चिकू पिकू मराठी मासिकाचा सारांश | Chiku Piku Story Book Summary in Marathi
नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे Knowledge Grow Motivational Blog वरती सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आज चे हे आर्टिकल तुमच्यासाठी खूप उपयोगी आणि इंट्रेस्टिंग ठरणार आहे. कारण मित्रांनो आज च्या ह्या आर्टिकल च्या माध्यमातून मी आज तुमच्या सोबत चिकू पिकू मराठी मासिकाचा सारांश share करणार आहे, म्हणून मित्रांनो या पोस्ट ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा…
चिकू पिकू मराठी मासिकाचा सारांश | Chiku Piku Story Book Summary in Marathi
मुलांचा मित्र चिकूपिकू. मुलांच्या वाढत्या वयात त्याचा मित्र होऊन त्याना वेगवेगळे मस्त अनुभव देणारं चिकूपिकू मराठी मासिक. मुलांनी आणि पालकांनी एकत्र बसून मज्जा मस्ती करत वाचता येणारं चिकूपिकू मासिक.
चिकूपिकू आहे तरी काय?
मुलांचा १ ते ८ वर्षात सर्वांगीण विकास होत असतो. याच वयात मुलांमधील कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळी रंगीत चित्र, गोष्टी, कविता, ऍक्टिव्हिट्स खूप मदत करतात. या सगळ्या गोष्टी एकत्र कुठे मिळतील बरं? याच उत्तर अगदी सोपं आहे, मुलांना वेगवेगळी रंगीत चित्र, गोष्टी, कविता, ऍक्टिव्हिट्स आणि गोष्टी आणि गाण्यातून मिळणारे अनुभव म्हणजे ‘चिकूपिकू‘. नवीन गोष्टी सतत करून बघण्यासाठी गमतीशीर, मजेदार ऍक्टिव्हिट्स असं चिकूपिकूचं मराठी मासिक.
चिकूपिकू अंकात काय वाचाल?
चिकूपिकू अंकात वेगवेगळ्या गोष्टी असतात पण दर अंकात मुलांचे वेगवेगळे मित्र त्याच्या गोष्टी घेऊन यात असतात. फिशिरा, क्युबो, चिकूपिकू, वेगवेगळ्या झाडांच्या गोष्टी, शात्रज्ञांच्या गोष्टी, नेचर आणि मी मध्ये वेगवेगळे पक्षी आणि प्राणी भेटायला येतात. या सगळ्या गोष्टीची चित्रं बघत वाचायला छोट्या मित्रांना खुप मज्जा येईल.
चिकूपिकूच्या अंकात पालकांनी काय वाचावं?
१ ते ८ वयाच्या दरम्यान जे काही अनुभव मुलांना मिळतील त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडणार आहे हे समक्ष दिसून आलं. चिकूपिकूचा अंक दरवेळेस पालकांना हि मार्गदर्शन करत असते. ‘मुलं प्रश्न’ यातुन पालकांनी मुलांशी कसं वागावं, बोलावं हे तज्ञां कडून मार्गदर्शन मिळत. चिकूपिकू पालकांसाठी वेबसाईट वर वेगवेगळे ब्लॉग घेऊन येतच असत.
वेगवेगळ्या वयोगटाला चिकूपिकू अशी मदत करते?
१ ते ३ वयोगटातील मुलांसाठी – या वयोगटातील मुलांना अक्षरओळख नसते , पण त्यातील रंगीत चित्र बघता गोष्ट सांगता येते किंवा ऑडिओ स्टोरीज ऐकवता येतात. या मुळे मुलांमधे वाचनाची आवड निर्माण व्हयला मदत होते. चित्रं रंगवणे, वेगवेगळ्या वस्तू, ऍक्टिव्हिट्स आई- बाबांच्या मदतीने मुलांना करता येतात.
३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी – या वयोगटातील मुलांना गोष्टीची चित्रं बघत स्वतः गोष्टी वाचण्यात मज्जा येते. ३ ते ६ वर्षांची मुलं ऍक्टिव्हिट्स स्वतंत्रपणे करू शकतात.
६ ते ८ वयोगटातील मुलांसाठी – या वयोगटातील मुलं मोठी झालेली असतात. त्याना गोष्टी वाचता येतात आणि आपल्या छोट्या मित्रांना- बहीणभावाला गोष्ट वाचून दाखवू शकतात. गोष्ट वाचताना नवीन गोष्ट किंवा कविता स्वतः लिहू, तयार करु शकतात. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिट्स आपल्या मित्र- मैत्रिणी सोबत करू शकतात.
चिकूपिकूच्या ऑडिओ स्टोरिज – Chiku Piku Audio Stories in Marathi
गोष्टी ऐकायला सगळ्यांना आवडतात. पण गोष्ट मुलांना कशी सांगायची? हा प्रश्न पालकांना पडतो. पण चिकूपिकूच्या अंकातल्या गोष्टी www.chikupiku.com वेबसाईट वर अगदी फ्री आहेत. मस्त गोष्टीची चित्रं बघत वेबसाईट वरील गोष्टी ऐकत मुलांना एक मस्त अनुभव मिळतो. गोष्टी ऐकत आणि चित्रं बघत मुलांचा स्क्रीन टाईम सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते.
चिकू पिकूचे इतर उपक्रम
चिकूपिकू मुलांसाठी आणि पालकांनासाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन येतात. वेगवेगळ्या उपक्रमातून पालकांना मार्गदर्शन, मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी, मजा – मस्ती चिकूपिकू घेऊन येत. पालकांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन शाळेतून पालकांना तज्ञांच मार्गदर्शन मिळते. हातांची जादू मधून मुलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात. नाटुकली मधून वेगवेगळ्या गोष्टी नाटक स्वरूपात दिसतात आणि छान लक्षात राहतात. चिकूपिकू कार्निवलमध्ये तर मुलांसाठी गाणी, गोष्टी, नाटक, खेळ आणि गमती- जमती असा खजिनाच असतो.
चिकू पिकूच्या कुटूंबाचा मित्र तुम्हीपण होऊ शकता, कसे व्हाल ?
चिकूपिकूच्या या कुटूंबाचा नवीन मित्र होण्यासाठी तुम्ही चिकूपिकूचे वार्षिक सभासदत्व घेऊ शकता म्हणजेच subscription मध्ये दिवाळी आणि सुट्टी विशेषांक या २ जोड अंकांसहित एकूण १० अंक घरपोच. चिकू पिकूचे वार्षिक सभासदत्व घेऊन चिकूपिकूचे मित्र नक्की व्हा !
आमचे इतर मराठी लेख: जरूर वाचा
- Top 21 Life Changing Short Stories in Marathi With Moral
- आयुष्य बदलून टाकू शकतात तुमचे, हे प्रेरणादायी सुविचार, जाणून घ्या आताच कोणते आहेत ते
- Top 10 Best Marathi Books to Read Before You Die
- Top 3 Best Motivational Speech In Marathi For Students
- Top 15 Best Motivational Stories In Marathi For Success
मित्रांनो आज च्या ह्या Chiku Piku Story Book Summary in Marathi आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रांनो जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल आणि तुमच्यासाठी उपयोगी ठरले असेल तर, ह्या आर्टिकल ला तुमच्या मित्र मैत्रीण सोबत अवश्य share करा. त्या सोबतच हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले हे हि आम्हाला खाली कॉमेंट करून जरूर कळवा.
मित्रानो आपण परत भेटू अशाच एका आर्टिकल सोबत तो पर्यंत तुम्ही जिथे हि असाल तिथे तुम्ही खुश आणि आनंदी रहा..
धन्यवाद…
FAQ QUESTIONS:
चिकूपिकू नेमकं आहे तरी काय?
मुलांना वेगवेगळी रंगीत चित्र, गोष्टी, कविता, ऍक्टिव्हिट्स आणि गोष्टी आणि गाण्यातून मिळणारे अनुभव म्हणजे ‘चिकूपिकू’. नवीन गोष्टी सतत करून बघण्यासाठी गमतीशीर, मजेदार ऍक्टिव्हिट्स असं चिकूपिकूचं मराठी मासिक.