The Alchemist Marathi Pdf Free Download, The Alchemist Summary in Marathi, The Alchemist Book in Marathi PDF Download
नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे knowledgegrow.in ब्लॉग वरती स्वागत आहे. मित्रांनो जर तुम्ही The Alchemist Marathi Pdf Free Download करणार असाल किंवा The Alchemist Book Summary in Marathi मध्ये वाचणार असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
मित्रानो इथे तुम्हाला The Alchemist Book Summary in Marathi मध्ये वाचायला मिळेल त्या सोबतच तुम्हाला The Alchemist Marathi Book Pdf Free Download करण्यासाठी सुद्धा मिळेन. म्हणून मित्रांनो या पोस्ट ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा. चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकाबद्दल.
The Alchemist Marathi Pdf Free Download
मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये एका मेंढपाळ करणाऱ्या एका व्यक्तीची गोष्ट आहे. जी आपल्याला खूप मोटीवेट करणारी आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेनं नेणारी कथा आहे. लेखक पाउलो कोयलो यांनी ह्या पुस्तकाला अवघ्या दोन आठवड्यात लिहून पूर्ण केले होते, जे आज इंटरनॅशनल बेस्ट सेलर पुस्तकं आहे.
The Alchemist Book Summary in Marathi
मित्रानो ही कथा आहे सँटियागो नावाच्या मेंढपाळ करणाऱ्या एका माणसाची, ज्याला नवीन नवीन प्रदेशात फिरण्याची खूप आवड होती. आणि त्यामुळेच तो मेंढपाळ बनला होता. एके दिवशी तो आपल्या मेंढ्यांना घेऊन तरिफा नावाच्या गावाकडे निघाला होता.
पण दिवस मावळल्या मुळे तो वाटेत एका पडक्या चर्च मध्ये राहिला, आणि आपल्या सर्व मेंढ्यांना त्याने तिथेच त्या पडक्या चर्च मध्ये बांधल्या, आणि तेथील एका सिकमोर झाडा खाली झोपला. तेव्हा त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले, त्या स्वप्नात त्याला असे दिसले की इजिप्त च्या पिरॅमिड जवळ एक खजिना लपविला आहे.
त्याला अगोदर पण असे स्वप्न पडले होते, म्हणून तो त्या गावातील एका स्वप्नांचा अर्थ सांगणाऱ्या बाईला भेटला, आणि त्या बाईने त्याला त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्याचे कबूल केले. पण त्याच्या बदल्यात तिने त्या खजिन्यातील १०% हिस्सा मागितला.
सँटियागो ने १०% हिस्सा देण्याचे कबूल केले. आणि त्या बाईने त्याला असे सांगितले की इजिप्त च्या पिरॅमिड जवळ तुला तो खजिना मिळेन, पण तुला त्यासाठी तिथे जावे लागेल. सँटियागोला त्या बाईच्या बोलण्यावर इतका विश्वास नाही वाटला, म्हणून तो आपल्या कामाला निघून गेला.
नंतर त्या सँटियागोला एक म्हातारा माणूस भेटला, जो स्वताला सालेम देशाचा राजा आहे असं सांगत होता. आणि तो वेश बदलून इथ फिरण्यासाठी आला होता. त्याने सँटियागोला खजिना शोधण्यासाठी जाण्यास खूप मोटिवेट केले आणि त्यांच्या बोलण्याने सँटियागो खूप प्रभावित झाला.
आणि त्याने आपल्या सर्व मेंढ्या विकून थोडे पैसे जमविले, आणि दुसऱ्या दिवशीच तो इजिप्त ला जाण्यासाठी निघाला. आता सँटियागो मोरोको नावाच्या एका शहरात पोहचला होता, जिथे त्याचे सर्व पैसे चोरीला जातात. पण तरी ही त्या सँटियागो ने आपली हिम्मत नाही हारली.
तो तिथल्याच एका काचेच्या भांड्याच्या दुकानात गेला आणि त्या दुकान मालकाला असे म्हणाला की “मी तुमच्या इथे जे काही काम असेल ते करतो, फक्त त्या बदल्यात तुम्ही मला जेवायला आणि रहायला द्या. आणि मग त्या मालकाने त्याला काही काम करण्यासाठी दिले.
सँटियागोने ती सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण केलीत, आणि त्याच्या कामावर खुश होऊन त्या दुकान मालकाने त्याला कामावर ठेवून घेतलें. मग तिथे सँटियागो ने काही दिवस काम केले, आणि आपल्या वेगवेगळ्या आयडिया वापरून त्या दुकान मालकाला खूप फायदा करुन दिला.
पण अजूनही तो आपल्या खजिन्याचे स्वप्न मात्र विसरला नव्हता. एका दिवशी तेथून काफिल्याचा ताफा इजिप्त ला निघाला होता, आणि त्यांच्या सोबत सँटियागो पण ईजिप्त ला जायला निघाला. त्या काफिल्या मध्ये त्याला एक इंग्रज माणूस भेटला जो की एका Alchemist ला शोधत होता.
मित्रानो Alchemist म्हणजेच किमयागार. तो Alchemist इतका पॉवरफुल होता की तो तांब्याच्या धातूला सोन्यामध्ये बदलवू शकत होता. ते सगळे जण वाळवंट पार करतं असताना, अशी एक अफवा पसरली होती की वाळवंटात एक मोठे युद्ध होणार आहे.
त्यामुळे काफिल्यातील सर्व लोक घाबरले आणि ती सर्व लोक तिथल्याच एका अल्फायुम नावाच्या गावात थांबले. तो इंग्रज माणूस Alchemist च्या शोधत होता आणि त्यासाठी सँटियागो ही त्याला मदत करत होता. त्या गावामध्ये त्याला फातिमा नावाची एक मुलगी भेटली, जिन्ह त्याला Alchemist चा पत्ता सांगितला.
आणि त्या सोबतच सँटियागो त्या मुलीच्या प्रेमात पडला आणि इकडे तो इंग्रज माणूस अल्केमिस्ट ला भेटायला गेला. अल्केमिस्ट त्या इंग्रज माणसाला म्हणाला की “तू मला 10 वर्षापासून मला शोधत आहेस पण तू स्वतः कधी तांब्याला सोन्यात बदलण्याचा प्रयत्न केलास का?
त्यावर तो इंग्रज माणूस अल्केमिस्ट ला म्हणाला की ‘नाही’ त्यामुळे त्या इंग्रज माणसाला अल्केमिस्ट ने तांब्याचे सोन्यात बदलण्याचे काम दिले. आणि त्या कामात तो बिझी झाला. त्या नंतर सँटियागोला असे स्वप्न पडले की अल्फायुम गावावर कोण्ही तरी हल्ला करणार आहे. आणि त्याने ही बातमी अल्फायुमच्या सरदार दिली.
तो सरदार सँटियागोला म्हणाला की आम्ही युद्धाची तयारी करू, पण जर युद्ध नाही झाले तर तुला मारण्यात येईल. आणि दुसऱ्या दिवशी खरच एका काफिल्याने अल्फायुम गावावर हल्ला केला. पण अल्फायुमची लोकं या युद्धासाठी तयार होते, म्हणून त्यांनी हा हल्ला परतवून लावला.
ते युद्ध जिंकल्यामुळे अल्फायुमचे सरदार सँटियागो वर खूप खुश झाले आणि त्यांनी सँटियागो ला खूप सारे सोने आणि त्या सोबतच एक चांगल्या पैशाची नोकरी सुद्धा त्याला दिली. सँटियागो आता खूप खुश झाला होता कारण आता तेझ्याकडे खूप सारा पैसा होता, म्हणून तो आता तिथेच सेटल होण्याचा विचार करत होता.
पण त्याची प्रेमिका म्हणजेच फातिमा त्याला म्हणाली की “खर प्रेम आपल्याला कधीच आपल्या स्वप्नांपासून दूर नेत नाही, म्हणून तुला तुझ्या खजिन्याच्या स्वप्नाला अर्ध्यात सोडायला नाही पाहिजे.” आणि त्याच दिवशी त्याला अल्केमिस्ट पण भेटला. मग अल्केमिस्ट ने सँटियागो सोबत ईजिप्तला येण्याचे कबूल केले आणि ते दोघे ही इजिप्तला निघाले.
काही दिवसाच्या प्रवासानंतर ते दोघे ही एका मटा जवळ पोहचले. तिथे अल्केमिस्ट ने आपल्या जवळ असलेल्या तांब्याचे सोन्यात रूपांतर केले आणि त्यातला थोडा हिस्सा सँटियागोला देऊन म्हणाला की इथून तू एकटाच इजिप्तला जा, आणि त्या नंतर सँटियागो तिथून एकटाच इजिप्तला जातो.
जसे ही सँटियागो इजिप्त च्या पिरॅमिड जवळ पोहचतो आणि पिरॅमिड च्या पायथ्या जवळ खोदायला सुरुवात करतो, तेवढ्यात तिथे काही लुठेरे आलीत आणि त्यांनी सँटियागोला मरायला सुरुवात केली आणि त्याच्या जवळचे सोने ही हिसकावून घेतले.
सँटियागो त्यांना म्हणाला की “मी इथे स्वप्नात बघितले होते की इथे खजिना पुरलेला आहे” या वरती सगळे लुटेरे हसायला लागले आणि त्यातील एक जण सँटियागो ला म्हणाला की “अरे तू किती मूर्ख आहेस, स्वप्न कधी खरे असतात काय?”
“एका दिवशी मला ही स्वप्नात दिसले होते की एका पडक्या चर्च च्या बाहेर सीकमोरच्या झाडाखाली खजिना पुरलेला आहे. पण मी तुझ्यासारखा शोधण्याचा वेडेपणा केला नाही.” एवढे बोलून ते लूठेरे तेथून निघून गेले. पण आता सँटियागो हसायला लागला होता, कारण त्याला आता खरा खजिना कुठे आहे ते कळाले होते.
त्यानंतर तो परत स्पेन मध्ये त्या पडक्या चर्च पाशी आला जेथून या सगळ्याची सुरुवात झाली होती. आणि तिथे असलेल्या सिकमोरच्या झाडाखाली खोदून पाहिल्यावर त्याला तो खजिना सापडतो. त्याने त्यातील १०% हिस्सा त्या बाईला द्यायचे ठरवले आणि तो फातिमा कडे जाण्यासाठी निघाला.
Conclusion of The Alchemist Summary in Marathi
मित्रांनी या कथेतून आपल्याला असे शिकायला मिळते की “खजिना आपल्या जवळच आसतो , पण ते कळण्यासाठी आपल्याला त्याला शोधण्याची प्रोसेस पूर्ण करावी लागते.”
मित्रानो खजिना सँटियागोच्या जवळच होता पण तो मिळवण्यासाठी त्याला ईजिप्त पर्यंत जावे लागले. या शिवाय आणखी एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की 👇👇
“किती ही अडचण असली तरी ही कधी आपले स्वप्न विसरु नये. सँटियागोला या प्रवासात कित्येक अडचणी आल्या, पण तो आपले स्वप्न मात्र विसरला नाही.”
मित्रांनो ही होती the Alchemist या पुस्तकाची छोटी सी समरी मराठी मध्ये, तुम्हा सर्वांना कशी वाटली? हे आम्हाला खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून जरूर कळवा. आणि त्या सोबतच ह्या आर्टिकल ला इतरांसोबत अवश्य शेयर करा.
The Alchemist Book in Marathi PDF Free Download
मित्रांनो जर तुम्ही The Alchemist Book in Marathi PDF Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि The Alchemist Marathi Book PDF Free Download करा.
- The Alchemist Marathi PDF : Free Download
The Alchemist Hindi PDF Free Download
मित्रांनो जर तुम्ही The Alchemist Hindi PDF Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि The Alchemist Hindi PDF Free Download करा.
- The Alchemist Hindi PDF : Free Download
Releted Ebooks :
- Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download
- The Psychology of Money in Marathi Pdf Free Download
- Eat That Frog Book in Marathi PDF Free Download
- The Compound Effect Book in Marathi Pdf Free Download
- Think and Grow Rich Marathi PDF Free Download
- The Secret Book in Marathi PDF Free Download
- 5 am club book in marathi pdf free download
मित्रांनो आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी तुम्ही आमच्या Whatsapp Group आणि’ Telegram Channel ला जॉईन जरूर करा. Whatsapp Group आणि’ telegram Channel ला जॉईन करण्याची लिंक मी खाली दिलेली आहे.
मित्रांनो आज च्या ह्या The Alchemist Marathi Book Summary आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रांनो आपण परत भेटू अशाच एका Intresting Article सोबत, तो पर्यंत तुम्ही जिथे हि असाल तिथे खुश आणि आनंदी रहा…
धन्यवाद 🙏🙏🙏