघितला नाहीत तर काय होईल ? बऱ्याचवेळा असे होते की, अर्धाच तास टीव्ही बघायचा असे ठरवून तुम्ही टीव्ही समोर बसता आणि अर्ध्या तासानंतर दुसऱ्या चॅनेलवर आणखी एखाद्या चांगला कार्यक्रम दिसू लागला की दोन तास कधी होतात ते कळत नाही.

या भानगडीत तुमची बहुतेक सगळी आवश्यक कामे अर्धवट राहतात. टीव्ही बघणारे बरेचजण त्यांच्या शैक्षणिक महत्त्वाबद्दल बोलतात पण फक्त शैक्षणिक कार्यक्रमासाठी टीव्ही बघणारे कोणीच मला आजपर्यंत भेटलेले नाहीत.

शिक्षणच घ्यायचं असेल तर त्यासाठी शिवाय इतर अनेक गोष्टी आहेत. जसे की पुस्तके वाचा, इंटरनेटवरून माहिती घ्या. पण खरंच ज्ञान वाढवणारेच कार्यक्रम तुम्ही टीव्हीवर बघत असाल तर हा भाग तुमच्यासाठी नाही. माझ्या एका परिचितांकडे सकाळपासून रात्रीपर्यंत टीव्ही चालू असतो.

  • जरुर वाचा: मृत्यु च्या आधी प्रत्येकानी ही 10 पुस्तके वाचलीच पाहिजेत 

सकाळी ते स्वत: बातम्या बघतात. अधून मधून शाळेत जाण्यापूर्वी मुले कार्टून्स बघतात, दुपारी पत्नीच्या मालिका आणि गाणी चालतात. संध्याकाळी ते आले की परत बातम्या आणि मालिका ते स्वतः पाहतात. अधून मधून मुलांचे कार्टून्स बघणे चालूच असते. थोडक्यात पूर्ण दिवस टीव्हीलाच वाहिलेला असतो .

टीव्ही हा त्यांच्या कुटुंबाचा एक कायमचा आणि सर्वांत महत्वाचा घटक झाला आहे . बाकी तर जाऊच दे , त्यांचे जेवणही टीव्ही समोर बसून होते. त्यामुळे जेवणाची चव तर त्यांना कळत नाहीच. शिवाय ते किती खात आहेत याचंही भान त्यांना राहत नाही.

मित्रांनो जर तुम्हाला तुमचे टाइम मॅनेजमेंट करायचे असेल तर तुम्हाला जरा टीव्ही बघणे बंद करावे लागणार.

Time Management Book in Marathi PDF Free Download

मित्रानो जर तुम्ही Time Management Book in Marathi PDF Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही Time Management in Marathi PDF Free Download करू शकता.

Time Management Book in Marathi PDF Free Download

Time Management in Hindi PDF Free Download

मित्रांनो जर तुम्ही Time Management in Hindi PDF Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि टाइम मैनेजमेंट बुक इन हिंदी PDF Download करा.

Time Management Book in Hindi PDF Download

Releted Ebooks-

  1. Think And Grow Rich Book in Marathi PDF Free Download
  2. The Alchemist Marathi Book Summary – With Marathi PDF Download
  3. The Compound Effect Book in Marathi Pdf Free Download
  4. Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download
  5. The Alchemist Marathi PDF Free Download
  6. Psychology of Money Marathi PDF Free Download

Conclusion:

मित्रांनो जर तुम्हाला Time Management Book Summary in Marathi आर्टिकल आवडले असेल किंवा तुमच्या साठी उपयोगी ठरले असेल तर, तुमच्या मित्र मैत्रीण सोबत अवश्य शेयर करा.

  • Instagram Page : Fallow Me
  • Telegram Channel : Subscribe

मित्रांनो आमच्या अश्या सेल्फ हेल्प आणि Motivational Books PDF Free Download करण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज ला जरुर follow करा.

धन्यवाद.

FAQ QUESTIONS:

Time Management Marathi Pdf Free Download कशी करायची?

मित्रांनो Time Management Marathi Pdf Free Download करण्यासाठी सुरुवातीला blue कलर मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून Pdf Free Download करू शकता.

Time Management या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Time Management या पुस्तकाचे लेखक डॉ. सुधीर दीक्षित जी हे आहेत.

वेळेचे व्यवस्थापन कसे करावे?

वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी Time Management Marathi Summary आर्टिकल ला अवश्य वाचा.

Share This Article
Facebook Pinterest Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article Geronimo Stilton Books Pdf Free Download Best 75 Geronimo Stilton Books Pdf Free Download
Next Article चिकू पिकू मराठी मासिकाचा सारांश चिकू पिकू मराठी मासिकाचा सारांश | Chiku Piku Story Book Summary in Marathi
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Letest Posts

Moral Stories in Hindi
अगर आप खुश रहना चाहते हैं तो यह कहानी आपके लिए है : Moral Stories in Hindi
Motivational Stories In Hindi Hindi Blog Self Help Articles
geeta gyan - geeta updesh
Geeta Gyan: भगवान श्री कृष्ण ने अर्जुन को बताया अपने मन पर विजय पाने का रहस्य
Geeta Gyan - गीता ज्ञान हिंदी में Geeta Saar Hindi Blog Self Help Articles Spiritual Articles
geeta gyan in hindi
Geeta Gyan: भगवान श्री कृष्ण ने अर्जुन को बताएँ सफलता प्राप्त करने के 3 रहस्य
Geeta Gyan - गीता ज्ञान हिंदी में Geeta Saar Hindi Blog Self Help Articles Spiritual Articles
मैं कौन हूँ | Who Am I
गीता से जाने मैं कौन हूँ और कहां से आया हूं और कहां जाऊंगा | Who Am I ?
Spiritual Articles Geeta Saar Hindi Blog Self Help Articles

Fatured Posts

Book Summaries

बदले अपनी सोच तो बदलेगा जीवन बुक समरी इन हिंदी में

Rich Dad Poor Dad Book Summary in Hindi

The Psychology Of Money Hindi Summary – With Pdf Download

Read More Book Summaries : Click Hare

Biographies

संत मीराबाई का जीवन परिचय हिंदी में 

Top 5 Powerful Real Life Inspirational Stories in Hindi

गौतम बुद्ध का जीवन परिचय और उनकी शिक्षाएं

Read More Biographies: Click hare

Motivational Stories

खुशी का मंत्र – Best Motivational Kahani In Hindi

जीवन की यात्रा – Hindi Motivational Story

चार रानियों वाला राजा – Short Motivational Kahani

Read More Stories: Click Hare

Motivational Quotes

Top 100 Bhagavad Gita Quotes in Hindi For Success

100 Inspirational Life Lessons In Hindi For Success

100+ प्रेरणादायक मोटिवेशनल कोट्स इन हिंदी में

Read More Motivational Quotes: Click Hare

Self Help Articles

जाने सफलता दिलाने वाले भगवान श्री कृष्ण के 10 उपदेश, आज से ही कर दे जीवन में अपनाना शुरू

Top 15 Best Hindi Youtube Channels Can Change Your Life

जानिए आलस क्यों आता है और आलस को कैसे दूर करें?

Read More Self Help Articles: Click Hare

Spiritual Articles

सफलता दिलाने वालें महात्मा बुद्ध के 10 उपदेश, आज से ही कर दें जीवन में अपनाना शुरू

गीता के ये 10 उपदेश आपकी जिंदगी बदल देंगे

Top 5 Shrimad Bhagwat Katha in Hindi | श्रीमद् भागवत कथा हिंदी में

Read More Spiritual Articles: Click hare

Pages

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Terms and Conditions
  • DMCA
Follow US
Copyright © 2020 - 2023 Knowledge Grow, All Rights Reserved.
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?